Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 164
ऋषिः - मधुच्छन्दा वैश्वामित्रः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0

आ꣢꣫ त्वेता꣣ नि꣡ षी꣢द꣣ते꣡न्द्र꣢म꣣भि꣡ प्र गा꣢꣯यत । स꣡खा꣢यः꣣ स्तो꣡म꣢वाहसः ॥१६४॥

स्वर सहित पद पाठ

आ꣢ । तु । आ । इ꣣त । नि꣢ । सी꣣दत । इ꣡न्द्र꣢꣯म् । अ꣣भि꣢ । प्र । गा꣣यत । स꣡खा꣢꣯यः । स । खा꣣यः । स्तो꣡म꣢꣯वाहसः । स्तो꣡म꣢꣯ । वा꣣हसः ॥१६४॥


स्वर रहित मन्त्र

आ त्वेता नि षीदतेन्द्रमभि प्र गायत । सखायः स्तोमवाहसः ॥१६४॥


स्वर रहित पद पाठ

आ । तु । आ । इत । नि । सीदत । इन्द्रम् । अभि । प्र । गायत । सखायः । स । खायः । स्तोमवाहसः । स्तोम । वाहसः ॥१६४॥

सामवेद - मन्त्र संख्या : 164
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 5;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (स्तोम वाहसः) उपास्य देव (इन्द्र परमेश्वरा प्रत स्तोत्र गाणाऱ्या अथवा जनतेचे नेतृत्व करणाऱ्या माझ्या (सखायः) मित्रांनो, तुम्ही (तु) त्वरित (आ इत) इकडे या (आ निषीदल) इथे येऊन उपासनेसाठी वा राष्ट्रोत्थानासाठी एकत्र बसा. (इन्द्रम्) परमैश्वर्यवान, दुःखविदारक, सुखदायक परमेश्वराला (अभि) उद्देशून (प्र गायन) स्तुती गीत गा ।। १०।।

भावार्थ - सर्वांनी उपासना गृहात एकत्र होऊन दुःखभंजक, सुखोत्पादक इन्द्र परमेश्वराप्रत साम- गीत गायिले पाहिजेत. तसेच राष्ट्रोन्नतीसाठी कृत संकल्प होऊन व कटिबद्ध होऊन राष्ट्रगीत गायिले पाहिजे. ।। १०।। या दशतीध्ये इन्द्र नावाने परमेश्वराचे गुण- कर्म- वर्णन करीत त्याच्या स्तुतीसाठी गीत गाण्यासाठी प्रेरणा केली आहे. तसेच त्याला भक्तिरस व कर्मरूप सोमरस अर्पित करण्यासाठी जनांना प्रेरित केले आहे. तसेच उपासकांद्वारे इन्द्राचे आवाहन केले असल्यामुळे या दशतीच्या विषयांची संगती पूर्वीच्या दशतीच्या संगतीशी आहे, असे जाणावे. ।। १०।। द्वितीय प्रपाठकातील द्वितीय अर्धातील द्वितीय दशति समाप्त. द्वितीय अध्यायातील पंचम खंड समाप्त

इस भाष्य को एडिट करें
Top