Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 204
ऋषिः - त्रिशोकः काण्वः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
त꣣र꣡णिं꣢ वो꣣ ज꣡ना꣢नां त्र꣣दं꣡ वाज꣢꣯स्य꣣ गो꣡म꣢तः । स꣣मान꣢मु꣣ प्र꣡ श꣢ꣳ सिषम् ॥२०४॥
स्वर सहित पद पाठत꣣र꣡णि꣢म् । वः꣣ । ज꣡ना꣢꣯नाम् । त्र꣣द꣢म् । वा꣡ज꣢꣯स्य । गो꣡म꣢꣯तः । स꣣मा꣢नम् । स꣣म् । आन꣢म् । उ꣣ । प्र꣢ । शँ꣣सिषम् ॥२०४॥
स्वर रहित मन्त्र
तरणिं वो जनानां त्रदं वाजस्य गोमतः । समानमु प्र शꣳ सिषम् ॥२०४॥
स्वर रहित पद पाठ
तरणिम् । वः । जनानाम् । त्रदम् । वाजस्य । गोमतः । समानम् । सम् । आनम् । उ । प्र । शँसिषम् ॥२०४॥
सामवेद - मन्त्र संख्या : 204
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 10;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 10;
Acknowledgment
विषय - पहिल्या मंत्रात इन्द्र या नावाने परमेश्वर, जीवात्मा, सूर्य आणि राजा यांची प्रशंसा केली आहे -
शब्दार्थ -
हे मनुष्यानो, (जनानां वः) तुम्हा जन्मधारी मनुष्यांना (तरणिम्) नावेप्रमाणे तारणारे, विपत्रिरूप नद्या पार करण्यासाठी सहायक असे कोण कोण आहेत, ते ऐका. (गोमतः) ते सर्व प्रभूत गौधनयुक्त / प्रशस्त भूमीयुक्त / प्रशस्त वाणीयुक्त / प्रशस्त इद्रिययुक्त / प्रशस्त किरणयुक्त आणि / प्रशस्त अन्तः प्रकाश युक्त असून ते (वाजस्य) ऐश्वर्याची (त्रदम्) प्राप्ती करविणारे इन्द्र नावाचा परमात्मा / जीवात्मा / राजा / सूर्य या सर्वांची मी (एक उपासक) (समानम् उ) सावधचित्त व उत्साहित होऊन (प्रशंसिषम्) प्रशंसा करतो.।।
पणि नावाच्या समाजाचे लोक) इंद्राच्या गायी चोरतात आणि त्या पर्वताच्या गुहेत लपवून ठेवतात. इन्द्र सरमा नावाच्या स्त्रीला आपली दूती म्हणून पणिकडे पाठवितो आणि अंगिरस्, सोम व बृहस्पती यांच्या मदतीने पर्वत गुहेचा विध्वंस करून गायी सोडवून आणतो, ही गोष्ट वेदांमध्ये अनेक वेळा आली आहे. या गोष्टीचा आध्यात्मिक अर्थ असा की गायी म्हणजे अंतः प्रकाशाची किरणे अथवा मनाच्या सात्त्विक वृत्ती, इन्द्र येथे परमात्मा वा जीवात्म्याला म्हटले आहे. पणि आहेत त्या गायी चोरणाऱ्या तामसिक मनोवृत्ती. अधिदैवत क्षेत्रात गायी आहेत किरणे, इंद्र सूर्य असून पणि आहेत मेघ वा अंधाऱ्या रात्री. राष्ट्रीय क्षेत्रात गायी म्हणजे गौ पशू आणि इतर भूसंपदा, इन्द्र येथे राष्ट्र पालक राजाला म्हटले आहे, संपत्तीचे हरण करणाऱ्या लुटारू, चोर आयीनां पणि म्हटले आहे. इन्द्र नाम परमात्मा, जीवात्मा, सूर्य आणि राजा त्या त्या पणींना पराजित करून त्यांची गुहा उद्ध्वस्त करून गायींना सोडून आणतो आणि त्या गायी सत्पात्रांना दान म्हणून देऊन टाकतो. याच प्रसंगामुळे या मंत्रातील तृद् धातु दानार्थक झाली आहे. ।। १।।
भावार्थ - परमेश्वर नौकेप्रमाणे संसार- सागरातून लोकांचा तारक आहे, तर जीवात्मा इंद्रियांना कुमार्गापासून दूर नेणारा म्हणून नौकेप्रमाणे तोही तारक आहे. सूर्य अंधकारापासून तारक तर राजा प्रजाजनांना विपत्तीपासून वाचविणारा म्हणून तोही तारक आहे. हे चारही आपापल्या क्षेत्रात यथोचित दिव्य - प्रकाशरूप / दिव्य इंद्रिय रूप / दिव्य किरण रूप/ गौ व भूमीरूप गायींना शत्रूच्या अधिकारातून सोडवून आणणारे आहेत. यामुळे सर्वांनी या चौघांची प्रशंसा, गुणवर्णन आणि सेवन केले पाहिजे. ।। १।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. इंद्रावर तरणि (नौका)चा आरोप केल्यामुळे येथे रूपक अलंकार आहे. ।। १।।