Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 322
ऋषिः - सुहोत्रो भारद्वाजः
देवता - इन्द्रः
छन्दः - त्रिष्टुप्
स्वरः - धैवतः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
अ꣡पू꣢र्व्या पुरु꣣त꣡मा꣢न्यस्मै म꣣हे꣢ वी꣣रा꣡य꣢ त꣣व꣡से꣢ तु꣣रा꣡य꣢ । वि꣣रप्शि꣡ने꣢ व꣣ज्रि꣢णे꣣ श꣡न्त꣢मानि꣣ व꣡चा꣢ꣳस्यस्मै꣣ स्थ꣡वि꣢राय तक्षुः ॥३२२॥
स्वर सहित पद पाठअ꣡पू꣢꣯र्व्या । अ । पू꣣र्व्या । पुरुत꣡मा꣢नि । अ꣣स्मै । महे꣢ । वी꣣रा꣡य꣢ । त꣣व꣡से꣢ । तु꣣रा꣡य꣢ । वि꣣रप्शि꣡ने । वि꣣ । रप्शि꣡ने꣢ । व꣣ज्रि꣡णे꣣ । श꣡न्त꣢꣯मानि । व꣡चां꣢꣯ऽसि । अ꣣स्मै । स्थ꣡वि꣢꣯राय । स्थ । वि꣣राय । तक्षुः ॥३२२॥
स्वर रहित मन्त्र
अपूर्व्या पुरुतमान्यस्मै महे वीराय तवसे तुराय । विरप्शिने वज्रिणे शन्तमानि वचाꣳस्यस्मै स्थविराय तक्षुः ॥३२२॥
स्वर रहित पद पाठ
अपूर्व्या । अ । पूर्व्या । पुरुतमानि । अस्मै । महे । वीराय । तवसे । तुराय । विरप्शिने । वि । रप्शिने । वज्रिणे । शन्तमानि । वचांऽसि । अस्मै । स्थविराय । स्थ । विराय । तक्षुः ॥३२२॥
सामवेद - मन्त्र संख्या : 322
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 9;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 9;
Acknowledgment
विषय - कशा परमेश्वरासाठी कशा प्रकारची स्तुतिवचने म्हणावीत ?
शब्दार्थ -
(असै) या (महे) महान (वीवाय) वीर अथवा काम, क्रोध आदी दोषांना प्रकम्पित करणाऱ्या, (तवसे) बलवान आणि (तुराय) सर्व कार्य त्वरित पूर्ण करणाऱ्या इंद्र परमेश्वरासाठी (स्तोताजन स्तोत्र रचतात व गातात) तसेच (अस्मै) याच (विरप्शिने) विशेषत्वाने वेदांचे ज्ञान मानवास देणाऱ्या आणि विशेषत्वाने स्तुत्य आणि (वज्रिणे) वज्रधारी व्यक्तीप्रमाणे दुष्टांना दंडित करणाऱ्या, (स्थविराय) वृद्धतय, पुराण, पुरुष इंद्र परमेश्वरासाठी वा त्याच्या स्तवनासाठी स्तोताजन (अपूर्व्या) अपूर्व (पुरुतमानि) अनेक (शन्तमानि) अत्यंत शांतिकारक (वचांसि) स्तोत्र (पद वा गीत) (तक्षुः) लिहितात अथवा त्यांचे गान वाचन करतात. ।। १०।।
भावार्थ - पुराण पुरुष परमेश्वर सर्वांहून महान, सर्वांहून वीर, सर्वांहून बली, सर्वांहून शीघ्रकारी, सर्वांहून स्तुत्य, सर्वांहून दुष्ट नाशक, सर्वांहून वोयवृद्ध आणि सर्वांहून ज्ञानवृद्ध व प्राचीन आहे. (कारण तो अनंत व अजन्मा आहे) सर्वांकरिता आवश्यक आहे की प्रत्येकाने वैदिक मंत्रांद्वारा अथवा स्वरचित पद वा गीताद्वारे तसेच अन्य महाकवींद्वारे ईश्वराच्या स्तुती, प्रार्थना, उपासनेकरिता रचलेल्या स्तोत्राद्वारे त्या परम पुरुषाची उपासना करावी. ।। १०।। या दशतीमध्ये इंद्राचे संबोधन, गुणवर्णन, गुण वर्णनाद्वारे सृष्टी- उत्पत्तीचे वर्णन, त्याची स्तुती केली आहे. तसेच इंद्र नावाने सूर्य, राजा, आचार्य आयीच्या कर्मांचे वर्णन केले आहे. यामुळे या दशतीतील विषयांची मागील दशतीच्या विषयासी संगती आहे, असे जाणावे.।। चतुर्थ प्रपाठकातील प्रथम अर्घाची तृतीय दशती समाप्त.।। तृतीय अध्यायातील नवम खंड समाप्त।।
विशेष -
या मंत्रात इंद्राची सर्व विशेषणे सभिप्राय आहेत. (जाणीवपूर्वक वापरलेली आहेत) म्हणून येथे परिकर अलंकार आहे. ‘तमान्- तमानि, वीरण्य-वीराय’ या शब्दामुळे छेकानुप्रास आणि ‘राय’ शब्दाची तीन वेळा आवृत्ती झाल्यामुळे आणि ‘वीर, विर, विरा’मुळे वृत्त्यनुप्रास आहे. ।। १०।।