Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 179
ऋषिः - गोतमो राहूगणः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
इ꣡न्द्रो꣢ दधी꣣चो꣢ अ꣣स्थ꣡भि꣢र्वृ꣣त्रा꣡ण्यप्र꣢꣯तिष्कुतः । ज꣣घा꣡न꣢ नव꣣ती꣡र्नव꣢꣯ ॥१७९॥
स्वर सहित पद पाठइ꣡न्द्रः꣢꣯ । द꣣धीचः꣢ । अ꣣स्थ꣡भिः꣢ । वृ꣣त्रा꣡णि꣢ । अ꣡प्र꣢꣯तिष्कुतः । अ । प्र꣣तिष्कुतः । जघा꣡न꣢ । न꣣वतीः꣢ । न꣡व꣢꣯ ॥१७९॥
स्वर रहित मन्त्र
इन्द्रो दधीचो अस्थभिर्वृत्राण्यप्रतिष्कुतः । जघान नवतीर्नव ॥१७९॥
स्वर रहित पद पाठ
इन्द्रः । दधीचः । अस्थभिः । वृत्राणि । अप्रतिष्कुतः । अ । प्रतिष्कुतः । जघान । नवतीः । नव ॥१७९॥
सामवेद - मन्त्र संख्या : 179
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 7;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 7;
Acknowledgment
भावार्थ - पूर्व दोन मंत्रांमध्ये रात्रीचे व तिच्या निवारणार्थ उषेच्या प्रादुर्भावाचे क्रमश: वर्णन केले गेलेले आहे. या मंत्रात रात्री उत्पन्न होणाऱ्या निशाचराच्या विनाशाचे वर्णन आहे, की इंद्र दध्यऽच्या हाडांनी त्यांना मारतो. हा इंद्र माणसाच्या शरीरात विद्यमान जीवात्मा व हृदयात स्थित परमात्मा आहे. दध्यऽमन आहे. त्या मनाच्या सात्त्विक वृत्तीरूपी हाडांनी त्या निशाचरांचा वध होतो ॥५॥
टिप्पणी -
या मंत्राच्या व्याख्येत विवरणकार माधवने या प्रकारे इतिहास प्रदर्शित केलेला आहे - कालकंज नावाचा असुर होता. त्या असुराकडून सतावलेले देव ब्रह्माजवळ पोचून म्हणाले - भगवान! कलकंज असुर आम्हाला त्रास देत आहेत, त्याला मारण्याचा उपाय करा. त्याने देवाला म्हटले - दधीचि नामक ऋषी आहे, त्याच्याजवळ जाऊन त्याला सांगा म्हणजे तो त्याला मारण्याचा उपाय सांगेल. हे ऐकून त्याप्रमाणे स्वीकार करण्यासाठी दधीचिजवळ ते पोचले व म्हणाले - भगवान, आमची अस्त्रे असुरांचा पुरोहित शुक्र चोरून घेतो तेव्हा आमचे रक्षण करा. तेव्हा ऋषीने म्हटले, ही अस्त्रे माझ्या मुखात घाला तेव्हा मरुद्गणांसहित इंद्र इत्यादी देवांनी त्यांच्या मुखात अस्त्रे घातली. नंतर जेव्हा देवासुरसंग्राम झाला तेव्हा देव ऋषीजवळ पोचले व अस्त्रे परत मागितली. तेव्हा ऋषी म्हणाले, ती अस्त्रे पचून गेली, ती पुन्हा मिळू शकत नाहीत. तेव्हा प्रजापती इत्यादी देव म्हणाले - भगवान, प्राणत्याग करा. हे ऐकून ऋषीने प्राणत्याग केला. तेव्हा दधीचिच्या अस्थींनी इंद्राने वृत्रांचा वध केला. सायणने शाट्यायनियांचा उल्लेख करत त्यांच्या नावाने इतिहास लिहिलेला आहे - अथर्वाचा पुत्र दधीचि जेव्हा जीवित होता तेव्हा त्यांच्या पाहण्यानेच असुर पराजित होत असत. नंतर जेव्हा ते स्वर्गवासी झाले तेव्हा भूमी असुरांनी भरून गेली. तेव्हा इंद्राने त्या असुरांशी युद्ध करण्यास असमर्थ वाटून जेव्हा त्या ऋषींचा शोध घेतला तेव्हा त्यांना कळले की ते स्वर्गवासी झाले. तेव्हा तेथील लोकांना विचारले, की त्या ऋषीचा एखादा अवयव उरलेला आहे का? तेव्हा लोकांनी म्हटले की त्यांचे घोड्यासारखे मस्तक शिल्लक आहे, ज्या मस्तकाने त्याने अश्विदेवांना मधुविद्येचे प्रवचन दिलेले होते, परंतु ते कुठे आहे हे आम्ही जाणत नाही, तेव्हा इंद्राने त्याचा शोध घेण्यास सांगितले. त्यांनी त्याचा शोध घेतला व शर्यणावत् सरोवरात, जे कुरुक्षेत्राच्या जघनार्था प्रवाहित होते ते घेऊन ते आले. त्याच्या डोक्याच्या अस्थींनी इंद्राने असुरांचा वध केला. काही नवीन पात्रांना कल्पित करून पुराणे, महाभारत इत्यादीमध्ये थोड्या थोड्या भेदाने या प्रकारच्या कथा वर्णिलेल्या आहेत. या सर्व कथा या मंत्राचा आधार घेऊन रचलेल्या, त्या वास्तविक नाहीत तर आलंकारिक आहेत. आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक क्षेत्रामध्ये सर्वत्र देवासुरसंग्राम चालतो. माणसाच्या मनात दिव्य प्रवृत्ती व आसुरी प्रवृत्तीचा संग्राम, आध्यात्मिक क्षेत्राचा संग्राम आहे. जसा आमच्याद्वारे या मंत्राच्या व्याख्येत स्पष्ट आहे. इंद्र परमेश्वर दध्यऽसूर्याच्या अस्थींनी अर्थात् अस्थिसदृश्य किरणांनी मेघांचा व रोग इत्यादीचा वध करतो ही आधिदैविक व्याख्या आहे. इंद्र राजा दध्यऽसेनापतीच्या अस्थींनी अर्थात् अस्थीप्रमाणे सृदृढ शस्त्रास्त्रांनी शत्रूंचा संहार करतो. ही अधिभूत व्याख्या आहे. वेदामध्ये दध्यऽनावाच्या कोणत्याही ऐतिहासिक मुनिविशेषाची गाथा असणे शक्यच नाही, कारण वेद सर्व ऐतिहासिक मुनीपूर्वीच विद्यमान होते व पूर्ववर्ती वेदात परवर्तीचा इतिहास कसा असू शकेल? ऋषी दयानंदानी ऋग्भाष्य (ऋ. १/८४/१३) मध्ये या मंत्राच्या व्याख्येत सूर्याच्या दृष्टांताने सेनापतीचे कृत्य वर्णित केलेले आहे. तेथे त्यांच्याद्वारे प्रदर्शित भावार्थ हा आहे - येथे वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. माणसांनी त्यालाच सेनापती बनवावे जो सूर्याप्रमाणे दुष्ट शत्रूंचा हंता व आपल्या सेनेचा रक्षक असावा ॥