Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 1/ मन्त्र 30
    ऋषिः - परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः देवता - यज्ञो देवता छन्दः - निचृत् जगती, स्वरः - निषादः
    3

    अदि॑त्यै॒ रास्ना॑सि॒ विष्णो॑र्वे॒ष्पोस्यू॒र्ज्जे त्वाऽद॑ब्धेन॒ त्वा॒ चक्षु॒षाव॑पश्यामि। अ॒ग्नेर्जि॒ह्वासि॑ सु॒हूर्दे॒वेभ्यो॒ धाम्ने॑ धाम्ने मे भव॒ यजु॑षे यजुषे॥३०॥

    स्वर सहित पद पाठ

    अदि॑त्यै। रास्ना॑। अ॒सि॒। विष्णोः॑। वे॒ष्पः। अ॒सि॒। ऊ॒र्ज्जे। त्वा॒। अद॑ब्धेन। त्वा॒। चक्षु॑षा। अव॑। प॒श्या॒मि॒। अ॒ग्नेः। जि॒ह्वा। अ॒सि॒। सु॒हूरिति सु॒ऽहूः॑। दे॒वेभ्यः॑। धाम्ने॑। धाम्न॒ऽइति॒ धाम्ने॑ धाम्ने। मे॒। भ॒व॒। यजु॑षे यजुष॒ऽइति॒ यजु॑षे यजुषे ॥३०॥


    स्वर रहित मन्त्र

    अदित्यै रास्नासि विष्णोर्वेष्पोस्यूर्जे त्वादब्धेन त्वा चक्षुषावपश्यामि । अग्नेर्जिह्वासि सुहूर्देवेभ्यो धाम्नेधाम्ने मे भव यजुषेयजुषे ॥


    स्वर रहित पद पाठ

    अदित्यै। रास्ना। असि। विष्णोः। वेष्पः। असि। ऊर्ज्जे। त्वा। अदब्धेन। त्वा। चक्षुषा। अव। पश्यामि। अग्नेः। जिह्वा। असि। सुहूरिति सुऽहूः। देवेभ्यः। धाम्ने। धाम्नऽइति धाम्ने धाम्ने। मे। भव। यजुषे यजुषऽइति यजुषे यजुषे॥३०॥

    यजुर्वेद - अध्याय » 1; मन्त्र » 30
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे जगदीश्‍वर, आपण (अदित्यै) या पृथिवीवर (रास्ना) रस आदी पदार्थांना उत्पन्न करणारे (असि) आहात. (विष्णोः) (असि) व्यापक आहात. (वेष्यः) पृथिवी आणि पृथिवीवरील सर्व पदार्थांमधे विद्यमान (असि) आहात. तसेच आपणच (अग्नेः) भौतिक अग्नीची (जिह्वा) जिह्वारूप (असि) आहांत (अग्नीला तेज व प्रकाश देणारे आपणच आहात.) (देवेभ्यः) विद्वज्जन (धाम्ने धाम्ने) ज्या धामामधे राहून सुखी असतात आणि उत्तम पदार्थांना प्राप्त करतात, ते तीन धाम म्हणजे स्थान, नाम आणि जन्म, या तीन धर्मांच्या प्राप्तीसाठी (यजुषे यजुषे) यजुर्वेदाचा प्रत्येक मंत्राचा अर्थ जाणण्यासाठी विद्वज्जन (सुहूः) श्रेष्ठ आणि स्तवनीय अशा रूपाने (त्वा) आपणास पाहतात, तसे मी (अदब्धेन) प्रेमाने व आनंदाने (चक्षुषा) ज्ञानरूप नेत्राद्वारे (उर्ज्जे) पराक्रम (आदित्यै) पृथिवी व (देवेभ्यः) श्रेष्ठ गुणांच्या प्राप्तीसाठी अथवा (धाम्ने धाम्ने) स्थान, नाम आणि जन्म आदी पदार्थांच्या प्राप्तीसाठी तसेच (यजुषे यजुषे) यजुर्वेदाच्या प्रत्येक मंत्राचा अर्थ जाणून घेण्यासाठी (अवपश्यामि) तानरूप नेत्रांनी आपणांकडे पाहता. आपणही कृपाकरून मला आपले ज्ञान व्हावे असे करा व माझ्या पूजनाचा (भव) स्वीकार करा. हा या मंत्राचा पहिला अर्थ झाला. आतां दुसरां अर्थ सांगत आहोत. हा यज्ञ (अदित्यै) अंतरिक्षात (रास्ना) रसादी पदार्थांच्या क्रियेचे (उत्पत्ती आणि परिवर्तनाचे कारण (असि) आहे. (विष्णोः) अंतरिक्षात यज्ञविषयक कार्यांना (वेष्यः) व्यापकत्व देणारा (असि) आहे,(अग्नेः) या भौतिक अग्नीच्या (जिह्वा) जिभेप्रमाणे (असि) आहे, तसेच देवेभ्यः) विद्वज्जनांना दिव्य गुणांचा दाता आहे (धाम्ने धाम्ने) कीर्ती, स्थान आणि जन्म यांची प्राप्ती करून देणारा आहे, (यजुषे यजुषे) यजुर्वेदाच्या एक एक मंत्राचा आशय जाणून घेण्याचे (सुहूः) उत्तम आणि प्रशंसनीय साधन (असि) आहे, त्यामुळे मी (त्वा) या यज्ञाला (अदब्धेन) सुख आणि आनंद पुरितं (चक्षुषा) या प्रत्यक्ष नेत्रांनी (अवपश्ययामि) पाहतो). (त्वा) त्या यज्ञाला (अदित्यै) पृथिवी आदी पदार्थ (देवेभ्यः) उत्तमोत्तम गुण (धाम्ने धाम्ने) स्थान, नाम आणि जन्म देणारा (यजुषे यजुषे) यजुर्वेदाच्या प्रत्येक मंत्राने कल्याण प्राप्त करण्याकरिता (अवपश्यामि) यज्ञक्रिया आणि व्यवहाराचे कौशल्य सांगणारा, असे मानतो. ॥30॥

    भावार्थ - भावार्थ - यामंत्रात श्‍लेषालंकार आहे. ज्याप्रमाणे सर्व मनुष्यांसाठी आवश्यक आहे की त्यांनी जगदीश्‍वराला वस्तुमात्रात अवस्थित पाहावे, आणि त्या ईश्‍वराला वेदाच्या प्रत्येक मंत्राचा प्रतिपादक आणि उपासनीय मानावे त्याप्रमाणे हा यज्ञ देखील वेदाच्या प्रत्येक मंत्राद्वारे उत्तमप्रकारे प्रतिपादित आहे, विद्वज्जनांद्वारे सेवित आहे आणि पदार्थांमधे सर्व प्राण्याकरिता पदार्थांमधे पराक्रम व शक्ती देणारा आहे, असे जाणावे. ॥30॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top