Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 127
ऋषिः - भारद्वाजः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
2
य꣡ आन꣢꣯यत्परा꣣व꣢तः꣢ सु꣡नी꣢ती तु꣣र्व꣢शं꣣ य꣡दु꣢म् । इ꣢न्द्रः꣣ स꣢ नो꣣ यु꣢वा꣣ स꣡खा꣢ ॥१२७॥
स्वर सहित पद पाठयः꣢ । आ꣡न꣢꣯यत् । आ꣣ । अ꣡न꣢꣯यत् । प꣣राव꣡तः꣢ । सु꣡नी꣢꣯ती । सु । नी꣣ति । तुर्व꣡श꣢म् । य꣡दु꣢꣯म् । इ꣡न्द्रः꣢꣯ । सः । नः꣣ । यु꣡वा꣢꣯ । स꣡खा꣢꣯ । स । खा꣣ ॥१२७॥
स्वर रहित मन्त्र
य आनयत्परावतः सुनीती तुर्वशं यदुम् । इन्द्रः स नो युवा सखा ॥१२७॥
स्वर रहित पद पाठ
यः । आनयत् । आ । अनयत् । परावतः । सुनीती । सु । नीति । तुर्वशम् । यदुम् । इन्द्रः । सः । नः । युवा । सखा । स । खा ॥१२७॥
सामवेद - मन्त्र संख्या : 127
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 2;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 2;
Acknowledgment
भावार्थ - जसे विमान इत्यादी यानांमध्ये प्रयुक्त विद्युद्रुप अग्नी दूर दूर प्रदेशातही विमानचालकांच्या इच्छानुकूल गतीने लोकांना देशांतरी पोचवितो किंवा जसा सुयोग्य राजा अधर्म मार्गावर चालणाऱ्या लोकांना त्यापासून दूर करून धर्ममार्गात प्रवृत्त करतो तसेच परमेश्वर, उन्नतीसाठी प्रयत्न करणाऱ्या पण कधी कधी कुसंगात पडणाऱ्या व सन्मार्गापासून दूर जाणाऱ्या माणसांवरही कृपा करतो व आपल्या जवळ आणून धार्मिक बनवितो ॥३॥
टिप्पणी -
या मंत्राच्या व्याख्येत विवरणकाराने लिहिले आहे, की तुर्वश व यदु नावाचे राजपुत्र होते. याचप्रकारे भरत स्वामी व सायणचे कथन आहे - तुर्वश व यदु नावाचे दोन राजे होते, ज्यांना शत्रूने दूर नेऊन सोडले होते. त्यांना इंद्राने उत्तम नीतीने दूर देशाहून आणले होते. हा त्या सर्वांचा अभिप्राय आहे. हा सर्व प्रलाप आहे, कारण वेद सृष्टीच्या आरंभी परब्रह्म परमेश्वराकडून प्राप्त झाले होते, त्यामुळे त्यात नंतरच्या कोणत्याही राजाचा इतिहास असू शकत नाही. त्याबरोबरच वैदिक कोष निघण्टुमध्ये ‘तुर्वश’ मनुष्यवाची व समीपवाची शब्दात पठित आहे व ‘यदु’ही मनुष्यवाची शब्दात पठित आहे. त्यामुळेही त्यांना ऐतिहासिक राजा मानणे योग्य नाही. ॥१२७॥