Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 233
ऋषिः - वसिष्ठो मैत्रावरुणिः
देवता - इन्द्रः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
अ꣣भि꣡ त्वा꣢ शूर नोनु꣣मो꣡ऽदु꣢ग्धा इव धे꣣न꣡वः꣢ । ई꣡शा꣢नम꣣स्य꣡ जग꣢꣯तः स्व꣣र्दृ꣢श꣣मी꣡शा꣢नमिन्द्र त꣣स्थु꣡षः꣢ ॥२३३॥
स्वर सहित पद पाठअ꣣भि꣢ । त्वा꣣ । शूर । नोनुमः । अ꣡दु꣢ग्धाः । अ । दु꣣ग्धाः । इव । धेन꣡वः꣢ । ई꣡शा꣢꣯नम् । अ꣣स्य꣢ । ज꣡ग꣢꣯तः । स्व꣣र्दृ꣡श꣢म् । स्वः꣣ । दृ꣡श꣢꣯म् । ई꣡शा꣢꣯नम् । इ꣣न्द्र । तस्थु꣡षः꣢ ॥२३३॥
स्वर रहित मन्त्र
अभि त्वा शूर नोनुमोऽदुग्धा इव धेनवः । ईशानमस्य जगतः स्वर्दृशमीशानमिन्द्र तस्थुषः ॥२३३॥
स्वर रहित पद पाठ
अभि । त्वा । शूर । नोनुमः । अदुग्धाः । अ । दुग्धाः । इव । धेनवः । ईशानम् । अस्य । जगतः । स्वर्दृशम् । स्वः । दृशम् । ईशानम् । इन्द्र । तस्थुषः ॥२३३॥
सामवेद - मन्त्र संख्या : 233
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 1;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 1;
Acknowledgment
विषय - परमेश्वराचे गुणवर्णन, स्तुती
शब्दार्थ -
हे (शूर) विक्रमशील (इन्द्र) परमेश्वर, (अस्य) हे जे सर्व समोर दिसत आहे, त्या (जगतः) गमनशील, चल पदार्थांचे (ईशानम्) तुम्हीच अधीश्वर आहात आणि (तस्युषः) अचल वा स्थावर जगाचेही तुम्हीच (ईशानम्) स्वामी आहात. (स्वर्हशम्) मोक्ष- सुखाचे दर्शन घडविणाऱ्या अशा (त्वा अभि) तुम्हाला उद्देशून आम्ही वारंवार तुमची स्तुती करीत आहोत. आम्ही उपासक / प्रजाजन (अदुग्धाः धेनवः इव) ज्यांचे अजून दोहन केले नाही, (त्यामुळे ज्या आपल्या वासराला दूध पाजविण्यासाठी आतुर आहेत) अशा गायी ज्याप्रमाणे वासराला दूध पाजविण्यासाठी हंबरतात, तसे आम्ही उपासक तुमचे अत्यंत स्तुतिगान करीत आहोत. तुम्ही आम्हाला तसेच प्रिय आहात, जे गायीला तिचे वासरू प्रिय असते. या उपमेवरून हाच ध्वन्यर्थ व्यक्त होत आहे.।।१।।
भावार्थ - ज्याप्रमाणे गायी वासराला दूध पाजवून स्वतः सुख प्राप्त करतात, तद्वत मनुष्यांनी परमेश्वराशी प्रीति जोडा आणि त्याद्वारे अभ्युदय व निःश्रेयस दोन्हींचे सुख प्राप्त करावे.।।१।।
विशेष -
या मंत्रात उपमा अलंकार आहे.।।१।।