Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 282
ऋषिः - मेध्यः काण्वः देवता - इन्द्रः छन्दः - बृहती स्वरः - मध्यमः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0

इ꣢न्द्र꣣ ने꣡दी꣢य꣣ ए꣡दि꣢हि मि꣣त꣡मे꣢धाभिरू꣣ति꣡भिः꣢ । आ꣡ शं꣢तम꣣ शं꣡त꣢माभिर꣣भि꣡ष्टि꣢भि꣣रा꣡ स्वा꣢꣯पे꣢꣯ स्वा꣣पि꣡भिः꣢ ॥२८२॥

स्वर सहित पद पाठ

इ꣡न्द्र꣢꣯ । ने꣡दी꣢꣯यः । आ । इत् । इ꣣हि । मित꣡मे꣢धाभिः । मि꣣त꣢ । मे꣣धाभिः । ऊति꣡भिः꣢ । आ । श꣣न्तम । श꣡न्त꣢꣯माभिः । अ꣣भि꣡ष्टि꣢भिः । आ । स्वा꣢पे । सु । आपे । स्वापि꣡भिः꣢ । सु꣣ । आपि꣡भिः꣢ । ॥२८२॥


स्वर रहित मन्त्र

इन्द्र नेदीय एदिहि मितमेधाभिरूतिभिः । आ शंतम शंतमाभिरभिष्टिभिरा स्वापे स्वापिभिः ॥२८२॥


स्वर रहित पद पाठ

इन्द्र । नेदीयः । आ । इत् । इहि । मितमेधाभिः । मित । मेधाभिः । ऊतिभिः । आ । शन्तम । शन्तमाभिः । अभिष्टिभिः । आ । स्वापे । सु । आपे । स्वापिभिः । सु । आपिभिः । ॥२८२॥

सामवेद - मन्त्र संख्या : 282
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 5;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (इन्द्र) परमश्वर, हे राजा, हे विद्वान, तुम्ही (मितमेधाभिः) मेधापूर्ण, कौशल्याने परिपूर्ण अशा तुमच्या (अतिभिः) रक्षणाच्या (उपामा - साधनांसह) (नेदीयः इत्) आमच्या अधिक जवळ या. हे (शन्तम) अतिशय कल्याणकारी परमेश्वर, राजा व विद्वान, तुम्ही (शन्तमाभिः) अतिशय कल्याण करणाऱ्या (अभिष्टिभिः) इच्छित पदार्थांसह (आ) या. हे (स्वापे) सुबंधु, आपण (स्वापिभिः) उत्कृष्ट बंधुभावासह (आ) आम्हा उपासकांकडे / प्रजाजनांकडे / अविद्वानांकडे या. ।। १०।।

भावार्थ - ज्याप्रमाणे परमेश्वराद्वारे उपासकांचे रक्षण बुद्धिपूर्ण रीतीने होते, त्याने दिलेले दान मनुष्यासाठी कल्याणकारी असते आणि त्याचा बंधुभाव शुभ असतो. तद्वत राष्ट्रात राजा आणि विद्वान अध्यापकाचे रक्षण, दान व बंधुत्व सर्वांसाठी शुभ असावे. ।। १०।। या दशतीमध्ये इंद्र नामाने परमेश्वर, राजा व आचार्य यांच्या गुण- कर्म- स्वभावाचे वर्णन आहे व त्यांच्याजवळ अभयदानाची याचना केली आहे. तसेच सूर्य नावाने त्यांचीच स्तुती केली आहे आणि श्रद्धेचे महत्त्व प्रतिपादित आहे. यामुळे या दशतीतील मंत्राच्या अर्थाची संगती मागील दशतीच्या मंत्र्याशी आहे, असे जाणावे.।। तृतीय प्रपाठकातील द्वितीय अर्धाची चतुर्थ दशती समाप्त. तृतीय अध्यातातील पंचम खंड समाप्त.

इस भाष्य को एडिट करें
Top