Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 106
ऋषिः - विश्वमना वैयश्वः
देवता - अग्निः
छन्दः - उष्णिक्
स्वरः - ऋषभः
काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
0
श्रु꣣꣬ष्ट्य꣢꣯ग्ने꣣ नव꣢स्य मे स्तो꣡म꣢स्य वीर विश्पते । नि꣢ मा꣣यि꣢न꣣स्त꣡प꣢सा र꣣क्ष꣡सो꣢ दह ॥१०६॥
स्वर सहित पद पाठश्रु꣣ष्टी꣢ । अ꣣ग्ने । न꣡व꣢꣯स्य । मे꣣ । स्तो꣡म꣢꣯स्य । वी꣣र । विश्पते । नि꣢ । मा꣣यि꣡नः꣢ । त꣡प꣢꣯सा । र꣣क्ष꣡सः । द꣣ह ॥१०६॥
स्वर रहित मन्त्र
श्रुष्ट्यग्ने नवस्य मे स्तोमस्य वीर विश्पते । नि मायिनस्तपसा रक्षसो दह ॥१०६॥
स्वर रहित पद पाठ
श्रुष्टी । अग्ने । नवस्य । मे । स्तोमस्य । वीर । विश्पते । नि । मायिनः । तपसा । रक्षसः । दह ॥१०६॥
सामवेद - मन्त्र संख्या : 106
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 11;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 11;
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात राक्षसांच्या विनाशासाठी प्रार्थना केली आहे -
शब्दार्थ -
हे (वीर) पराक्रमी (विपूपते) प्रजापालक (अग्ने) तेजस्वी परमात्मन् वा हे राजन्, आपण (मे) माझ्या (नवस्य) प्रशंसनीय अशा (स्तोमस्य) आंतरिक सद्वुणां रूप सैन्याच्या तसेच बाह्य योद्धाजनांच्या सैन्याच्या (तपसा) तेजाने (मायिनः) मायावी, कपटी (रक्षसा) राक्षसी भावनांना आणि राक्षसी कृतीच्या लोकांना (श्रुष्टी) लवकरच (नि दह) पूर्णतः भस्म करा. ।। १०।।
या मंत्रात अर्थश्लेष अलंकार आहे ।। १०।।
भावार्थ - जे कोणी पापरूप राक्षस अथवा पापीरूप मायावी राक्षस आम्हाला त्रास देतात, त्यांना आम्ही आपल्या शुभ मनोवृत्तीद्वारे आणि आपल्या बलशाली योद्धाजनांच्या साह्याने तसेच परमेश्वराच्या व राजाच्या साह्याने पराजित करावे आणि आंतरिक सुराज्य व बाह्य सुराज्याचा निश्चितपणे उपभोग घ्यावा (अशी आम्ही राष्ट्र पुरुष वा उपासक कामना व संकल्प करतो.) ।। १०।। या दशतीमध्ये अग्नी, पवमान व अदिति नावाने परमेश्वराचे स्मरण केले असून त्याच्यापासून धन, कीर्ती आदींचे याचना केली आहे. तसेच परमेश्वराला शत्रुविनाश, राक्षस दाह आदींची प्रार्थना केली असल्यामुळे या दशतीच्या विषयांची संमती पूर्व दशातीच्या विषयांशी आहे, असे जाणावे.।। ।। येथे द्वितीय प्रपाठकातील प्रथम अर्धाची प्रथम दशती समाप्त।। ।। प्रथम अध्यायातील अकरावा खंड समाप्त।।
इस भाष्य को एडिट करें