Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 252
ऋषिः - देवातिथिः काण्वः
देवता - इन्द्रः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
य꣡था꣢ गौ꣣रो꣢ अ꣣पा꣢ कृ꣣तं꣢꣫ तृष्य꣣न्ने꣡त्यवे꣢रिणम् । आ꣣पित्वे꣡ नः꣢ प्रपि꣣त्वे꣢꣫ तूय꣣मा꣡ ग꣢हि꣣ क꣡ण्वे꣢षु꣣ सु꣢꣫ सचा꣣ पि꣡ब꣢ ॥२५२॥
स्वर सहित पद पाठय꣡था꣢꣯ । गौ꣣रः꣢ । अ꣣पा꣢ । कृ꣣त꣢म् । तृ꣡ष्य꣢न् । ए꣡ति꣢꣯ । अ꣡व꣢꣯ । इ꣡रि꣢꣯णम् । आ꣣पित्वे꣢ । नः꣣ । प्रपित्वे꣢ । तू꣡य꣢꣯म् । आ । ग꣣हि । क꣡ण्वे꣢꣯षु । सु । स꣡चा꣢꣯ पि꣡ब꣢꣯ ॥२५२॥
स्वर रहित मन्त्र
यथा गौरो अपा कृतं तृष्यन्नेत्यवेरिणम् । आपित्वे नः प्रपित्वे तूयमा गहि कण्वेषु सु सचा पिब ॥२५२॥
स्वर रहित पद पाठ
यथा । गौरः । अपा । कृतम् । तृष्यन् । एति । अव । इरिणम् । आपित्वे । नः । प्रपित्वे । तूयम् । आ । गहि । कण्वेषु । सु । सचा पिब ॥२५२॥
सामवेद - मन्त्र संख्या : 252
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 2;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 2;
Acknowledgment
भावार्थ - तृषित मृग जसा जलरहित मरुस्थल सोडून जलप्रचुर प्रदेशात जातो, तसेच प्रेमाची तृषा असणारा परमात्माही प्रीतिरहित हृदयांना सोडून ज्यांची हृदये प्रीतिरसांनी परिपूर्ण आहेत, अशा मेधावी जनांजवळ जातो. परमात्मा सर्वव्यापक असल्यामुळे त्याच्यात जाण्या-येण्याची क्रिया नसते. त्यामुळे वेदांमध्ये अनेक स्थानी वर्णित परमात्म्याच्या गमन-आगमनाची प्रार्थना अलंकारिक स्वरूपाची आहे, हे जाणले पाहिजे. गमनाने विस्मरण व आगमनाने त्याचे स्मरण हा आविर्भाव (प्रकट) लक्षित होतो ॥१०॥
टिप्पणी -
या दशतिमध्ये अंगाचे शरीरामध्ये यथास्थानी जोडणे इत्यादी इंद्राच्या कौशल्याचे वर्णन असल्यामुळे, त्याच्या गुणकर्मांचे वर्णन असल्यामुळे व इंद्र नावाने जीवात्मा, प्राण, शल्चचिकित्सक, राजा इत्यादींच्या चरित्राचे वर्णन असल्यामुळे या दशतिच्या विषयाची पूर्व दशतिच्या विषयाबरोबर संगती जाणली पाहिजे