Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 219
ऋषिः - ब्रह्मातिथिः काण्वः
देवता - अश्विनौ, मित्रावरुणौ
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
दू꣣रा꣢दि꣣हे꣢व꣣ य꣢त्स꣣तो꣢ऽरु꣣ण꣢प्सु꣣र꣡शि꣢श्वितत् । वि꣢ भा꣣नुं꣢ वि꣣श्व꣡था꣢तनत् ॥२१९॥
स्वर सहित पद पाठदू꣣रा꣢त् । दुः꣣ । आ꣢त् । इ꣣ह꣢ । इ꣣व । य꣢त् । स꣣तः꣢ । अ꣣रुण꣡प्सुः꣢ । अ꣡शि꣢꣯श्वितत् । वि । भा꣣नु꣢म् । वि꣣श्व꣡था꣢ । अ꣣तनत् । ॥२१९॥
स्वर रहित मन्त्र
दूरादिहेव यत्सतोऽरुणप्सुरशिश्वितत् । वि भानुं विश्वथातनत् ॥२१९॥
स्वर रहित पद पाठ
दूरात् । दुः । आत् । इह । इव । यत् । सतः । अरुणप्सुः । अशिश्वितत् । वि । भानुम् । विश्वथा । अतनत् । ॥२१९॥
सामवेद - मन्त्र संख्या : 219
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 11;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 11;
Acknowledgment
विषय - सूर्यप्रकाशाने व अध्यात्म प्रकाशाने दूरस्थ पदार्थही समीपस्थ दिसतात -
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (खगोलपर) - (अरुणप्सुः) चमकदार रूप असणारा सूर्यरूप इन्द्र (य़त्) जेव्हा (दूरात्) खगोल प्रदेश आपल्या दूरवर्ती स्थानावरून मंगल, बुध, चंद्र आदी ग्रह उपग्रहांना अशा प्रकारे (अशिश्वतत्) प्रकाशित करतो की (इह इव सतः) जणू ते अगदी जवळ आहेत, तेव्हा (भानुम्) सूर्य आपल्या प्रकाशाला (विश्वधा) अनेक प्रकारे (विजतनत्) विस्तृत करतो आणि इतरही अनेक ग्रहांना प्रकाशाने उजळून टाकतो.)।।
द्वितीय अर्थ - (अध्यात्मपर) (अरुणप्सुः) तेजस्वी रूपवान इन्द्र परमेश्वर (यत्) जेव्हा (दूरात्) दूरस्थ प्रदेशाहून वा मध्ये व्यवधान वा बाधा असतानाही पदार्थांना (इह इव सतः) जणू अगदी जवळ आहे अशा प्रकारे (अशिश्वितत्) योगी मनुष्याच्या मनाला प्रकाशित करतो, तेव्हा (भानुम्) भासमान जीवात्म्याला (विश्वथ) सर्व प्रकारे (वि अतनत्) योगेश्वर्य देऊन विस्तीर्ण अर्थात व्यापक ज्ञानवान करतो.।।६।।
योगाभ्यासी मनुष्याला परमेश्वर जो दिव्य आलोक देतो, त्याद्वारे योगी सूक्ष्म वस्तूंचा, भिंतीआड असणारा पदार्थांचा वा दूरस्थ पदार्थांचा, त्याचप्रमाणे तारा मंडळ, ध्रुव आदी नक्षत्रांचा साक्षात्कार समीपस्थ असल्याप्रमाणे होतो. सर्व ग्रह- नक्षत्र त्याला हस्तामलकवत होतात, असा उल्लेख महर्षी पतंजली यांनी योगदर्शनाच्या विभूतिपाद अध्यायात केला आहे. योग सिद्धीविषयी स्वामी दयानंदानीने विचार व्यक्त केले आहेत, ते या ंत्राच्या भावार्थानंतर पाद टिप्पणी म्हणून लिहिले आहेत. वाचकांनी ते विचार तिथे वाचावेत.
भावार्थ - दीप्तिमान सूर्य जेव्हा आपला प्रकाश मंगल, बुध, बृहस्पती, चंद्र आदी ग्रह उपग्रहांवर फेकतो, तेव्हा ते त्या (संस्कृत भाषेतील - मराठी अऩुवाद) ।। संदर्भ पहा- योगदर्शनम् ३/ १६, १९, २५-२८, ३३, ४१. योगसिद्धीविषयी महर्षी दयानंद यांचे विचार - यजुर्वेद भाष्याच्या १७/ ६७, ७१ येथे तसेच पुणे - प्रवचनाच्या ११ व्या प्रवचनात पहावेत. ते विचार असे - ङ्गङ्घजेव्हा माणूस आपल्या आत्म्यास परमात्म्याशी संयुक्त करतो तेव्हा योगाच्या अणिमा आदी सिद्धी गरिमा महिमा, लधिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व, वशिर्बया आठ सिद्धी) उत्पन्न होतात (वा योगी व्यक्तीला साध्य होतात) या सिद्धी प्राप्त करून योगी अबाध वा निर्बाध गतीने आपल्या इच्छित स्थानापर्यंत जाऊ शकतो. (या सिद्धीशिवाय) असे कदापि शक्य नाही. (हा उतारा यजुर्वेद भाष्य १७/६७ च्या भावार्थातून) ङ्गङ्घयोगी मनुष्य विभूती सिद्ध करतो, असे योगशास्त्रात लिहिले आहे. अणिमा आदी विभूती आहेत. त्या योगी मनुष्याच्या चित्तात उत्पन्न होतात. सांसारिक जन जे असे मानतात की त्या विभूती योग्याच्या शरीरात उत्पन्न होतात, ते बरोबर नाही.फफ पुणे प्रवचन (११ वे). प्रकाशाने उजळून निघतात. तो प्रकाश आमच्या डोळ्यांवर प्रतिफलित होतो, तेव्हा आम्ही त्या दूरस्थ पदार्थांनाही जवळ असलेल्याप्रमाणे पाहू शकतो. त्याचप्रमाणे योगाभ्यासामुळे योगी मनुष्याच्या हृदयात परमात्म्याचा दिव्य प्रकाश आलोकित होतो आणि त्या प्रकाशामुळे योगी सूक्ष्म, आड असलेल्या व दूरस्थित पदार्थांना साक्षात समीपस्थ असल्याप्रमाणे पाहू लागतो.।। ६।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. ङ्गदूरादिहेवफ या शब्दामध्ये उत्प्रेक्षा अलंकार आहे.।। ६।।