Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 289
ऋषिः - मेध्यातिथिः काण्वः
देवता - इन्द्रः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
पा꣣हि꣡ गा अन्ध꣢꣯सो꣣ म꣢द꣣ इ꣡न्द्रा꣢य मेध्यातिथे । यः꣡ सम्मि꣢꣯श्लो ह꣢र्यो꣣र्यो꣡ हि꣢र꣣ण्य꣢य꣣ इ꣡न्द्रो꣢ व꣣ज्री꣡ हि꣢र꣣ण्य꣡यः꣢ ॥२८९॥
स्वर सहित पद पाठपा꣣हि꣢ । गाः । अ꣡न्ध꣢꣯सः । म꣡दे꣢꣯ । इ꣡न्द्रा꣢꣯य । मे꣣ध्यातिथे । मेध्य । अतिथे । यः꣢ । स꣡म्मि꣢꣯श्लः । सम् । मि꣣श्लः । ह꣡र्योः꣢꣯ । यः । हि꣣रण्य꣡यः । इ꣡न्द्रः꣢꣯ । व꣣ज्री꣢ । हि꣣रण्य꣡यः꣢ ॥२८९॥
स्वर रहित मन्त्र
पाहि गा अन्धसो मद इन्द्राय मेध्यातिथे । यः सम्मिश्लो हर्योर्यो हिरण्यय इन्द्रो वज्री हिरण्ययः ॥२८९॥
स्वर रहित पद पाठ
पाहि । गाः । अन्धसः । मदे । इन्द्राय । मेध्यातिथे । मेध्य । अतिथे । यः । सम्मिश्लः । सम् । मिश्लः । हर्योः । यः । हिरण्ययः । इन्द्रः । वज्री । हिरण्ययः ॥२८९॥
सामवेद - मन्त्र संख्या : 289
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 6;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 6;
Acknowledgment
विषय - इंद्राच्या आतिथ्याची प्रेरणा -
शब्दार्थ -
हे (मेध्यातिये) पवित्र इन्द्ररूप अतिथीची स्तुती आणि सत्कार करणाऱ्या स्तोता, तू (अन्धसः) भक्तिरसाच्या (मदे) आनंदातमग्न होऊन (इन्द्राय) इन्द्र परमेश्वरासाठी म्हणजे हृदयात त्याचे आतिथ्य करण्यासाठी (गाः) आपल्या स्तुतिवाणी (पाहि) सांभाळून ठेव. (यः) जो परमेश्वर (हर्योः) मन- प्राणरूप अश्वांना (सेमिरलः) शरीरात नियुक्त करणारा आहे आणि (यः) जो (हिरण्यमयः) ज्योतिर्मय व यशोमय सून तो (इन्द्रः) परमेश्वर (वज्री) वज्रधारी सेनाध्यक्षाप्रमाणे आक्रमण आणि रक्षण शक्तीने संपन्न आहे. तो दुर्जनांना दंद्वित करणारा व सज्जनांचा रक्षक आहे. तो (हिरण्ययः) सत्यरूप स्वर्णालंकाराने अलंकृत आहे (तो सत्य स्वरूप आहे) ।। ७।।
भावार्थ - अतिथि- सत्कार मनुष्याचा श्रेष्ठ धर्म आहे. इन्द्र परमेश्वरदेखील मनुष्याच्या हृदय गृहाचा अतिथी आहे. त्याचे आतिथ्य करण्यासाठी त्याला श्रद्धा रसात विभोर होऊन स्तुतिवाणीरूप अर्ध्य दान केला पाहिजे. इंद्र परमेश्वर एक असामान्य अतिथी आहे, की जो आतिथ्य करणाऱ्याला ज्योती, कीर्ती आणि सत्यादी सद्गुणरूप स्वर्ण दतो, आपल्या बळाद्वारे त्याची रक्षा करतो आणि स्तोत्याच्या शरीरातील मनाला व प्राणाला नियंत्रित करून त्याला दीर्घायू आणि सामर्थ्य प्रदान करतो. ।। ७।।
विशेष -
या मंत्रात ‘इन्द्राय गाः पाहि’ या वाक्याने असा उपमालंकार ध्वनित होतो की एक गृहस्थ, विद्वान अतिथीसाठी गायी पाळतो. ‘इन्द्रा’ ‘इन्द्रे’ येथे छेकानुप्रास ‘हर्मो र्योहि’मध्ये वृत्त्यानुप्रास आणि ङ्गहिरण्यय, हिरण्ययः) मध्ये यमक अलंकार आहे. ।। ७।।