Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 1
ऋषिः - भरद्वाजो बार्हस्पत्यः देवता - अग्निः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
2

अ꣢ग्न꣣ आ꣡ या꣢हि वी꣣त꣡ये꣢ गृणा꣣नो꣢ ह꣣व्य꣡दा꣢तये । नि꣡ होता꣢꣯ सत्सि ब꣣र्हि꣡षि꣢ ॥१॥

स्वर सहित पद पाठ

अ꣡ग्ने꣢꣯ । आ । या꣣हि । वीत꣡ये꣢ । गृ꣣णानः꣢ । ह꣣व्य꣡दा꣢तये । ह꣣व्य꣢ । दा꣣तये । नि꣢ । हो꣡ता꣢꣯ । स꣣त्सि । बर्हि꣡षि꣢ ॥१॥


स्वर रहित मन्त्र

अग्न आ याहि वीतये गृणानो हव्यदातये । नि होता सत्सि बर्हिषि ॥१॥


स्वर रहित पद पाठ

अग्ने । आ । याहि । वीतये । गृणानः । हव्यदातये । हव्य । दातये । नि । होता । सत्सि । बर्हिषि ॥१॥

सामवेद - मन्त्र संख्या : 1
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 1;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ - परमेश्वरपरक) हे (अग्ने) सर्वाग्रणी, सर्वज्ञ, सर्वव्यापी, सर्वसुखप्रापक, सर्वप्रकाशमय, सर्वप्रकाशक परमेश्वर, आपण आम्हा उपासकांना (गृणान:) आमच्या कर्तव्यांचा उपदेश करीत (वीतये) आमच्या प्रगतीकरीता आमच्या विचारात आणि कर्मात व्याप्त होण्याकरीता (आमच्या बुद्धीत व आचरणात केवळ तुमचेच ध्यान असावे, या करीता) तसेच आमच्या हृदयात सद्गुणांचा उदय होण्याकरीता आमच्याविषयी स्नेह असण्याकरीता (आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी) तसेच आमच्या हृदयात उत्पन्न होणाऱ्या काम-क्रोध आदी दुर्गुणांना बाहेर फेकून देण्यासाठी (या, हृदयी जागृत व्हा.) तसेच, हे प्रभो (हन्मदातये) सर्व देय पदार्थ, श्रेष्ठ बुद्धी श्रेष्ठ कर्म, श्रेष्ठ धन आदी प्रदान करण्यासाठी (आ याहि) या (होता) शक्तीने दाता व दौर्बल्याचे हर्ता होऊन आपण (बर्हिषि) आमच्या हृदयरूप अंतरिक्षात (नि, सत्सि) बसा. (हृदयात सदा निवास करा म्हणजे आम्हाला सदैव तुमच्या अस्तित्वाची जाणीव होत राहावी.) द्वितीय अर्थ : (विद्वानपरक) विद्वानास अग्नी म्हणतात. या द्वितीय अर्थात विद्वान मनुष्य अग्नी आहे. कारण की ऋताचा संग्रह कर्ता आणि सत्याचा ग्रहणकर्ता आहे. ऋ. ११४५/५ विद्वान अग्नी आहे, कारण तो शक्ति देवो. ऋ. ३|२५|२ इत्यादी मंत्र यात प्रमाण आहेत. - हे अग्ने विद्वान (गृणान:) आम्हा उपासकांना (वा यजमानांना) यज्ञाचा विधी आणि यज्ञापासून मिळणारे लाभ याविषयी उपदेश करीत (वीतये) यज्ञ कार्यात आम्हास प्रगती साधण्यासाठी आणि (हव्य दातये) यज्ञात हवी (द्रव्य) टाकण्यासाठी (आ याहि) आपण इथे (यज्ञस्थळी) या (होता) या होमाचे निष्पादक होऊन (बर्हिषि) कुशाने निर्मित या यज्ञासनावर (नि, सत्सि) असीन व्हा. अशाप्रकारे आम्ही यजमान करीत असलेल्या यज्ञाचे संचालक होऊन हा यज्ञ निरूपद्रवरूपाने संपन्न करा. (ही आपणास प्रार्थना. ।। तृतीय अर्थ : (राजापरक) राजालादेखील अग्नी म्हणतात. हा अर्थ घेण्याकरीता प्रमाण असे हे नायक, तुम्ही प्रजापालक, तसेच उत्तम दानी आहात. आपणास पुत्राजन आपला राज रूपाने अलंकृत वा सन्मानित करतात. ऋ. २१११८ राजा अग्नी आहे. तो राष्ट्ररूप गृहाचा स्वामी आणि राष्ट्ररूप यज्ञाचा ऋत्विज आहे. ऋ. ६।१५।१३। हे मंत्र या तृतीय अर्थासाठी प्रमाणभूत आहेत. हे (अग्ने) अग्रनायक राजा, आपण (गृणान:) राज्य शासनाचे नियम घोषित करीत (वीतये) राष्ट्रोभक्तीकरीता प्रजेवर आपले प्रभाव वा प्रताप दाखविण्याकरीता आणि प्रजेत राष्ट्र भावना व विद्या, न्याय आदि आवश्यक गुण उत्पन्न होण्याकरीता तसेच आन्तरीक व बाह्य शत्रूंना परास्त करण्यासाठी या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी जागरूक राहा. तसेच (हव्य दातये) राष्ट्रहित सर्वोच्च मानून आपल्या देह, मन, राजकोष आदी सर्व पदार्थांना हवि समजून त्याचे त्याग करण्यासाठी (आ याहि ) या म्हणजे तत्पर राहा. (होता.) राष्ट्रयज्ञाचे निष्पादक, संपन्न करणारे होऊन या राजसभेमध्ये (बर्हिषि) उच्च राजसिंहासनावर (नि सत्सि) समारूढ व्हा. ।। १ ।।

भावार्थ - जसा एक विद्वान पुरोहित यज्ञासनावर स्थानापन्न होऊन यज्ञाचे संचालन करतो, आणि जसा एक राजा राजसभेत कार्यरत राहून राष्ट्रोगती साधतो. तसेच परमात्मरूप अग्नी आमच्या हृदयान्तरिक्षात स्थित होऊन आमचे थोर कल्याण करू शकतो. पण याकरिता आम्ही त्याचे आवाहन केले पाहिजे. वास्तविक पाहता परमात्मा सर्वांच्या हृदयात आधीपासूनच विद्यमान विराजमान आहे, पण लोक त्यास विसरतात आणि म्हणूनच एकप्रकारे तो त्यांच्या हृदयात नसतो. यामुळे उपासक त्या परमेश्वराला पुन्हा पुन्हा बोलावीत आहेत. सारांश असा की, सर्वांनी परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव ठेवावी. आणि त्या हृदयस्थ परमेश्वरापासून सत्कर्म करण्याची प्रेरणा सतत घेत राहावी. ।।१।।

इस भाष्य को एडिट करें
Top