Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 24
ऋषिः - वसिष्ठो मैत्रावरुणिः
देवता - अग्निः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
0
अ꣢ग्ने꣣ र꣡क्षा꣢ णो꣣ अ꣡ꣳह꣢सः꣣ प्र꣡ति꣢ स्म देव रीष꣣तः꣢ । त꣡पि꣢ष्ठैर꣣ज꣡रो꣢ दह ॥२४॥
स्वर सहित पद पाठअ꣡ग्ने꣢꣯ । र꣡क्ष꣢꣯ । नः꣣ । अँ꣡ह꣢꣯सः । प्र꣡ति꣢꣯ । स्म꣣ । देव । रीषतः꣢ । त꣡पि꣢꣯ष्ठैः । अ꣣ज꣡रः꣢ । अ꣣ । ज꣡रः꣢꣯ । द꣣ह ॥२४॥
स्वर रहित मन्त्र
अग्ने रक्षा णो अꣳहसः प्रति स्म देव रीषतः । तपिष्ठैरजरो दह ॥२४॥
स्वर रहित पद पाठ
अग्ने । रक्ष । नः । अँहसः । प्रति । स्म । देव । रीषतः । तपिष्ठैः । अजरः । अ । जरः । दह ॥२४॥
सामवेद - मन्त्र संख्या : 24
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 3;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 3;
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात पापापासून रक्षणासाठी परमेश्वराची प्रार्थना केली आहे.
शब्दार्थ -
हे (अग्ने) ज्योतिष्मन् परमात्मन् आपण (न:) आमचे (अहस:) पापाचरणापासून (रक्ष) रक्षण करा. हे (देव) दिव्य गुण, कर्म, स्वभावधारक, सकलैश्वर्मदाता, प्रकाशमान, सर्वप्रकाशक जगदीश्वर आपण (अजर:) नश्वरत्व आणि जर्जरत्वापासून रहित आहात. आपण आम्हा उपासकांच्या (रिषत:) हिंसापरायण आंतरिक व बाह्य शत्रूंना आपल्या (तपिष्ठै:) अतिशय संतापक अशा स्वकीय सामर्थ्याने (प्रति दहस्म) भस्म रून टाका. ।।४।।
भावार्थ - ज्याप्रमाणे अग्नी थंडीपासून, अंधकार आणि व्याघ्रादी प्राण्यापासून माणसाचे रक्षण करतो, जसा एक राजा पापीजनांना दंडित करून आक्रमणकारी अन्यायीजनांचा व शत्रूचा पराभव करून प्रजेची पापाचरणापासून व शत्रूपासून रक्षा करतो. त्याप्रमाणे परमेश्वर आम्हाला आत्मरक्षेसाठी सामर्थ्य प्रदान करो. पापाचरण आणि आंतरिक बाह्य शत्रूपासून आमची रक्षा करो, अशी प्रार्थना इथे केली आहे. ।।४।।
विशेष -
श्लेषाद्वारे या मंत्रशची भौतिक अग्नीच्या तसेच राजाच्या पक्षी अर्थ योजना केली पाहिजे. ।।४।।