Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 19
ऋषिः - प्रयोगो भार्गवः
देवता - अग्निः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
0
अ꣣ग्नि꣡मि꣢न्धा꣣नो꣡ मन꣢꣯सा꣣ धि꣡य꣢ꣳ सचेत꣣ म꣡र्त्यः꣢ । अ꣣ग्नि꣡मि꣢न्धे वि꣣व꣡स्व꣢भिः ॥१९॥
स्वर सहित पद पाठअ꣣ग्नि꣢म् । इ꣣न्धानः꣢ । म꣡न꣢꣯सा । धि꣡य꣢꣯म् स꣣चेत । म꣡र्त्यः꣢꣯ । अ꣣ग्नि꣢म् । इ꣣न्धे । वि꣣व꣡स्व꣢भिः । वि꣣ । व꣡स्व꣢भिः ॥१९॥
स्वर रहित मन्त्र
अग्निमिन्धानो मनसा धियꣳ सचेत मर्त्यः । अग्निमिन्धे विवस्वभिः ॥१९॥
स्वर रहित पद पाठ
अग्निम् । इन्धानः । मनसा । धियम् सचेत । मर्त्यः । अग्निम् । इन्धे । विवस्वभिः । वि । वस्वभिः ॥१९॥
सामवेद - मन्त्र संख्या : 19
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 2;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 2;
Acknowledgment
विषय - ईश्वराच्या आराधने व्यतिरिक्त कर्म वा पुरुषार्थही केला पाहिजे, असे सांगतात. -
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ - परमात्मपरक) (मनसा) मनाने (अग्निम्) हृदयात दडून बसलेल्या परमात्मरूप अग्नीला (इन्धान:) प्रदीप्त करीत म्हणजे प्रकट करीत (मर्त्य:) मरणधर्मा मनुष्याने (धियम) कर्माचे (सचेत) सेवन करावे. (प्रार्थनेबरोबरच मनुष्याने पुरुषार्थदेखील अवश्य केला पाहिजे.) हीच वैदिक प्रेरणा वा उपदेश आहे. त्या प्रेरणेने प्रेरित होऊन मी (एक उपासक) (विवस्वभि:) अज्ञान उद्ध्वस्त करणाऱ्या आदित्याप्रमाणे भासमान मनोवृत्तीद्वारे (अग्निम्) ज्योतिर्मय परमात्म अग्नीला तसेच कर्मरूप अग्नीला (इन्द्रे) प्रदीप्त करतो, हृदयात प्रकट करतो. ।।९।।
द्वितीय अर्थ : (यज्ञाग्नीपरक) या मंत्रात यज्ञाविषयी प्रेरणा केली आहे. (मनसा) संपूर्ण श्रद्धेसह (अग्निम्) यज्ञाग्नी (इन्धान:) प्रज्वलित करताना (मर्त्य:) यजमान मनुष्याने (धियम्) यज्ञविधींचेदेखील (सचेत) पालन करावे. हा वेदांचा आदेश आहे. त्याप्रमाणे मी देखील यज्ञकर्म करण्यासाठी (विवस्वभि:) प्रात:काळी सूर्यकिरणांच्या उदयकाळी (अग्निम्) यज्ञाग्नी (इन्धे) प्रदीप्त करतो. या कथनाने असे सूचित होत आहे की, प्रात:काळी यज्ञाची वेळ ती जाणावी. जेव्हा सूर्यकिरणांचा प्रथम उदय होतो. ।।९।।
भावार्थ - येथे मर्त्य हा शब्द साभिप्राय म्हणजे हेतुत: वापरला आहे. माणूस मरणधर्मा आहे. कोण सांगावे, केव्हा मृत्यू येऊन झडप घालील. यामुळे जसे मनुष्य यज्ञकर्म करण्यासाठी अग्नी प्रज्वलित करतो, तसेच याच जन्मी योगाभ्यासाद्वारे हृदयी परमेश्वराला प्रकाशित करून आजन्म अग्निहोत्र आदी कर्म आणि समाजसेवा आदी उत्तम कर्मे मनुष्याने अवश्य करावीत. मनुष्याने असा विचार करू नये की आता परमेश्वराचा साक्षात्कार संपन्न केला आहे, मग कर्म करण्याचे काय प्रयोजन? कारण (यजु. ४०/२) मंत्रात म्हटले आहे. कर्म करीतच शंभर वर्ष जगण्याची इच्छा करावी. वैदिक मार्गदेखील हाच आहे. ।।९।।
विशेष -
या मंत्रात श्लेषालंकार आहे. ।।९।।