Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 112
ऋषिः - सौभरि: काण्व:
देवता - अग्निः
छन्दः - उष्णिक्
स्वरः - ऋषभः
काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
0
य꣡जि꣢ष्ठं त्वा ववृमहे दे꣣वं꣡ दे꣢व꣣त्रा꣡ होता꣢꣯र꣣म꣡म꣢र्त्यम् । अ꣣स्य꣢ य꣣ज्ञ꣡स्य꣢ सु꣣क्र꣡तु꣢म् ॥११२॥
स्वर सहित पद पाठय꣡जि꣢꣯ष्ठम् । त्वा꣣ । ववृमहे । देव꣢म् । दे꣢वत्रा꣢ । हो꣡ता꣢꣯रम् । अ꣡म꣢꣯र्त्यम् । अ । म꣣र्त्यम् । अस्य꣢ । य꣣ज्ञ꣡स्य꣢ । सुक्र꣡तु꣢म् । सु꣣ । क्र꣡तु꣢꣯म् ॥११२॥
स्वर रहित मन्त्र
यजिष्ठं त्वा ववृमहे देवं देवत्रा होतारममर्त्यम् । अस्य यज्ञस्य सुक्रतुम् ॥११२॥
स्वर रहित पद पाठ
यजिष्ठम् । त्वा । ववृमहे । देवम् । देवत्रा । होतारम् । अमर्त्यम् । अ । मर्त्यम् । अस्य । यज्ञस्य । सुक्रतुम् । सु । क्रतुम् ॥११२॥
सामवेद - मन्त्र संख्या : 112
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 12;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 12;
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात परमेश्वराचे आणि राजाचा स्वीकार वा अंगीकार करण्याविषयी वर्णन केले आहे -
शब्दार्थ -
प्रथम अर्थ (परमात्म पर) - हे अग्रणी परब्रह्म परमात्मन्, (मजिष्ठम्), ओपण सृष्टिरूप यज्ञाचे विधाता, सुख ऐश्वर्यादी दाता, सूर्य- पृथ्वी आदींचे संचालन, संगमन करविणारे (देवत्रा देवम्) प्रकाशमान सूर्य, विद्युत, चंद्र आदींना प्रकाश देणारे तसेच नेत्र, कर्ण, मन आदींना सर्वोत्तम प्रकाश देणारे आहात. अशा (होतारम्) मोक्ष सुख प्रदाता व (अभर्त्यम्) अमर असलेल्या आपणाला (अस्य यज्ञस्य) या ध्यान- यज्ञाचे (सुक्रतुम्) सुसंचालक, साफल्य प्रदाता म्हणून (त्वा) आपला आम्ही (उपासक गण) (ववृमहे) उपास्य देव म्हणून स्वीकार करतो. ।।
द्वितीय अर्थ - (राजापरक) हे अग्रगन्ता वीर पुरुष, (यजिष्ठम्) अतिशय परोपकार - यज्ञ करणाऱ्या (देवत्रा देवम्) दिव्यगुणयुक्त माणसात विशेषत्वाने अधिक गुण धारण करणाऱ्या (ोहतारम्) प्रजेला आनंद देणाऱ्या (अमर्त्यम्) अमर कीर्ती असलेल्या (त्वा) आपणास आम्ही प्रजानन (अस्य यज्ञस्य) या राष्ट्र यज्ञाचे (सुक्रतुम्) संचालक वा सुकर्ता म्हणून (ववृमहे) राजा पदासाठी निवडतो वा आपला स्वीकार करतो. ।। ६।।
या मंत्रात श्लेषालंकार आहे. ङ्गदेवं देवफ येथे छेकानुप्रास आहे. ।। ६।।
भावार्थ - जसे प्रजाजनांनी दिव्य गुण - कर्म- स्वभाव असलेल्या परमेश्वराला उपास्य देव म्हणून स्वीकारले पाहिजे, तद्वतच वीर परोपकारी, श्लाघ्य गुणवान, सुख प्रदाता, कीर्ती मान, सुशासक, शत्रु विजेता पुरुषाला राजा - पदावर अधिष्ठित करण्यासाठी निवडले पाहिजे. ।। ६।।
इस भाष्य को एडिट करें