Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 149
ऋषिः - बिन्दुः पूतदक्षो वा आङ्गिरसः देवता - मरुतः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0

गौ꣡र्ध꣢यति म꣣रु꣡ता꣣ꣳ श्रव꣣स्यु꣢र्मा꣣ता꣢ म꣣घो꣡ना꣢म् । यु꣣क्ता꣢꣫ वह्नी꣣ र꣡था꣢नाम् ॥१४९॥

स्वर सहित पद पाठ

गौः꣢ । ध꣣यति । मरु꣡ता꣢म् । श्र꣣वस्युः꣢ । मा꣣ता꣢ । म꣣घो꣡ना꣢म् । यु꣣क्ता꣢ । व꣡ह्निः꣢꣯ । र꣡था꣢꣯नाम् ॥१४९॥


स्वर रहित मन्त्र

गौर्धयति मरुताꣳ श्रवस्युर्माता मघोनाम् । युक्ता वह्नी रथानाम् ॥१४९॥


स्वर रहित पद पाठ

गौः । धयति । मरुताम् । श्रवस्युः । माता । मघोनाम् । युक्ता । वह्निः । रथानाम् ॥१४९॥

सामवेद - मन्त्र संख्या : 149
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 4;
Acknowledgment

शब्दार्थ -
प्रथम अर्थ (भूमीपर) - (मघोनाम्) ऐश्वर्यवान (मरुताम्) मनुष्यांना (श्रवस्युः) जणू काय अन्न देण्याच्या इच्छेने ही (माता) माता (गौः) भूमी (धयति) वर्षाजल पीठ असते. तसेच (युक्ता) सूर्याशी सम्बद्ध होऊन (रथानाभ्) गतिमान अग्नी, वायू, जल, पशू, पक्षी, मनुष्यादी प्राण्यांना (वहिृः) एका स्थानावरून दुसऱ्या स्थानाकडे नेणारी होते. (भूमी पोटात पाणी साठवून आणि सूर्याकडून ऊर्जा घेऊन अग्नी आदी तत्त्वाना व प्राण्यांना जीवन देते. त्यांना गतीमान बनवते.)।। द्वितीय अर्थ - (गौपर) - (मघोनाम्) यज्ञरूप ऐश्वर्याने समृद्ध (मरुताम्) यज्ञ करणाऱ्या लोकांसाठी (माता) (गौः) ही मातृरूप गाय (श्रवस्युः) त्यांना दूध - घृत प्रदान करण्याच्या इच्छेने (धयति) स्वतः आपल्या पोटात स्वच्छ पाणी धारण करते. तसेच (युक्ता) यज्ञ कार्यासाठी नियुक्त ती गाय (रथानाम्) यज्ञरूप रथाला (बहिृः) जालवणारी म्हणजे यज्ञ पूर्ततेसाठी साधनरूप असते. तृतीय अर्थ - (विद्युत पक्षी) (मघोनाम्) साधन संपन्न (मरुताम्) मनुष्यांना (श्रवस्युः) जणू काय धन देण्याच्या इच्छेने (माता) निर्माण शक्ती असणारी (गौः) अंतरिक्षात स्थित विद्युत (धयति) मेघ जल पिते आणि (युक्ता) जेव्हा तिचा उपयोग शिल्प काया४त (उद्योग, यंत्रादी कार्यात) केला जातो, तेव्हा ती (रथानाम्) कलायंत्र (मशीन) भूयान (मोटार आदी) जलयान, विमान आदी प्रवास साधने (धयति) चालवणारी असते. (विद्युतेमुळे उद्योग, उत्पादन, प्रवास आदी कार्ये शक्य होतात.) चतुर्थ अर्थ - (वाणीपर) - (मधोनाम्) मन, बुद्धी, प्राण, इंद्रिये आदी ऐश्वर्याने संपन्न अशा (भरुताम्) मनुष्यांना (श्रवस्युः) जणू काय अन्न, धन, विद्या, कीर्ती प्रदान करण्याच्या इच्छेने (माता) (गौः) माता वेदवाणी (धयति) ज्ञानरस धारण करीत आहे आणि तो रस इच्छुक जिज्ञासूजनांना देत असते. (युक्ता) अध्ययन - अध्यात्म काळात उपयोगात आणल्यामुळे ती वेदवाणी (रथानाम्) रमणीय आयु, प्राण, प्रजा, पशू, कीर्ती, धन, ब्रह्मवर्चस आदींची (बहिृः) प्राप्ती करविणारी होते. ।। ५।।

भावार्थ - इन्द्र परमेश्वराद्वारे निर्मित या पृथ्वी, गौ, विद्युत, वेदवाणीरूप गायींचा उपयोग करून सर्व मनुष्यांनी आपली आध्यात्मिक, शारीरिक, बौद्धिक, वैज्ञानिक, याज्ञिक, सामाजिक आणि राष्ट्रीय उन्नती साधली पाहिजे. ।। ५।।

इस भाष्य को एडिट करें
Top