Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 65
ऋषिः - बृहदुक्थो वामदेव्यः
देवता - अग्निः
छन्दः - त्रिष्टुप्
स्वरः - धैवतः
काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1
इ꣣दं꣢ त꣣ ए꣡कं꣢ प꣣र꣡ उ꣢ त꣣ ए꣡कं꣢ तृ꣣ती꣡ये꣢न꣣ ज्यो꣡ति꣢षा꣣ सं꣡ वि꣢शस्व । सं꣣वे꣡श꣢नस्त꣣न्वे꣢३꣱चा꣡रु꣢रेधि प्रि꣣यो꣢ दे꣣वा꣡नां꣢ पर꣣मे꣢ ज꣣नि꣡त्रे꣢ ॥६५॥
स्वर सहित पद पाठइ꣣द꣢म् । ते꣣ । ए꣡क꣢꣯म् । प꣣रः꣢ । उ꣣ । ते । ए꣡क꣢꣯म् । तृ꣣ती꣡ये꣢न । ज्यो꣡ति꣢꣯षा । सम् । वि꣣शस्व । संवे꣡श꣢नः । स꣣म् । वे꣡श꣢꣯नः । त꣡न्वे꣢꣯ । चा꣡रुः꣢꣯ । ए꣣धि । प्रियः꣢ । दे꣣वा꣡ना꣢म् । प꣣रमे꣢ । ज꣣नि꣡त्रे꣢ ॥६५॥
स्वर रहित मन्त्र
इदं त एकं पर उ त एकं तृतीयेन ज्योतिषा सं विशस्व । संवेशनस्तन्वे३चारुरेधि प्रियो देवानां परमे जनित्रे ॥६५॥
स्वर रहित पद पाठ
इदम् । ते । एकम् । परः । उ । ते । एकम् । तृतीयेन । ज्योतिषा । सम् । विशस्व । संवेशनः । सम् । वेशनः । तन्वे । चारुः । एधि । प्रियः । देवानाम् । परमे । जनित्रे ॥६५॥
सामवेद - मन्त्र संख्या : 65
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 7;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 7;
Acknowledgment
भावार्थ - पार्थिव अग्नी व सूर्यरूपी अग्नीमध्ये परमेश्वराची ज्योती प्रदीप्त होत आहे. असेही म्हटले जाते की - ‘अग्नीमध्ये परमेश्वररूपी अग्नी प्रविष्ट होऊन वावरत आहे.’ (ऋ. ४/३९/९) जो आदित्यामध्ये पुरुष बसलेला आहे, तो मी परमेश्वर आहे. (य. ४७/१७) त्याच्या तेजानेच हे सर्व चमकत आहे (कठ. ५/१५) त्यामुळे पार्थिव अग्नी व सूर्याग्नी दोन्ही परमात्म्याच्या ज्योती आहेत. परंतु परमेश्वराची वास्तविक तिसरी ज्योती त्याचे स्वत:चे स्वाभाविक तेज आहे. त्याच तेजाने भक्ताच्या आत्म्यात प्रवेश करून तो त्यांचे कल्याण करतो व शरीर, प्राण, मन, बुद्धी इत्यादींचे हित करतो. त्याच्या तिसऱ्या ज्योतीला प्राप्त करण्यासाठी योगाभ्यासाच्या विधीने सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. मंत्राच्या द्वितीय अर्थात जीवात्म्याला संबोधित केले गेलेले आहे. हे जीवात्म्या! तुझी एक ज्योती चक्षू, श्रोत्र इत्यादी आहे. दुसरी ज्योती मन आहे. जसे वेदात इतरत्र म्हटलेले आहे - प्राण्यांमध्ये सर्वात अधिक वेगवान एक मनरूपी ध्रुव ज्योति दर्शन करण्यासाठी निहित आहे. (ऋ. ६/९/५) परंतु या दोन्ही ज्योती साधनरूप आहेत. साध्यरूपी ज्योती तर तिसरी परमात्म ज्योतीच आहे. त्यासाठी त्यालाच प्राप्त करण्यासाठी प्राणपणाने यत्न कर ॥३॥
इस भाष्य को एडिट करें