Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 223
ऋषिः - मेधातिथिः काण्वः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
अ꣡ती꣢हि मन्युषा꣣वि꣡ण꣢ꣳ सुषु꣣वा꣢ꣳस꣣मु꣡पे꣢꣯रय । अ꣣स्य꣢ रा꣣तौ꣢ सु꣣तं꣡ पि꣢ब ॥२२३॥
स्वर सहित पद पाठअ꣡ति꣢꣯ । इ꣣हि । मन्युषावि꣡ण꣢म् । म꣣न्यु । सावि꣡न꣢म् । सु꣣षुवाँ꣡स꣢म् । उ꣡प꣢꣯ । आ । ई꣣रय । अस्य꣢ । रा꣣तौ꣢ । सु꣣त꣢म् । पि꣣ब ॥२२३॥
स्वर रहित मन्त्र
अतीहि मन्युषाविणꣳ सुषुवाꣳसमुपेरय । अस्य रातौ सुतं पिब ॥२२३॥
स्वर रहित पद पाठ
अति । इहि । मन्युषाविणम् । मन्यु । साविनम् । सुषुवाँसम् । उप । आ । ईरय । अस्य । रातौ । सुतम् । पिब ॥२२३॥
सामवेद - मन्त्र संख्या : 223
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 12;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 12;
Acknowledgment
विषय - इंद्राने सोमरस प्यावा कुणाचा ?
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (अध्यात्मपर) - हे इन्द्र परमेश्वर, आपण (मन्युषा विणम्) जो मनुष्य उदासीन भाव हृदयात ठेवून म्हणजे नात तुम्चयाविषयी प्रीतीभाव नसताना उपासना करतो, त्याला तुम्ही (अति इहि) ओलांडून जा (म्हणजे त्याची उपेक्षा करा, त्याची प्रार्थना स्वीकार करू नका) (सुषुवांसम्) पूर्ण श्रद्धेने जो उपासना रस तुमच्यासठी गाळतो (खऱ्या प्रीतीयुक्त मनाने तुमची उपासना करतो) तुम्ही (उप आ ईरय) त्याला तुमच्याजवळ घ्या (त्याची प्रार्थना स्वीकार करा) (अस्य) या यजमानाने (सुतम्) (सतौ) आत्म समर्पणमय उपासनेद्वारे (सुतम्) जो श्रद्धारस तुमच्यासाठी तयार केला आहे, ते (पिव) तुम्ही प्या. (त्याच्या श्रद्धेचा स्वीकार करा.)।।
द्वितीय अर्थ - (राजापर) हे इन्द्र राजा, तुम्ही (मन्युषाविणम्) क्रोध ओकणाऱ्या दुष्ट शत्रूला (अति इहि) पराजित करा. (सुषुवांसम्) कर देणाऱ्या प्रजाजनाला, जो कर-दान रूपाने एका प्रकारे सोम याग करीत आहे, त्याला (उप आईरय( प्राप्त व्हा आणि त्याला शुभ कर्म करण्यास प्रवृत्त करा. (अस्य) या प्रजाजनाच्या की जो (सतौ) कर देण्याविषयी जागरूक आहे, त्यो (सुतम्) दिलेले राजा कर (पिब) स्वीकार करा आणि त्या कररूपाने संग्रहीत धनाला सहस्त्र गुणित करून त्याचे प्रजा कल्याण कार्यातच व्यय करा. नेमके त्याच पद्धतीने हे प्रजाकार्य करा की जसा सूर्य भूमीवरील जल घेतो आणि त्या जलाला सहस्त्र गुणित करून पृथ्वीला परत करतो.।।
तृतीय अर्थ - (अध्ययन - अध्यायन पर) - इन्द्र, विद्युतप्रमाणे तीव्र बुद्धी असणाऱ्या हे शिष्योत्तमा, तू (मन्युषाविणम्) क्रोध, द्वेष आदी भाव मनात ठेवून विद्यादन करणाऱ्या गुरूचा (अति इहि) त्याग कर, विद्या- प्राप्तीकरिता त्याच्याजवळ जाऊ नको. (सुषुवांसम्) जो तुला प्रेमाने विद्या शिकवील, तू त्याच्याजवळ जाऊन (उप आईरय) विद्या दानाची प्रार्थना कर. (अस्म) तो गुरू जेव्हा तुला (रातौ) विद्या दान करण्यासाठी तत्पर होईल, तेव्हा (सुतम्) तो देत असलेल्या ज्ञान मोठ्या श्रद्धेने (पिब) पान कर.।।
या अर्थावरून हा आशय ध्वनित होत आहे की अध्यापकाने विद्यार्थ्याविषयी दिव्य मन ठेवावे, त्याला रमण पद्धतीने शिकवावे. अर्थ वेदात शिष्यांनी आचार्याला विनंती करीत म्हटले आहे की ङ्गवाणीचे अधिपती आणि विद्या धनाचे स्वामी, हे आचार्य प्रवर, आपण मो ज्या मनाने (उदार व प्रेमळ) मन ठेवून) आमच्याकडे पुन्हा पुन्हा या आणि अशा उत्तम रमण पद्धतीने आम्हाला अध्यापन करा की एकदा ऐकलेले शास्त्र आम्ही कधीही विसरू नये.।। १।। (अथर्व. १/१/२)
भावार्थ - जो उदासीन मनाने परमेश्वरास श्रद्धारस देतो, परमेश्वर त्याच्या रसाचा (उपासनेचा) स्वीकार करत नाही. एक राजादेखील कर रूपाने प्राप्त धनाचा उपयोग शत्रु उत्कर्षासाठी करीत नाही, तर तो प्रजाजनांचीच समृद्धी वाढवितो. गुरूनेदेखील आपल्या शिष्यांना सऱळ सोप्या पद्धतीने व मोठ्या प्रेमाने शिकविले पाहिजे. जटि वा क्लिष्ट पद्धतीने अथवा मनात क्रोध- द्वेषादी भाव ठेऊन गुरूने शिष्यास कधीही कदापि शिकवू नये.।।१।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे.।।१।।