Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 187
ऋषिः - वत्सः काण्वः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
इ꣣मा꣡स्त꣢ इन्द्र꣣ पृ꣡श्न꣢यो घृ꣣तं꣡ दु꣢हत आ꣣शि꣡र꣢म् । ए꣣ना꣢मृ꣣त꣡स्य पि꣣प्यु꣡षीः꣢ ॥१८७॥
स्वर सहित पद पाठइ꣣माः꣢ । ते꣣ । इन्द्र । पृ꣡श्न꣢꣯यः । घृ꣣त꣢म् । दु꣣हते । आशि꣡र꣢म् । आ꣣ । शिर꣢꣯म् । ए꣣ना꣢म् । ऋ꣣त꣡स्य꣢ । पि꣣प्यु꣡षीः꣢ ॥१८७॥
स्वर रहित मन्त्र
इमास्त इन्द्र पृश्नयो घृतं दुहत आशिरम् । एनामृतस्य पिप्युषीः ॥१८७॥
स्वर रहित पद पाठ
इमाः । ते । इन्द्र । पृश्नयः । घृतम् । दुहते । आशिरम् । आ । शिरम् । एनाम् । ऋतस्य । पिप्युषीः ॥१८७॥
सामवेद - मन्त्र संख्या : 187
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 8;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 8;
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात इन्द्राच्या प्रश्नी काय करतात, याविषयी सांगितले आहे -
शब्दार्थ -
या मंत्राचे तीन विषयांपर अर्थ आहेत. प्रथम अर्थ (यज्ञपर) - हे (इन्द्र) गोपालक यजमान, (ऋतस्य) यज्ञाता (पिप्युषी) वाढविणाऱ्या (इमा) या ज्या (ते) तुझ्या (पृश्वयः) यज्ञासाठी उपयोगी (वस्तू प्रदान करणाऱ्या) विविध रंगांच्या गायी आहेत, त्या (घृतम्) तूप आणि (एनाम् उपशिरम्) हे दूध आदी पदार्थ (दुहते) आम्हाला देतात. ।।
द्वितीय अर्थ - (अध्यात्मपर) - हे (इन्द्र) जीवात्मा, (ऋतस्य) सत्य (रूप दूध) (पिप्यूषीः) पाजविणाऱ्या (इमाः) या (पृश्वयः) वेद माता (ते) तुझ्याकरिता (घृतम्) तेजरूप घृत अर्थात ब्रह्मर्यवर्चस् नाम तेज व (एनाम्) (आशिरम्) हे परिपक्व आयु, प्राण, प्रजा, पशू, कीर्ती, विद्या आदी रूप दूध (दुहते) प्रदान करतात. ।।
तृतीय अर्थ - (वृष्टिपर) - हे (इन्द्र) परमात्मा, (इमाः) हृी तुम्ही निर्माण केलेली (प्रशनय) रंगी-बेरंगी मेघमाला (आशिरम्) सूर्याच्या उष्णतेमुळे वाष्यरूप झालेले (घृतम्) जल (दुहते) आम्हाला देते आणि (एनाम्) ही भूमी (ऋतस्य) वृष्टिजल (पिप्युषीः) देणारी होते. ।। ३।।
भावार्थ - ज्याप्रमाणे यजमानाच्या गायी यज्ञासाठी घृत, दुग्ध आदी पदार्थ आम्हास देतात, तसेच जसे मेघमंडळ कृषीकरिता वृष्टिजल देते, त्याचप्रमाणे वेदमाता जीवात्म्यासाठी ब्रह्मतेज रूप घृत आणि आयु, प्राण आदी रूप दूध प्रदान करते. ।। ३।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. ।। ३।।