Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 226
ऋषिः - विश्वामित्रो गाथिनः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
इ꣡न्द्र꣢ उ꣣क्थे꣢भि꣣र्म꣡न्दि꣢ष्ठो꣡ वा꣡जा꣢नां च꣣ वा꣡ज꣢पतिः । ह꣡रि꣢वान्त्सु꣣ता꣢ना꣣ꣳ स꣡खा꣢ ॥२२६
स्वर सहित पद पाठइ꣡न्द्रः꣢꣯ । उ꣣क्थे꣡भिः꣢ । म꣡न्दि꣢꣯ष्ठः । वा꣡जा꣢꣯नाम् । च꣣ । वा꣡ज꣢꣯पतिः । वा꣡ज꣢꣯ । प꣣तिः । ह꣡रि꣢꣯वान् । सु꣣ता꣢ना꣢म् । स꣡खा꣢꣯ । स । खा꣣ ॥२२६॥
स्वर रहित मन्त्र
इन्द्र उक्थेभिर्मन्दिष्ठो वाजानां च वाजपतिः । हरिवान्त्सुतानाꣳ सखा ॥२२६
स्वर रहित पद पाठ
इन्द्रः । उक्थेभिः । मन्दिष्ठः । वाजानाम् । च । वाजपतिः । वाज । पतिः । हरिवान् । सुतानाम् । सखा । स । खा ॥२२६॥
सामवेद - मन्त्र संख्या : 226
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 12;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 12;
Acknowledgment
विषय - परमेश्वर कसा आहे ? राजा कसा आहे ?
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (परमेश्वरपर) (इन्द्रः) परमैश्वर्यवान विघ्न विदीर्ण करणारा, सुख प्रदाता परमेश्वर (उक्थेभिः) वेद मंत्रांद्वारे (मन्दिष्ठः) अतिशय आनंदित करणारा, तसेच (वाजानांच सर्व बळांना (वाजपतिः) बलिष्ठ स्वामी आहे. तोच (हरिवान्) अनंत प्राणवान आणि (सुतानाम्) सर्व पुत्र- पुत्रींचा (सखा) मित्र आहे.।।
द्वितीय अर्थ - (राजापर) (इन्द्रः) राजा (उक्थेभिः) आपल्या प्रभूत यशामुळे (मन्दिष्ठः) सर्व प्रजाजनांना आनंदित करणारा आहे. तो (वाजानांच) सर्व प्रकारच्या अन्न-धान्याचा, धनाचा आणि शक्तीचा (वाजपतिः) स्वामी आहे. (हरिवान्) तो जितेंद्रिय आहे अथवा तो विद्युत आदी शक्तीद्वारे चालणाऱ्या भूयान, जलयान आणि वायुयान यांचा अधिपती आहे. तसेच (सुतानाम्) सर्व प्रजाजनांना पुत्राप्रमाणे मानणारा आणि त्यांचा (सखा) खरा मित्र आहे.।।४।।
भावार्थ - परमेश्वर सर्व गुण समूहांचा स्वामी व गुणाग्रणी आहे, त्याचप्रमाणे जो मनुष्य यशस्वी, यशदायी, धनपती, बलवान, विज्ञानी, जितेंद्रिय, सुप्रबन्धक आणि सर्वांशी सौजन्य व सौहार्द्राने वागणारा असेल, त्यालाच प्रजेने राजापदावर अभिषिक्त केले पाहिजे.।।४।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. ङ्गराजाफ ङ्गवाजाफमुळे छेकानुप्रास अलंकार आहे.।।४।।