Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 192
ऋषिः - सत्यधृतिर्वारुणिः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0

म꣡हि꣢ त्री꣣णा꣡मव꣢꣯रस्तु द्यु꣣क्षं꣢ मि꣣त्र꣡स्या꣢र्य꣣म्णः꣢ । दु꣣राध꣢र्षं꣣ व꣡रु꣢णस्य ॥१९२॥

स्वर सहित पद पाठ

म꣡हि꣢꣯ । त्री꣣णा꣢म् । अवरि꣡ति꣢ । अ꣣स्तु । द्युक्ष꣢म् । द्यु꣣ । क्ष꣢म् । मि꣣त्र꣡स्य꣢ । मि꣣ । त्र꣡स्य꣢꣯ । अ꣣र्यम्णः꣢ । दु꣣रा꣡धर्ष꣢म् । दुः꣣ । आध꣡र्ष꣢म् । व꣡रु꣢꣯णस्य ॥१९२॥


स्वर रहित मन्त्र

महि त्रीणामवरस्तु द्युक्षं मित्रस्यार्यम्णः । दुराधर्षं वरुणस्य ॥१९२॥


स्वर रहित पद पाठ

महि । त्रीणाम् । अवरिति । अस्तु । द्युक्षम् । द्यु । क्षम् । मित्रस्य । मि । त्रस्य । अर्यम्णः । दुराधर्षम् । दुः । आधर्षम् । वरुणस्य ॥१९२॥

सामवेद - मन्त्र संख्या : 192
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 8;
Acknowledgment

शब्दार्थ -
प्रथम अर्थ (अध्यात्म व अधिदैवतपर) - या ऋचेची देवता इन्द्र असल्यामुळे येथे इंद्राला संबोधून म्हटेल आहे, असे जाणावे. हे (इन्द्र) परमेश्वर्यशाली परमेश्वर, आपल्या कृपेने (मित्रस्य) अकाल - मृत्यूपासून रक्षण करणाऱ्या वायूचे आणि जीवात्म्याचे (संरक्षण आम्हास प्राप्त व्हावे, अशी आम्ही कामना करीत आहोत) तसेच (अर्यम्णः) आपल्या आकर्षण शक्तीद्वारे पृथ्वी आदी लोकांवर नियंत्रण करणाऱ्या सूर्याचे व इंद्रियांना नियंत्रणात ठेवणाऱ्या मनाचे आणि (वरुणस्य) आच्छादन करणाऱ्या मेघाचे व प्राणशक्तीचे म्हणजे एकूण या (त्रीणाम्) तिघांचे (महि) थोर आणि (घुक्षम्) तेज देणारे तसेच (दुराधर्षम्) दुर्जेय वा दुष्यराजेय (अवः) संरक्षण वा सुरक्षा आम्हा उपासकांना (अस्तु) प्राप्त व्हावे (अशी आम्ही कामना करतो.)।। द्वितीय अर्थ - (राष्ट्रपर) - हे (इन्द्र) प्रजेचे दुःख दूर करणारे व प्रजाजनांना सुख प्रदान करणारे राजा, आपल्या उत्तम व्यवस्थेखाली (मित्रस्य) सर्वांचे मित्र असलेल्या शिक्षा ध्यक्षाचे (शिक्षामंत्री) चे आणि (णर्यम्णः) सज्जनांशी व दुर्जनांशी यथोचित रीतीने वागणाऱ्या न्यायमंत्राचे तसेच (वरुणस्य) पाश, व्यूह, शस्त्रास्त्र आदींनी सुसज्जित, धनुर्वेदतज्ज्ञ निपुण सेनाध्यक्षांचे म्हणजे एकूण या (त्रीणाम्) तिघांचे (महि) महान (घुक्षम्) राजनीतीच्या प्रकाशाने शोभायमान आणि (दुराधर्षम्) दुष्यराजय (अवः) संरक्षण वा सुरक्षा आम्हा प्रजाजनांना (अस्तु) नेहमी प्राप्त असावी (असी आम्ही कामना करतो) ।। ८।।

भावार्थ - (उपासक / प्रजानन म्हणतात) - आमचे शरीर, मन, आत्मा, बुद्धी, प्राण आदी तसेच बाह्य प्रदेशात असलेले, सूर्य, पवन, मेघआदी नैसर्गिक शक्ती, हे सर्व परमेश्वराच्या नियंत्रणातील पदार्थ आम्हासाठी सुरक्षा देणारे ठरोत आणि राजाच्या आधिपत्याखाली असलेले मंत्री व अन्य राज्याधिकारी हे सर्वजण आम्हा प्रजाजनांसाठी संरक्षण देणारे असावेत की ज्या सुरक्षेमुळे आम्ही आपल्या उत्कर्षासाठी यत्न करीत समस्त प्रेय आणि श्रेय मार्गावर योग्य रीतीने वाटचाल करू शकू. ।। ८।।

इस भाष्य को एडिट करें
Top