Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 136
ऋषिः - त्रिशोकः काण्वः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0

इ꣣म꣡ उ꣢ त्वा꣣ वि꣡ च꣢क्षते꣣ स꣡खा꣢य इन्द्र सो꣣मि꣡नः꣢ । पु꣣ष्टा꣡व꣢न्तो꣣ य꣡था꣢ प꣣शु꣢म् ॥१३६॥

स्वर सहित पद पाठ

इ꣣मे꣢ । उ꣣ । त्वा । वि꣢ । च꣣क्षते । स꣡खा꣢꣯यः । स । खा꣣यः । इन्द्र । सो꣡मिनः꣢ । पु꣣ष्टा꣡व꣢न्तः । य꣡था꣢꣯ । प꣣शु꣢म् ॥१३६॥


स्वर रहित मन्त्र

इम उ त्वा वि चक्षते सखाय इन्द्र सोमिनः । पुष्टावन्तो यथा पशुम् ॥१३६॥


स्वर रहित पद पाठ

इमे । उ । त्वा । वि । चक्षते । सखायः । स । खायः । इन्द्र । सोमिनः । पुष्टावन्तः । यथा । पशुम् ॥१३६॥

सामवेद - मन्त्र संख्या : 136
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 3;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (इन्द्र) परमैश्वर्यवान परमेश्वरा, (इमे) (उ) हे (सोमिन्ः) भक्तिरसरूप सोमरस गाळणारे (तुमची भक्ती करणारे) (सखायः) तुझे सखा (उपासक) (त्वा) तुझी (विचक्षते) वाट पाहत आहेत. (पुष्टावन्तः) पशूसाठी उपयुक्त पौष्टीक गवत आदी खाद्य पदाथांचा संचय करणारे पशुपालक (यथा) ज्याप्रमाणे आपल्या (पशुम्) मौ आदी पशूंची (घरी परत येण्याची) वाट पाहतात (त्याप्रमाणए हे परमेश्वरा तुझे उपासक हृदयामध्ये तुझे ध्यान वा तुझी अनुभूती जागृत होण्याची वाट पाहतात. ।। २।।

भावार्थ - जसे पशूंसाठी खाद्य आदी तयार करून पशुपालक लोक (चरायला गेलेल्या आपल्या) गौ आदी पशूंची वाट पाहतात की त्यांनी सिद्ध केलेले खाद्य पदार्थ खाऊन त्या पदार्थांपेक्षा अधिक मूल्यवान दूध आदी पदार्थ पशूंनी त्या गोपालकांना द्यावेत, त्याचप्रमाणे भक्तिरसरूप सोमरस सिद्ध केलेले (भक्तीसाठी हृदयाची अनुकूलता प्राप्त केलेले) उपासक गण परमेश्वराची वाट पाहतात, यासाठी की परमेश्वराने त्यांच्या हृदय सदनी प्रवेश करून म्हणजे (पूर्वीच उपस्थित पण भक्ताच्या विस्मरण शीलतेमुळे आवृत असलेल्या परमेश्वराने) त्यांच्या भक्तिरसाचे रसपान करावे आणि त्या भक्ति रसापेक्षा सहस्त्र पटीने मूल्यवान आनन्दरूप दूध आम्हा उपासकांना द्यावे. ।। २।।

इस भाष्य को एडिट करें
Top