Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 332
ऋषिः - अरिष्टनेमिस्तार्क्ष्यः देवता - इन्द्रः छन्दः - त्रिष्टुप् स्वरः - धैवतः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0

त्य꣢मू꣣ षु꣢ वा꣣जि꣡नं꣢ दे꣣व꣡जू꣢तꣳ सहो꣣वा꣡नं꣢ तरु꣢ता꣢रं꣣ र꣡था꣢नाम् । अ꣡रि꣢ष्टनेमिं पृत꣣ना꣡ज꣢मा꣢शु꣣ꣳ स्व꣣स्त꣢ये꣣ ता꣡र्क्ष्य꣢मि꣣हा꣡ हु꣢वेम ॥३३२॥

स्वर सहित पद पाठ

त्य꣢म् । उ꣣ । सु꣢ । वा꣣जि꣡न꣢म् । दे꣣व꣡जू꣢तम् । दे꣣व꣢ । जू꣣तम् । सहोवा꣡न꣢म् । त꣣रुता꣡र꣢म् । र꣡था꣢꣯नाम् । अ꣡रि꣢꣯ष्टनेमिम् । अ꣡रि꣢꣯ष्ट । ने꣣मिम् । पृतना꣡ज꣢म् । आ꣣शु꣢म् । स्व꣣स्त꣡ये꣢ । सु꣣ । अस्त꣡ये꣢ । ता꣡र्क्ष्य꣢꣯म् । इ꣣ह꣢ । हु꣣वेम ॥३३२॥


स्वर रहित मन्त्र

त्यमू षु वाजिनं देवजूतꣳ सहोवानं तरुतारं रथानाम् । अरिष्टनेमिं पृतनाजमाशुꣳ स्वस्तये तार्क्ष्यमिहा हुवेम ॥३३२॥


स्वर रहित पद पाठ

त्यम् । उ । सु । वाजिनम् । देवजूतम् । देव । जूतम् । सहोवानम् । तरुतारम् । रथानाम् । अरिष्टनेमिम् । अरिष्ट । नेमिम् । पृतनाजम् । आशुम् । स्वस्तये । सु । अस्तये । तार्क्ष्यम् । इह । हुवेम ॥३३२॥

सामवेद - मन्त्र संख्या : 332
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 11;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (परमात्मपर अर्थ) - आम्ही (त्यम् उ) त्या (वाजिनम्) अन्न आणि धनाचा जो स्वामी, (देवपूतम्) विद्वान योगी ज्यास प्राप्त करतात अथवा प्रकषाक सूर्य,चंद्र आदीमध्येच मन, नेत्र आदीमध्ये जो व्याप्त आहे, (सहो वायम्) जो, साहसी व बली आहे, त्या परमेश्वराला आम्ही उपासकांनी कल्याणाकरिता हाक द्यावी. तसेच आम्ही (रथानाम्) शरीररूप रथांचा अथवा गतिशील पृथ्वी, सूर्य, चंद्र आदी लोकांचा जो (तरुतारम्) निर्माण करणारा वा त्यांचे संचालन करणारा, (अरिष्टनेभिम्) ज्याची दंडशक्ती अप्रतिहृत, अबाध आहे, (पृतनाजम्) काम, क्रोधादीच्या सैन्याला जो दर फेकतो आणि सत्य, दया, औदार्य आदी सद्गुणांच्या सैन्याला जो प्रोत्साहन देतो, जो (आशुम्) शीघ्रकारी असून (तार्क्ष्यम्) विस्तीर्ण जगात निवास करणारा, समस्त भुवनात व्यापक आहे. अशा त्या प्राप्तव्य परमेश्वराला आम्हा उपासकांनी (इह) आपल्या या जीवनात (स्वस्तये) आपल्या उद्धारासाठी (सु हुवेम) मनापासून हाक मारावी, हेच योग्य आहे.।। द्वितीय अर्थ - (सेनापतिपर अर्थ) - आम्ही (प्रजाजन) (त्यम्) त्या (सेनापतीचे रक्षणासाठी हाक देत आहोत) तो कसा आहे / ?(वाजिनम्) तो वेगाने चाल करून वा धावून येणारा, सात्त्विक आहार घेणारा, बलवान व योद्धा आहे. त्या (देवजूतम्) राजाद्वारा ज्याला युद्धासाठी पाठविले गेले आहे. जो (सहोवानम्) क्षात्र- तेजयुक्त असून (रथानाम्) युद्धाचे विमान, यान आदी (तुरतारम्) संचालन करणारा आहे, जो (अरिष्ट नेमिम्) अक्षत रथचक्र असणारा असून (पृतवाजम्) संग्रामासाठी आपले सैन्य पाठविणारा वा शत्रुसैन्य ध्वस्त करणारा आहे, अशा (आशुम्) शीघ्रकारी, निरालस (तार्क्ष्यम्) गरुडाप्रमाणे आक्रमण करणाऱ्या व वायुप्रमाणे आपल्या सैन्याला जीवन देणाऱ्या आणि शत्रुपक्ष- भंजक सेनापतीला (इह) आम्ही प्रजाजन या संग्रामकाळी (स्वस्तये) राष्ट्राच्या रक्षणासाठी (सु हुवेम) विश्वासाने हाक मारतो वा त्यांना प्रोत्साहित करतो.।। तृतीय अर्थ - (वायु आणि विद्युत पर अर्थ) - आम्ही (सर्व राष्ट्रवासीजन) (त्यम्) त्या (वाजिनम्) अतिशय वेगवान (देवजूतम्) शिल्पविद्येचे ज्ञाता कुशल शिल्पीजनांद्वारे यान आदींमध्ये प्रयुक्त होणाऱ्या (सहोवानम्) अत्यंत शक्तिशाली (रथानाम्) समुद्र, भूमी व आकाशात चालणारे वायुयानात अथवा विद्युत संचालित यान (हाक तारम्) चालविणाऱ्या (वायु वा विद्युतरूप अग्नीचा यानादीमध्ये प्रयोग करावा) तसेच (पृतनाजन्) संग्रामासाठी आवश्यक त्या सैन्याला दूरस्य देशा- प्रदेशाला नेणाऱ्या अथवा युद्धात विजय प्राप्तीसाठी साधन भूत (आशुम्) यानांना आवश्यक तीव्र गती देणाऱ्या (तार्क्ष्यम्) आकाशस्थ वायूचा अथवा विद्युत अग्नीचा आम्ही (शिल्पी- अभियंताजनांनी) (इह) या शिल्प यज्ञामध्ये (स्वस्तये) सुख सोयीकरिता (हुवेम) यानांमध्ये उपयोग करावा. ।। १।।

भावार्थ - सर्व जनांचे कर्तव्य आहे की उपासना- यज्ञात सकल जमद्वव्यापी परमेश्वराचे ध्यान करावे. राष्ट्र यज्ञात गरूडाप्रमाणे झेप घेणाऱ्या शत्रु सैन्यहन्ता सेनापतीचे सहाय्य घ्यावे आणि शिल्प यज्ञात कला कौशलाचे जे साधन त्या वायूचा व विद्युतेचा उपयोग घ्यावा. ।। १।।

इस भाष्य को एडिट करें
Top