Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 31
ऋषिः - प्रस्कण्वः काण्वः
देवता - अग्निः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
0
उ꣢दु꣣ त्यं꣢ जा꣣त꣡वे꣢दसं दे꣣वं꣡ व꣢हन्ति के꣣त꣡वः꣢ । दृ꣣शे꣡ विश्वा꣢꣯य꣣ सू꣡र्य꣢म् ॥३१॥
स्वर सहित पद पाठउ꣢त् । उ꣣ । त्य꣢म् । जा꣣त꣡वे꣢दसम् । जा꣣त꣢ । वे꣣दसम् । देव꣢म् । व꣣हन्ति । केत꣡वः꣢ । दृ꣣शे꣢ । वि꣡श्वा꣢꣯य । सू꣡र्य꣢꣯म् ॥३१॥
स्वर रहित मन्त्र
उदु त्यं जातवेदसं देवं वहन्ति केतवः । दृशे विश्वाय सूर्यम् ॥३१॥
स्वर रहित पद पाठ
उत् । उ । त्यम् । जातवेदसम् । जात । वेदसम् । देवम् । वहन्ति । केतवः । दृशे । विश्वाय । सूर्यम् ॥३१॥
सामवेद - मन्त्र संख्या : 31
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 11
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 3;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 11
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 3;
Acknowledgment
विषय - आता पुढील मंत्रात सूर्याच्या उदाहरणावरून परमेश्वराविषयी उपदेश केला आहे. -
शब्दार्थ -
प्रथम अर्थसू (सूर्यपरक) (केतन:) त्याची किरणे (त्यम्) चा प्रख्यात (जातवेदसम) उत्पन्न पदार्थांना प्रकाशित करणाऱ्या (देवम्) प्रकाशमान, प्रकाशक, दिवस रात्र आदींचा निर्माता आणि द्युलोकात स्थित (सूर्यम्) सूर्यरूप अग्नीला (विश्वाय दृशे) सर्व लोकांना पाहता यावे यासाठी (उद्वहन्ति) त्याची किरणे त्या सूर्याला पृथ्वी आदी लोकांपर्यंत नेतात अर्थात सूर्य वर आकाशात स्थित असूनही त्याच्या किरणांद्वारे सर्व लोकांपर्यंत पोहोचतो.
द्वितीय अर्थ : (परमेश्वरपरक) - (केतव:) ज्यांना ऋतम्भरा प्रज्ञा प्राप्त झाली आहे, असे योगीजन (त्यम्) स्वत: अनुभूत त्या प्रसिद्ध (जातवेदसम) सर्वज्ञ, सर्वव्यापी, धनोत्पादक आणि ज्ञानप्रदायक (देवम्) दिव्यगुण प्रदाता (सूर्यम्) सूर्यवत ज्योतिर्मय परमेश्वररूप अग्नीचा, (विश्वाय दृशे) सर्वांना त्या ईश्वराचा साक्षात्कार करता यावा, याकरीता (उद्वहन्ति) सर्वत्र प्रचारीत करतात. ।।११।।
भावार्थ - सूर्याची किरणे त्याचा प्रकाश भूमी आदी लोकांपर्यंत नेतात की ज्यायोगे सर्व प्राणी, पदार्थ पाहू शकतात, त्याचप्रमाणे योगी विद्वज्जन स्वत: परमेश्वराचा साक्षात्कार करून इतरांना अनुभवणे शक्य व्हावे यासाठी त्या साक्षात्काराचा/परमेश्वराचा सर्वांसाठी प्रचार करतात. ।।११।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. सूर्याचा आणि परमेश्वराचा उपमान उपमेयभाव आहे. ।।११।।