Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 147
ऋषिः - गोतमो राहूगणः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0

अ꣢꣫त्राह꣣ गो꣡र꣢मन्वत꣣ ना꣢म꣣ त्व꣡ष्टु꣢रपी꣣꣬च्य꣢꣯म् । इ꣣त्था꣢ च꣣न्द्र꣡म꣢सो गृ꣣हे꣢ ॥१४७॥

स्वर सहित पद पाठ

अ꣡त्र꣢꣯ । अ꣡ह꣢꣯ । गोः । अ꣣मन्वत । ना꣡म꣢꣯ । त्व꣡ष्टुः꣢꣯ । अ꣣पीच्य꣢꣯म् । इ꣣त्था꣢ । च꣣न्द्र꣡म꣢सः । च꣣न्द्र꣢ । म꣣सः । गृहे꣢ ॥१४७॥


स्वर रहित मन्त्र

अत्राह गोरमन्वत नाम त्वष्टुरपीच्यम् । इत्था चन्द्रमसो गृहे ॥१४७॥


स्वर रहित पद पाठ

अत्र । अह । गोः । अमन्वत । नाम । त्वष्टुः । अपीच्यम् । इत्था । चन्द्रमसः । चन्द्र । मसः । गृहे ॥१४७॥

सामवेद - मन्त्र संख्या : 147
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 4;
Acknowledgment

शब्दार्थ -
प्रथम अर्थ (सूर्यापासून चंद्राचे प्रकाशित होणे). (त्वष्टुः) विच्छेदक (किरणांचे विच्छेदन वा विभाजन करण्यास समर्थ) आणि आपल्या प्रकाशाद्वारे अतिशीघ्र व्याप्त होणाऱ्या वा शीघ्र गतीने जाणाऱ्या देदीप्यमान सूर्याच्या (गोः) सुषुम्ण नाम रश्मीच्या (अत्र इह) इथे (चन्द्रमसः) (गृहे) चंद्रमंडळात (अपीच्यम्) प्रच्छन्नरूपाने (नाम) अवस्थानाला विद्वान जन (इत्था) सत्य रूपाने (अमन्वत) मानतात. म्हणजे चंद्रमा सूर्यामुळे प्रकाशित होतो, हे रहस्य विवज्जन पूर्णरूपेण जाणतात. ।। विरुक्तात म्हटले आहे की सूर्याचा एक रश्मिसमूह चन्द्राकडे जाऊन त्याला प्रकाशित करतो, म्हणजे आदित्यामुळेच चंद्राची दीप्ती आहे. वेदांतदेखील सांगितले आहे की ‘‘सुषुम्ण नावाच्या काही सूर्यरश्मी आहेत, चंद्र त्या रश्मी धारण करतो, म्हणून तो गन्धर्व आहे.’’ (यजु. १८/ ४०) ‘अत्रा’ गोरमन्वत’ आदी मंत्रांमध्ये ‘गोः’ शब्द चन्द्राला प्रकाशित करणाऱ्या त्या सुषुम्ण नाम रश्मीसाठीच आला आहे. द्वितीय अर्थ - (परमात्मपर) (त्वष्टुः) दुःख विच्छेदक सर्वत्र व्यापक, तेजोमय आणि जगमिर्माता इन्द्र नाम परमेश्वराच्या (गोः) दिव्य प्रकाश रश्मीच्या (अत्र इह) इथे (चन्द्रभसः) (गृहे) मनरूप चंद्राच्या निवास स्थानात म्हणजे हृदयात (अपीच्यं नाम) आगमनाला उपासक गण (इत्था) सत्य रूपाने (अमन्वत) अनुभवतात. ।। ३।।

भावार्थ - ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशाने चंद्र प्रकाशित होतो. तद्वत परमेश्वराच्या प्रकाशाने स्तुतिकर्त्याचे हृदय प३काशित होतात. ।। ३।।

इस भाष्य को एडिट करें
Top