Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 128
ऋषिः - श्रुतकक्षः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
मा꣡ न꣢ इन्द्रा꣣भ्या꣢३꣱दि꣢शः꣣ सू꣡रो꣢ अ꣣क्तु꣡ष्वा य꣢꣯मत् । त्वा꣢ यु꣣जा꣡ व꣢नेम꣣ त꣢त् ॥१२८॥
स्वर सहित पद पाठमा ꣢ । नः꣣ । इन्द्र । अभि꣢ । आ꣣दि꣡शः꣢ । आ꣣ । दि꣡शः꣢꣯ । सूरः꣢꣯ । अ꣣क्तु꣡षु꣢ । आ । य꣣मत् । त्वा꣢ । यु꣣जा꣢ । व꣣नेम । त꣢त् ॥१२८॥
स्वर रहित मन्त्र
मा न इन्द्राभ्या३दिशः सूरो अक्तुष्वा यमत् । त्वा युजा वनेम तत् ॥१२८॥
स्वर रहित पद पाठ
मा । नः । इन्द्र । अभि । आदिशः । आ । दिशः । सूरः । अक्तुषु । आ । यमत् । त्वा । युजा । वनेम । तत् ॥१२८॥
सामवेद - मन्त्र संख्या : 128
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 2;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 2;
Acknowledgment
शब्दार्थ -
हे (इन्द्र) परमवीर परमात्मा अथवा हे राजा, (आदिशः) कोणत्याही दिशेने (सूरः) मोका साधून हळूच शिरणारा काम, क्रोध आदी राक्षस गण अथवा चोरांची टोळी यांनी (अक्तुषु) अज्ञानरूप रात्रीमध्ये अथवा अंधाऱ्या रात्रीत (नः) आम्हावार वा आमच्या घरावर (मा अभि आ यमत्) आक्रमण करू नये (अशी कृपा करावा हे राजा, अशी व्यवस्था करा) त्या काम- क्रोधादी राक्षसांनी वा चोर- दरोडोखोरांनी यदा कदाचित आक्रमण केले, तर (त्वा) तुमच्यासारख्या (यजा)सहायकाच्या साह्याने आम्ही (तत्) त्या राक्षसांना व चोरांना (वनेम) नष्ट करू शकू वा त्यांचे समूळ उच्चाटन करण्यात यशस्वी होऊ, असे करा. ।। ४।।
भावार्थ - अज्ञानीधकारात सापडलेल्या या अंधाऱ्या रात्रीत झोपलेल्या आम्हा (नागरिकांवर) तसेच आम्हास बेसावध पाहून काम- क्रोध आदी मानसिक शत्रू अथवा चोर- दरेडोखोर आमच्यावर आक्रमण करून आम्हाला नष्ट करू पाहतील, तर आम्ही परमेश्वराच्या साह्याने मानसिक शत्रूंचा व राजाच्या साह्याने चोर आदी दुष्टांचा पूर्णपणे नायनाट करू ।। ४।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. ।। ४।।