Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 184
ऋषिः - उलो वातायनः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
वा꣢त꣣ आ꣡ वा꣢तु भेष꣣ज꣢ꣳ श꣣म्भु꣡ म꣢यो꣣भु꣡ नो꣢ हृ꣣दे꣢ । प्र꣢ न꣣ आ꣡यू꣢ꣳषि तारिषत् ॥१८४॥
स्वर सहित पद पाठवा꣡तः꣢꣯ । आ । वा꣢तु । भेषज꣢म् । शं꣣म्भु꣢ । श꣣म् । भु꣢ । म꣣योभु꣢ । म꣣यः । भु꣢ । नः꣣ । हृदे꣢ । प्र । नः꣣ । आ꣡यूँ꣢꣯षि । ता꣣रिषत् ॥१८४॥
स्वर रहित मन्त्र
वात आ वातु भेषजꣳ शम्भु मयोभु नो हृदे । प्र न आयूꣳषि तारिषत् ॥१८४॥
स्वर रहित पद पाठ
वातः । आ । वातु । भेषजम् । शंम्भु । शम् । भु । मयोभु । मयः । भु । नः । हृदे । प्र । नः । आयूँषि । तारिषत् ॥१८४॥
सामवेद - मन्त्र संख्या : 184
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 7;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 7;
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात वाता (वायू)पासून औषधीची कामना केली आहे -
शब्दार्थ -
(आम्ही ईश - उपासक कामना करीत आहोत की) (वाता) वायूचे संचालन- प्रवहण करणारा परमेश्वर अथवा परमेश्वराद्वारे रचित वायू आणि प्राण (भेषजम्) औषधी (आवातु) प्राप्त करू दे (आमच्यासाठी औषधी- वनस्पती आदी उत्पन्न करू दे) कारण की (यत्) तो वायू (नः) आमच्या (हृदे) हृदयासाठी (शम्भु) रोगशमन करणारा व (मयोभुः) सुखकारक होवोत. तो परमेश्वर, वायू आणि आमची प्राणशक्ती हे सर्व (नः) आमचे (आयूंषि) आयुष्य (प्रतारिषत्) वाढविणारे होवोत.।। १०।।
भावार्थ - ईश्वर प्रणिधानपूर्वक प्राणायाम केल्याने चित्तशुद्धी होऊन हृदयास शक्ती आणि शरीराला आरोग्य व दीर्घायुष्य मिळते. ।। १०।। या दशतीमध्ये इन्द्र परमेश्वराच्या साह्याने अविद्या, अधर्म आदी रूप अंधाकाराने भरलेल्या रात्रीचे निवारण, दिव्य उषेचा प्रादुर्भाव, इन्द्रद्वारे वृत्राचा संहार, परमात्मा, वायू आणि प्राण यांच्याद्वारे औषध प्राप्ती, तसेच राजा आणि आचार्य यांच्या यथोचित योगदानाचे वर्णऩ आहे. यामुळे या दशतीच्या विषयांशी मागील दशतीच्या विषयांची संमती आहे, असे जाणावे. ।। द्वितीय प्रपाठकातील द्वितीय अर्धाची चतुर्थ दशती समाप्त. द्वितीय अध्यायातील सप्तम खण्ड समाप्त.
विशेष -
या मंत्रात श्लेषालंकार आहे. ‘वात, वातु’ या शब्दात छेकानुप्रास आहे.।। १०।।