Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 162
ऋषिः - कुसीदी काण्वः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
य꣡ इ꣢न्द्र चम꣣से꣡ष्वा सोम꣢꣯श्च꣣मू꣡षु꣢ ते सु꣣तः꣢ । पि꣡बेद꣢꣯स्य꣣ त्व꣡मी꣢शिषे ॥१६२॥
स्वर सहित पद पाठयः꣢ । इ꣢न्द्र । चमसे꣡षु꣢ । आ । सो꣡मः꣢꣯ । च꣣मू꣡षु꣢ । ते꣣ । सुतः꣢ । पि꣡ब꣢꣯ । इत् । अ꣣स्य । त्व꣢म् । ई꣣शिषे ॥१६२॥
स्वर रहित मन्त्र
य इन्द्र चमसेष्वा सोमश्चमूषु ते सुतः । पिबेदस्य त्वमीशिषे ॥१६२॥
स्वर रहित पद पाठ
यः । इन्द्र । चमसेषु । आ । सोमः । चमूषु । ते । सुतः । पिब । इत् । अस्य । त्वम् । ईशिषे ॥१६२॥
सामवेद - मन्त्र संख्या : 162
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 5;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 5;
Acknowledgment
विषय - आता इन्द्र या नावाने परमेश्वर, जीवात्मा आणि राजा यांच्याविषयी सांगितले जात आहे -
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (परमात्मपर व जीवात्मापर) हे (इन्द्र) दुःखविदारक, सुखप्रदाता परमात्मा अथवा हे शक्तिशाली जीवात्मा, (यः) जो हा (सोमः) भक्तिरस / वा ज्ञानरस व कर्मरस (चमसेषु) ज्ञानेन्द्रियात व कर्मेन्द्रियरूप चमसपात्रात आणि (चमूषु) प्राण- मन- बुद्धिरूप अधिववण फलकात (रस गाळून ज्या पात्रात भरला जातो) त्या अधिषवण पात्रात (आ सुतः) चारही बाजूने गाळून तयार केला आहे. (हृदयात भक्तिभावाचा उत्कर्ष वा अतिशय आनंद भरलेला आहे) (तम्) तो (पिव इत् रस तुम्ही अवश्य सेवन करा (हे परमात्मा, तुम्ही भक्तीचा स्वीकार करा आणि हे जीवात्मा, तू त्या आनंदाचा तीव्रतेने अनुभव कर) (अस्म) या भक्तिरसाचा आणि / या ज्ञान, कर्म रसाचा हे परमात्मा, हे जीवात्मा / (त्वम्) तुम्ही / तू (ई शिषे) स्वामी आहेस.।।
द्वितीय अर्थ - (राजापर) (इन्द्र) शत्रू दलन करण्यास समर्थ असे हे पराक्रमशाली राजा, (चमसेषु) मेघाप्रमाणे ज्ञानाची वृष्टी करणाऱ्या ब्राह्मणात आणि (चमुषु) तुमच्या ७त्रिय सैन्यात (सोमः) ब्रह्मरूप / क्षत्ररूप (यः) जो (ते) तुमच्यासाठी सोमरस (आसुतः) गाळलेला वा तयार केलेला आहे. (राष्ट्रातील ब्राह्मण व क्षत्रिय तुमच्या सेवा- सहकार्यासाठी सदैव तत्पर आहेत) त्या रसाचे (पिव इत्) पान करा म्हणजे आपणही ब्रह्मवत आणि क्षत्रिय बलाने समृद्ध व्हा. (अस्य) या ब्रह्मक्षत्ररूप सोमरसाचे (त्वम्) तुम्ही (ईशिषे) अदीश्वर व्हा. ।। ८।।
भावार्थ - जर परमेश्वर स्तुति करणाऱ्यांच्या भक्तिरूप सोमरसाचा स्वीकार करील, जीवात्मा ज्ञान व कर्मरूप सोमरसाचा पान करील आणि राजा ब्रह्म क्षत्ररूप कोमरसाचे सेवन करील, तर स्तोता, जीव आणि राष्ट्राचे मोठे कल्याण होऊ शकते. ।। ८।।
इस भाष्य को एडिट करें