Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 287
ऋषिः - परुच्छेपो दैवोदासिः
देवता - इन्द्रः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
श꣡ची꣢भिर्नः शचीवसू꣣ दि꣢वा꣣ न꣡क्तं꣢ दिशस्यतम् । मा꣡ वा꣢ꣳ रा꣣ति꣡रुप꣢꣯ दसत्क꣣दा꣢च꣣ना꣢꣫स्मद्रा꣣तिः꣢ क꣣दा꣢च꣣न꣢ ॥२८७॥
स्वर सहित पद पाठश꣡ची꣢꣯भिः । नः꣣ । शचीवसू । शची । वसूइ꣡ति꣢ । दि꣡वा꣢꣯ । न꣡क्त꣢꣯म् । दि꣣शस्यतम् । मा꣢ । वा꣣म् । रातिः꣢ । उ꣡प꣢꣯ । द꣣सत् । कदा꣢ । च꣣ । न꣣ । अ꣣स्म꣢त् । रा꣣तिः꣢ । क꣣दा꣢ । च꣣ । न꣢ ॥२८७॥
स्वर रहित मन्त्र
शचीभिर्नः शचीवसू दिवा नक्तं दिशस्यतम् । मा वाꣳ रातिरुप दसत्कदाचनास्मद्रातिः कदाचन ॥२८७॥
स्वर रहित पद पाठ
शचीभिः । नः । शचीवसू । शची । वसूइति । दिवा । नक्तम् । दिशस्यतम् । मा । वाम् । रातिः । उप । दसत् । कदा । च । न । अस्मत् । रातिः । कदा । च । न ॥२८७॥
सामवेद - मन्त्र संख्या : 287
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 6;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 6;
Acknowledgment
विषय - अश्वियुगल देवता । त्यांना याचना केली आहे.
शब्दार्थ -
(शचीवसु) कर्म हेच ज्यांचे धन, असे हे परमात्मा - जीवात्मा, गुरू-शिष्य, अध्यापक- उपदेशक, वैद्य - शल्यशास्त्र विशारद, राजा- राजमंत्री, सभापती- सेनापती आदी हे अश्वी देवगण (युगल म्हणजे दोघांची जोडी) तुम्ही (शचीभिः) आपापल्या कार्यांनी (नः) आम्हाला (दिवा नक्तम्) दिवस-रात्र (दिशस्यतम्) आपले दान देत राहा. (वाम्) तुमचे (रातिः) दान (कदाच न) कधीही ( न उपसदत्) संपू नये (आम्हास हवे ते सतत मिळत रहावे) तसेच (अस्मत्) आमच्यातून देखील (रातिः) दान देण्याचे हे गुण (आमची दानवृत्ती) (कदा च न) केव्हाही (न उपसदत्) संप नये. अर्थात आम्हीदेखील तुमच्याप्रमाणे सतत दान देत राहू. ।। ५।।
भावार्थ - वरील अश्वीयुगल यांनी (जोड्या) ज्याप्रमाणे आपापल्या आध्यात्मिक, वैयक्तिक, सामाजिक, राष्ट्रीय, शिल्पात्मक, चिकित्सात्मक आदी दानाद्वारे आम्हास उपकृत करावे. तद्वत आम्हीही आमच्या शक्तीप्रमाणे इतरांना उपकृत केले पाहिजे. ।। ५।।
विशेष -
या मंत्रात ङ्गशची, शचीफ ङ्गरातिः रातिःफ मध्ये तसेच ङ्गकदा च नफ व ङ्गकदा च नफमध्ये लाचानुप्रास अलंकार आहे. ।। ५।।