Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 315
ऋषिः - गातुरात्रेयः देवता - इन्द्रः छन्दः - त्रिष्टुप् स्वरः - धैवतः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0

अ꣡द꣢र्द꣣रु꣢त्स꣣म꣡सृ꣢जो꣣ वि꣢꣫ खानि꣣ त्व꣡म꣢र्ण꣣वा꣡न्ब꣢द्बधा꣣ना꣡ꣳ अ꣢रम्णाः । म꣣हा꣡न्त꣢मिन्द्र꣣ प꣡र्व꣢तं꣣ वि꣢꣫ यद्वः सृ꣣ज꣢꣫द्धा꣣रा अ꣢व꣣ य꣡द्दा꣢न꣣वा꣢न्हन् ॥३१५॥

स्वर सहित पद पाठ

अ꣡द꣢꣯र्दः । उ꣡त्स꣢꣯म् । उत् । स꣣म् । अ꣡सृ꣢꣯जः । वि । खा꣡नि꣢꣯ । त्वम् । अ꣣र्णवा꣢न् । ब꣣द्बधा꣣नान् । अ꣢रम्णाः । महा꣡न्त꣢म् । इ꣣न्द्र प꣡र्व꣢꣯तम् । वि । यत् । व꣡रिति꣢ । सृ꣣ज꣢त् । धा꣡राः꣢꣯ । अ꣡व꣢꣯ । यत् । दा꣣नवा꣢न् । ह꣣न् ॥३१५॥


स्वर रहित मन्त्र

अदर्दरुत्समसृजो वि खानि त्वमर्णवान्बद्बधानाꣳ अरम्णाः । महान्तमिन्द्र पर्वतं वि यद्वः सृजद्धारा अव यद्दानवान्हन् ॥३१५॥


स्वर रहित पद पाठ

अदर्दः । उत्सम् । उत् । सम् । असृजः । वि । खानि । त्वम् । अर्णवान् । बद्बधानान् । अरम्णाः । महान्तम् । इन्द्र पर्वतम् । वि । यत् । वरिति । सृजत् । धाराः । अव । यत् । दानवान् । हन् ॥३१५॥

सामवेद - मन्त्र संख्या : 315
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 9;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (परमेश्वरपर) हे (इन्द्र) परमेश्वर, (त्वम्) समस्त सृष्टीचे उत्पादक, व्यवस्थापक तुम्ही आहात. सूर्याची रचना केल्यानंतर त्या साधनाद्वारे तुम्ही (उत्सम्) जलाचा जो आधार, मेघ, त्याचे (अदर्दः) विदारण करता. (खानि) ढगांच्या छिद्रांना (वि असृजः) उघडे कतरा (त्यामुळे पाूस पडतो) तसेच (बद्बधानान्) न बरसणाऱ्या ढगामध्ये दृढतेने बंद झालेल्या (अर्णवान्) जल-धारा तुम्ही (अरम्णाः) मुक्त कतरा अशा प्रकारे वृष्टि कर्माचे वर्णन केल्यानंतर मंत्रात पर्वतावरून वाहत येणाऱ्या जलधारांचे वा निर्झरादीचे वर्णन आहे. (यत्) तुम्ही जेव्हा (महान्तम्) विशाल (पर्वतम्) हिम पर्वताचे (विवः) वितकणे कार्य आरंभ करता आणि जेव्हा त्या (दानवान्) जल प्रवाहात बाधक असलेल्या शिळा आदींना (हत्) दूर सारता (आणि अशा प्रकारे नदी-जल पुढे पुढे राहत जाते.) तेव्हा (धाराः) नदी-धारा (अव सृजत्) प्रवाहित होत राहते. (पर्वत, हिम, निझर, जलधारा, नदी हे सर्व लोकोपकारी कार्ये तुमच्याच कृपेने होत आहेत.)।। या वर्णनावरून राजाविषयी कथन देखील सूचित होत आहे. जसे परमेश्वर वा सूर्य वृष्टि प्रतिबंधक मेघाला विच्छिन्न करून त्यात अडकून राहिलेल्या जलधारा मुक्त करतो. तद्वत राजानेही राष्ट्रोन्नतीत बाधक शत्रूला विदीर्ण करून त्यांनी अवरुद्ध केलेल्या ऐश्वर्य-धारा मुक्त कराव्यात.।। द्वितीय अर्थ - परमेश्वरपर (हा अर्थही परमेश्वरपरच आहे, पण शब्दाचा अर्थ नेमका व आध्यात्मिक स्वरूपातील आहे.) हे (इन्द्र) परमेश्वर, (त्वम्) तुम्ही (उत्सम्) ज्ञानाचा अवरुद्ध स्त्रोत (अदर्दः) उघडा वा मोकळा करणारे आहात (खानि) अंतरात्म्यापासून पराड्मुख झालेल्या व बहिर्मुख झालेल्या इंद्रियांना तुम्ही (वि असृजः) बाह्य विषयांपासून पृथक करता, तसेच (बद् बधानाम्) आनंदमय कोशात अडकलेल्या (अर्णवान्) आनंद पारावाराला (अरम्णाः) मनोमय कोशामध्ये कारंज्याप्रमाणे वेगाने पाठविता. (यत्) जेव्हा तुम्ही (महान्तम्) विशाल (पर्वतम्) योग मार्गात विघ्न होऊन येणाऱ्या व्याधी, सत्यान, संशय, प्रमाद, आलस्य आदी पर्वतांना (विवः) विदीर्ण करता आणि (यत्) जेव्हा तुम्ही (दानवान्) अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेशरूप दानवांना (हत्) विनष्ट करता, तेव्हा (धाराः) कैवल्य प्राप्त करविणाऱ्या धर्म मेघ समाधीच्या धारांना तुम्ही (अव सृजत्) प्रवाहित करता.।। ३।।

भावार्थ - परमेश्वर जसे पाऊस पाडणे, नद्या वाहणे आदी निसर्ग कार्ये संपन्न करतो, तसेच योगाभ्यासी मुमुक्षु मनुष्याच्या योग मार्गात येणाऱ्या विघ्नांचेही निवारण करून त्याच्या आत्म्यात आनंदाची वृष्टी करून त्यास मोक्ष देतो.।। ३।।

इस भाष्य को एडिट करें
Top