Loading...
यजुर्वेद अध्याय - 40

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 40/ मन्त्र 5
    ऋषिः - दीर्घतमा ऋषिः देवता - आत्मा देवता छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    0

    तदे॑जति॒ तन्नैज॑ति॒ तद् दू॒रे तद्व॑न्ति॒के।तद॒न्तर॑स्य॒ सर्व॑स्य॒ तदु॒ सर्व॑स्यास्य बाह्य॒तः॥५॥

    स्वर सहित पद पाठ

    तत्। ए॒ज॒ति॒। तत्। न। ए॒ज॒ति॒। तत्। दू॒रे। तत्। ऊँ॒ऽइत्यूँ॑। अ॒न्ति॒के ॥ तत्। अ॒न्तः। अ॒स्य॒। सर्व॑स्य। तत्। ऊँ॒ऽइत्यूँ॑। सर्व॑स्य। अ॒स्य॒। बा॒ह्य॒तः ॥५ ॥


    स्वर रहित मन्त्र

    तदेजति तन्नैजति तद्दूरे तद्वन्तिके । तदन्तरस्य सर्वस्य तदु सरवस्यास्य बाह्यतः ॥


    स्वर रहित पद पाठ

    तत्। एजति। तत्। न। एजति। तत्। दूरे। तत्। ऊँऽइत्यँू। अन्तिके॥ तत्। अन्तः। अस्य। सर्वस्य। तत्। ऊँऽइत्यँू। सर्वस्य। अस्य। बाह्यतः॥५॥

    यजुर्वेद - अध्याय » 40; मन्त्र » 5
    Acknowledgment

    व्याखान -

    (तद् एजति) परमेश्वर सर्व जगाला आपल्या गतीने यथायोग्य रीतीने चालवित आहे. म्हणून अविद्वान लोक ईश्वरावर आरोप करतात की तो चलायमान आहे परंतु तो सर्वांमध्ये परिपूर्ण भरलेला आहे व कधीही चलायमान होत नाही. म्हणून (तन्नैजति) परमेश्वर स्वतः कधीही चलायमान होत नाही. तो पारस व निश्चल असतो. विद्वान लोक ब्रह्माला याप्रकारेच मानतात व जाणतात. (तद् दूरे) धर्महीन, विद्वत्ताशून्य, विचारशून्य, अजितेन्द्रिय ईश्वरभक्ति रहीत इत्यादी दोषांनी युक्त असलेल्या मनुष्यांपासून ईश्वर फार दूर असतो. करोडो वर्ष लोटली तरी तो त्याला जाणत नाहीत व तोपर्यंत ती माणसे दुःखसागरात जन्म मरणाच्या चक्रात फिरत असतात. (तद्वन्तिके) परमात्मा सत्यवादी, सत्यकारी, सत्यजानी, जितेन्द्रीये सर्व लोकांचा उपकारकर्ता असून विद्वान विचारशील पुरुषांच्या (अन्तिके) अत्यंत निकट असतो. तो सर्व आत्म्यांमध्ये असतो. अन्तर्यामी व्यापक असून सर्वत्र भरलेला आहे. तो आत्म्यांचाही आत्मा आहे. कारण तो सर्व जगाच्या आत बाहेर व मध्ये सगळीकडे आह त्याच्या विना तिळमात्र स्थान रिक्त नसते. तो अखंड एकरस सर्वामध्ये व्यापक आहे. त्याला जाणणाऱ्यालाच सुख व मुक्ती मिळू शकते अन्यथा नाही. ॥१२॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top