Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 245
ऋषिः - मेधातिथि0मेध्यातिथी काण्वौ
देवता - इन्द्रः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
आ꣡ त्वा꣢ स꣣ह꣢स्र꣣मा꣢ श꣣तं꣢ यु꣣क्ता꣡ रथे꣢꣯ हिर꣣ण्य꣡ये꣢ । ब्र꣣ह्म꣢युजो꣣ ह꣡र꣢य इन्द्र के꣣शि꣢नो꣣ व꣡ह꣢न्तु꣣ सो꣡म꣢पीतये ॥२४५॥
स्वर सहित पद पाठआ꣢ । त्वा꣣ । सह꣡स्र꣢म् । आ । श꣣त꣢म् । यु꣢क्ताः꣢ । र꣡थे꣢꣯ । हि꣣रण्य꣡ये꣢ । ब्र꣣ह्मयु꣡जः꣢ । ब्र꣣ह्म । यु꣡जः꣢꣯ । ह꣡र꣢꣯यः । इ꣣न्द्र । केशि꣡नः꣢ । व꣡ह꣢꣯न्तु । सो꣡म꣢꣯पीतये । सो꣡म꣢꣯ । पी꣣तये ॥२४५॥
स्वर रहित मन्त्र
आ त्वा सहस्रमा शतं युक्ता रथे हिरण्यये । ब्रह्मयुजो हरय इन्द्र केशिनो वहन्तु सोमपीतये ॥२४५॥
स्वर रहित पद पाठ
आ । त्वा । सहस्रम् । आ । शतम् । युक्ताः । रथे । हिरण्यये । ब्रह्मयुजः । ब्रह्म । युजः । हरयः । इन्द्र । केशिनः । वहन्तु । सोमपीतये । सोम । पीतये ॥२४५॥
सामवेद - मन्त्र संख्या : 245
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 2;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 2;
Acknowledgment
विषय - हरि द्वारा इन्द्राचे वहन करणेविषयी
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) - (अधअयात्मपर) - हे (इन्द्र) परमेश्वर (हिरण्यये) स्वर्णाप्रमाणे ज्योतिर्मय सुंदर या (रथे) शरीररूप रथात (युक्ताः) जुंपलेले (ब्रह्मयुजः) ब्रह्माशी संबंध जोडणारे म्हणजे ब्रह्म साक्षात्का साधन असलेले (केशिनः) प्रकाशमय व प्रकाशक (सहस्त्रम्) हजारो (हरयः) सात्त्विक चित्त वृत्तीरूप जे घोडे अथवा प्राणरूप घोडे (सोमपीतये, श्रद्धारूप सोमरस पान करण्यासाठी या उपासना- यज्ञात (त्वा) तुम्हाला (आवहन्त) हृदयात आणावे वा तुम्हाला प्रकट अनुभवावे. एवढेच नव्हे, उपासकांनी (शतम्) शंभर सात्त्विक चित्तवृत्तीरूप अश्व (आ) हृदयात आणावेत वा प्रकट अनुभवावे. (सात्त्विक चित्तवृत्ती हे अश्व, शरीर हे रथ, उपासना हे साधन, ईश्वर प्राप्ती हे लक्ष्य असे सुंदर रूपक अलंकार या मंत्रात व्यक्त होत आहे.)
मंत्रात आधी हजार म्हणून पुन्हा शंभर चित्तवृत्तीरूप अश्व म्हणजे संख्या कमी केली आहे. यावरून सूचित होते की ब्रह्म साक्षात्कारासाठी हळूहळू सात्त्विक वृत्तींचाही निरोध केला पाहिजे. याच प्रकारे प्राणायाम पद्धतीत देखील आधी श्वासोच्छ्वासांची संख्या अधिक असते. अभ्यासवशेन क्रमशः ती संख्या कमी कमी होत जाते.
द्वितीय अर्थ - (राष्ट्रपर) - हे (इन्द्र) वीर मनुष्या, (हिरण्यये) ज्योतिर्मय (रथे) राष्ट्ररूप रथात (युक्ताः) नेमलेल्या (ब्रह्मयुजः) वेदज्ञ निर्वाच अधिकाऱ्यांद्वारे संचालित (केशिनः ज्ञानावर आधारित (सहस्त्रम्)सहस्त्र (हरयः) मतदान अधिकारी (सोमपीतये) सुख शांतीची रक्षा ज्यात होते, त्या राष्ट्र यज्ञाच्या संचालनासाठी (त्वा) तुला (आवहन्तु) निर्वाचित करून राजापदावर आणतील. (निर्वाचनाचा परिणाम घोषित करून तुला राजा म्हणून राजापदावर बसवावे) (शतम् हरयः) शंभर विधायक (लोकसभा व राज्यसभेतून निवडक शंभर सदस्यांच्या मंडळाने तुझी निवड करून राजपदावर बसवावे.।।
आधी हजार व अधिक प्रजाजनांनी (विधानसभा वा लोकसभा मतदारसंघातून) काही विधायक (वा संसद सदस्य) निवडावे ते संख्येने कमी असलेले सदस्य राजा (वा पंतप्रधान/ राष्ट्रपती) निवडतील. प्रथम हजार संख्या म्हणून नंतर शंभर संख्या म्हटली आहे, यावरून वरील निर्वाचन पद्धती सूचित केली आहे.।।३।।
भावार्थ - जे योगीजन सात्त्विक चित्ताच्या भावनांद्वारे परमेश्वर प्राप्ती करतात, तद्वत विवेकी प्रजाजनांनी मतदानाद्वारे सुयोग्य राजा प्राप्त करावा.।।३।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे.।।