Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 9
ऋषिः - भरद्वाजो बार्हस्पत्यः
देवता - अग्निः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
2
त्वा꣡म꣢ग्ने꣣ पु꣡ष्क꣢रा꣣द꣡ध्यथ꣢꣯र्वा꣣ नि꣡र꣢मन्थत । मू꣣र्ध्नो꣡ विश्व꣢꣯स्य वा꣣घ꣡तः꣢ ॥९॥
स्वर सहित पद पाठत्वा꣢म् । अ꣣ग्ने । पु꣡ष्क꣢꣯रात् । अ꣡धि꣢꣯ । अ꣡थ꣢꣯र्वा । निः । अ꣣मन्थत । मूर्ध्नः꣢ । वि꣡श्व꣢꣯स्य । वा꣣घ꣡तः꣢ ॥९॥
स्वर रहित मन्त्र
त्वामग्ने पुष्करादध्यथर्वा निरमन्थत । मूर्ध्नो विश्वस्य वाघतः ॥९॥
स्वर रहित पद पाठ
त्वाम् । अग्ने । पुष्करात् । अधि । अथर्वा । निः । अमन्थत । मूर्ध्नः । विश्वस्य । वाघतः ॥९॥
सामवेद - मन्त्र संख्या : 9
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 1;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 1;
Acknowledgment
भावार्थ - जसे अरणीच्या मंथनाने यज्ञवेदी-रूपी कमलपत्रावर यज्ञाग्नी उत्पन्न केला जातो, तसेच स्थितप्रज्ञ योग्यांना ध्यानरूपी मंथनाने कमलाकार मस्तकामध्ये परमात्मरूपी अग्नी प्रकट केला पाहिजे ॥९॥ विवरणकार माधवने या मंत्राच्या भाष्यात हा इतिहास लिहिलेला आहे - सर्वत्र भयंकर अंधकार पसरलेला होता, तेव्हा मातरिश्वा वायुला आकाशात सूक्ष्म अग्नी दिसला, त्याने व अथर्वा ऋषीने त्या अग्नीला मंथन करून प्रकट केले. त्याने केलेला मंत्रार्थ - साररूपाने या प्रकारे आहे - (अग्ने) हे अग्नि: । (अथर्वा) अर्थवा ऋषीने (त्वाम्) तुला (मूर्ध्न:) प्रधानभूत (पुष्कारात्) अंतरिक्षातून (विश्वस्य वाघत:) सर्व ऋत्विज् यजमानासाठी (निरमन्थत) अतिशरूपाने मंथन करून काढले. वास्तविक विवरणकार - प्रदत्त कथानक सृष्ट्युत्पत्ति प्रक्रियेत अग्नीच्या जन्माचा इतिहास समजला पाहिजे. आकाशानंतर वायु व वायुनंतर अग्नी हा उत्पत्ती क्रम आहे. आकाश उत्पन्न झाल्यावर आकाशात सूक्ष्मरूपाने अग्नी ही विद्यमान होता, त्याला अथर्वा परमेश्वराने पूर्वोत्पन्न वायुच्या साह्याने मंथन करून प्रकट केले. हा अभिप्राय ग्रहण केला पाहिजे.
टिप्पणी -
भरतस्वामीच्या भाष्याचा हा आशय आहे - अथर्वाने (मूर्ध्न:) धारक, (विश्वस्य वाघत:) सर्वांचा निर्वाहक (पुष्करात्) अंतरिक्षाद्वारे अथवा कमलपत्राद्वारे अग्नीला मंथन करून काढले.
सायणचा अर्थ - (अग्ने) हे अग्ने) हे अग्नी! (अथर्वा) अथर्वा नावाच्या ऋषीने (मूर्ध्न:) मूर्धाप्रमाणे धारक (विश्वस्य) सर्व जगाचा (वाघत:) वाहक (पुष्करात अधि) पुष्करपर्ण अर्थात् कमलपत्रावर (त्वाम्) तुझे (निरमन्थत) अरणीतून उत्पन्न केले. येथेही पुष्करपर्ण खरोखर कमलपत्र नाही, तर यज्ञवेदीचे आकाश आहे व अथर्वा स्थिर चित्ताने यज्ञ करणारा यजमान आहे जो यज्ञकुंडात अरणीनी अग्नी उत्पन्न करतो, हे तात्पर्य जाणावे. उव्वटने य. ११/३२ च्या भाष्यात जलच पुष्कर आहे.
प्राण अथर्वा आहे श. ४/२/२/२ हे शतपथ ब्राह्मणाचे प्रमाण दर्शवून मंत्रार्थ केलेला आहे. - हे अग्नी तुला (पुष्करात्) जलातून (अथर्वा) सतत गतिमान प्राणाने (निरमन्थत) मंथन करून उत्पन्न केलेले आहे, हाच अर्थ महीधरला अभिप्रेत आहे. येथे प्राण अर्थात् प्राणवान मनुष्य जल अर्थात मेघात स्थित असलेले जल व अग्नी अर्थात् विद्युत हे जाणले पाहिजे किंवा शरीरस्थ प्राण खान-पान झाल्यानंतर रसांद्वारे जीवनाग्नी उत्पन्न करतो, हे तात्पर्य समजले पाहिजे. महीधरने दुसरा वैकल्पिक अर्थ पुष्करपर्ण (कमलपत्र) च्या वर अग्नीचे मंथन असेच केलेले आहे. भाष्यकारांनी तात्पर्य प्रकाशित केल्याशिवायच या कथा लिहिलेल्या आहेत, ज्यामुळे भ्रम पसरलेला आहे. वास्तविक अथर्वा नावाच्या कुण्या ऋषीचा इतिहास या मंत्रात नाही. कारण वेदमंत्र ईश्वरप्रोक्त आहेत व सृष्टीच्या आरंभी प्रादुर्भूत झालेले आहेत. नंतरच्या ऋषी इत्यादींच्या कार्यकलापाचे पूर्ववर्ती वेदात वर्णन असू शकत नाही ॥९॥