Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 278
ऋषिः - पुरुहन्मा आङ्गिरसः
देवता - इन्द्रः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
य꣡द्द्याव꣢꣯ इन्द्र ते श꣣त꣢ꣳ श꣣तं꣡ भूमी꣢꣯रु꣣त꣢ स्युः । न꣡ त्वा꣢ वज्रिन्त्स꣣ह꣢स्र꣣ꣳ सू꣢र्या꣣ अ꣢नु꣣ न꣢ जा꣣त꣡म꣢ष्ट꣣ रो꣡द꣢सी ॥२७८॥
स्वर सहित पद पाठय꣢त् । द्या꣡वः꣢꣯ । इ꣣न्द्र । ते । शत꣢म् । श꣣त꣢म् । भू꣡मीः꣢꣯ । उ꣣त꣢ । स्युः । न । त्वा꣣ । वज्रिन् । सह꣡स्र꣢म् । सू꣡र्याः꣢꣯ । अ꣡नु꣢꣯ । न । जा꣣त꣢म् । अ꣣ष्ट । रो꣡द꣢꣯सी꣣इ꣡ति꣢ ॥२७८॥
स्वर रहित मन्त्र
यद्द्याव इन्द्र ते शतꣳ शतं भूमीरुत स्युः । न त्वा वज्रिन्त्सहस्रꣳ सूर्या अनु न जातमष्ट रोदसी ॥२७८॥
स्वर रहित पद पाठ
यत् । द्यावः । इन्द्र । ते । शतम् । शतम् । भूमीः । उत । स्युः । न । त्वा । वज्रिन् । सहस्रम् । सूर्याः । अनु । न । जातम् । अष्ट । रोदसीइति ॥२७८॥
सामवेद - मन्त्र संख्या : 278
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 5;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 5;
Acknowledgment
विषय - परमेश्वराचा महिमा
शब्दार्थ -
हे (वज्रिन्) वज्रधारी मनुष्याप्रमाणे (वज्र अस्त्र धारण करणारा योद्धा जसे उचित रीतीने नियमाप्रमाणे अस्त्र फिरवितो, तसे) सूर्य, चंद्र, मेघ आदींना नियमाप्रमाणे निर्धारित कक्षेत फिरविणाऱ्या हे (इंद्र) महामहिम परमेश्वरा, (ते) तू रचलेले (यत्) जे (द्यावः) द्यूलोक (त्यातील ग्रह, नक्षत्रादी) (शतम्) शंभर व्हावेत वा असावेत, (उठ) आणि (भूमीः) भूमीदेखील (शतम्) शंभर (स्युः) व्हावेत आणि (सूर्याः) सूर्याची संख्या (सहस्त्रम्) हजार व्हावी, तरीही ते सर्व ग्रह, सूर्य, नक्षत्रादी मिळूनदेखील (त्वा) तुझी (अनु न) समता करू शकत नाही. तसेच (रोदसी) आकाश भूमीच्या मधल्या भागात (जातम्) उत्पन्न वायू, मेघमंडळ, पर्वत, निर्झर, सागर आदी जे काही आहे, ते सर्वंदेखील (अष्ट) तुझ्या महिमेचा अंत शोधू शकत (न) नाही, म्हणजे तुझा महिमा अपरंपार आहे. ।। ६।।
भावार्थ - उषःकाल, सूर्य, चंद्र, तारागण, भूमी, नद्या, डोंगर, समुद्र, वृक्ष, वनस्पती, अहोरात्र, ऋतू, वर्ष हे सर्व शंभर नव्हे हजार जनी झाले, तरीही परमेश्वराच्या महिमेची बरोबरी करू शकत नाही. ।। ६।।
विशेष -
द्यौ, भूमी आणि सूर्य यांचा शंभर वा हजार संख्येशी काही संबंध नाही (म्हणजे ते संख्येत एकच आहेत, तरीही) या मंत्रात यांचा संख्येशी संबंध दाखविला आहे. तेव्हा असंबंधाचा संबंध दाखविल्यामुळे येथे अतिशयोक्ती अलंकार आहे. तसेच उपमानापेक्षा उपमेयाचे आधिक्य दाखविल्यामुळे येथे व्यतिरेक अलंकारही आहे. ङ्गशतं, शतंफमुळे लाटानुप्रास अलंकार होत आहे. ।। ६।।