Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 132
ऋषिः - वसिष्ठो मैत्रावरुणिः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0

व꣣य꣡मि꣢न्द्र त्वा꣣य꣢वो꣣ऽभि꣡ प्र नो꣢꣯नुमो वृषन् । वि꣣द्धी꣢ त्वा३꣱स्य꣡ नो꣢ वसो ॥१३२॥

स्वर सहित पद पाठ

व꣣य꣢म् । इ꣣न्द्र । त्वाय꣡वः꣢ । अ꣣भि꣢ । प्र । नो꣣नुमः । वृषन् । विद्धि꣢ । तु । अ꣣स्य꣢ । नः꣣ । वसो ॥१३२॥


स्वर रहित मन्त्र

वयमिन्द्र त्वायवोऽभि प्र नोनुमो वृषन् । विद्धी त्वा३स्य नो वसो ॥१३२॥


स्वर रहित पद पाठ

वयम् । इन्द्र । त्वायवः । अभि । प्र । नोनुमः । वृषन् । विद्धि । तु । अस्य । नः । वसो ॥१३२॥

सामवेद - मन्त्र संख्या : 132
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 2;
Acknowledgment

शब्दार्थ -
(वृषन्) अभीष्ट सुखांची, शक्तीची आणि धनाची वृष्टी करणाऱ्या (इन्द्र) हे परमैश्वर्यशाली, दुःखविदारक, शत्रुसंहारक परमात्मा (वयम्) आम्ही तुमचे उपासक (त्वायवः) तुम्हाला चाहणारे व तुमच्या प्रेमाच्या वशीभूत होऊन (अग्नि प्र नोनुमः) तुमची वारंवार उत्तम प्रकारे स्तुती करतो. हे (वसो) सर्वांच्या हृदयात बसणाऱ्या (असणारे) वा सर्वांना निवास वा स्थैर्य देणाऱ्या देवा, तुम्ही (अस्य) आण्ही गात असलेल्या या स्तोत्राला (विद्धि) जाणून समजून घ्या. ।। ८।।

भावार्थ - हे इन्द्र, हे परमैश्वर्यशाली, हे परमैश्वर्य प्रदाता, हे विपत्तिविदारक, हे धर्मप्रसारक, हे अधर्मविध्वंसक, हे मित्रसहायक, हे शत्रुुविनाशक, हे आनंदधारा प्रवाह, हे सद्वुणवृष्टिकारक, हे मनोरथ पूर्णकर्ता, हे हृदयस्थ, हे निवासक परमेश्वरा, तुझ्या प्रेमात मग्न झालेले तुझ्या प्राप्तीसाठी उत्सुक असलेले आम्ही तुझे उपासक वारंवार तुझी वंदना करीत आहोत. तुला प्रणाम करीत आहोत, तुझ्या गुणांचे कीर्तन करीत आहोत. आम्ही नतमस्तक होऊन करीत असलेल्या या वंदन, प्रणाम आणि गुणकीर्तनाला तू स्वीकार कर आणि आम्हाला उद्बोधित कर. ।। ८।।

इस भाष्य को एडिट करें
Top