Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 6/ मन्त्र 14
    ऋषिः - मेधातिथिर्ऋषिः देवता - विद्वांसो देवता छन्दः - भूरिक् आर्षी जगती, स्वरः - निषादः
    2

    वाचं॑ ते शुन्धामि प्रा॒णं ते॑ शुन्धामि॒ चक्षुस्॑ते शुन्धामि॒ श्रोत्रं॑ ते शुन्धामि॒ नाभिं॑ ते शुन्धामि॒ मेढ्रं॑ ते शुन्धामि पा॒युं ते॑ शुन्धामि च॒रित्राँ॑स्ते शुन्धामि॥१४॥

    स्वर सहित पद पाठ

    वाच॑म्। ते॒। शु॒न्धा॒मि॒। प्रा॒णम्। ते॒। शु॒न्धा॒मि॒। चक्षुः॑। ते॒। शु॒न्धा॒मि॒। श्रोत्र॑म्। ते॒। शु॒न्धा॒मि॒। नाभि॑म्। ते॒। शु॒न्धा॒मि॒। मेढ्र॑म्। ते॒। शु॒न्धा॒मि॒। पा॒युम्। ते॒। शु॒न्धा॒मि॒। च॒रित्रा॑न्। ते॒। शु॒न्धा॒मि॒ ॥१४॥


    स्वर रहित मन्त्र

    वाचन्ते शुन्धामि प्राणन्ते शुन्धामि चक्षुस्ते शुन्धामि श्रोत्रन्ते शुन्धामि नाभिन्ते शुन्धामि मेढ्र्रन्ते शुन्धामि पायुन्ते शुन्धामि चरित्राँस्ते शुन्धामि ॥


    स्वर रहित पद पाठ

    वाचम्। ते। शुन्धामि। प्राणम्। ते। शुन्धामि। चक्षुः। ते। शुन्धामि। श्रोत्रम्। ते। शुन्धामि। नाभिम्। ते। शुन्धामि। मेढ्रम्। ते। शुन्धामि। पायुम्। ते। शुन्धामि। चरित्रान्। ते। शुन्धामि॥१४॥

    यजुर्वेद - अध्याय » 6; मन्त्र » 14
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (गुरुजन वा गुरुपत्नी शिष्यास अनुलक्षून म्हणत आहे) हे शिष्या/हे शिष्ये मी विविध विद्या, शिक्षण, संस्कार आदीद्वारे (ते) तुझ्या (वाचम्) वाणीला (शुन्धामि) शुद्ध करतो म्हणजे धर्मानुसारिणी करतो. अथवा निर्मळ करतो. (तुझी भाषा, उच्चारणादींना दोषरहित करतो) (ते) तुझ्या (चक्षुः) नेत्रांना (शुन्धामि) शुद्ध करतो (तू दृष्टीने अभद्र पाहू नकोस, असे वळण लावीत आहे) (ते) तुझ्या (नाभिम्) ज्या ठिकाणी नाडी बांधतात, त्या भागास (शुन्धामि) शुद्ध करतो. (कटिप्रदेशातील दोष व्यायामादीद्वारे निर्दोष व निरोग करतो) (ते) तुझ्या (मेढ्रम्) ज्या अवयवाने मूत्रोत्सर्ग करतात, त्या शिश्‍नास (शुन्धामि) शुद्ध करतो (ब्रह्मचर्य-धारणाकरिता आदेश देत आहे) (ते) तुझ्या (पायुम्) ज्या अवयवाद्वारे रक्षण केले जाते त्या गुदाइंद्रियत्वा (शुन्धामि) शुद्ध करतो (अपान नियमनाचे नियम व कोष्ठादींची शुद्धता शिकवितो) (चारित्रान्) तुझ्या समस्त व्यवहारांना (शुन्धामि) शुद्ध करतो अर्थात तुझे आचरण पवित्र व धर्मानुकूल राहील, याकडे लक्ष ठेवतो. या मंत्राद्वारे गुरुपत्नी आपल्या शिष्येस सांगत आहे, असे समजल्यास सर्वत्र स्त्रीलिंगी क्रियापद ‘करते, शिकविते, ठेविते, असे वापरावे. ॥14॥

    भावार्थ - भावार्थ - गुरु आणि गरुपत्नी यांनी सर्व कुमार व कुमारिकांना वेद आणि उपवेद, वेदांग आणि उपांग यांचे शिक्षण देऊन त्या कुमार-कुमारींच्या शरीर, इंद्रियें, अंतःकरण आणि मन यांची शुद्धी करावी. तसेच शरीर पुष्ट राहील व प्राण संतुष्ट राहील, यांसाठी कुमार-कुमारींना सद्गुणांकडे प्रवृत्त करावे. ॥14॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top