Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 338
ऋषिः - विश्वामित्रो गाथिनः
देवता - इन्द्रः
छन्दः - त्रिष्टुप्
स्वरः - धैवतः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
इ꣡न्द्रा꣢पर्वता बृह꣣ता꣡ रथे꣢꣯न वा꣣मी꣢꣫रिष꣣ आ꣡ व꣢हतꣳ सु꣣वी꣡राः꣢ । वी꣣त꣢ꣳ ह꣣व्या꣡न्य꣢ध्व꣣रे꣡षु꣢ देवा꣣ व꣡र्धे꣢थां गी꣣र्भी꣡रिड꣢꣯या꣣ म꣡द꣢न्ता ॥३३८॥
स्वर सहित पद पाठइ꣡न्द्रा꣢꣯पर्वता । बृ꣣हता꣢ । र꣡थे꣢꣯न । वा꣣मीः꣢ । इ꣡षः꣢ । आ । व꣣हतम् । सुवी꣡राः꣢ । सु꣣ । वी꣡राः꣢꣯ । वी꣣त꣢म् । ह꣣व्या꣡नि꣢ । अ꣣ध्वरे꣡षु꣢ । दे꣣वा । व꣡र्धे꣢꣯थाम् । गी꣣र्भिः꣢ । इ꣡ड꣢꣯या । म꣡द꣢꣯न्ता ॥३३८॥
स्वर रहित मन्त्र
इन्द्रापर्वता बृहता रथेन वामीरिष आ वहतꣳ सुवीराः । वीतꣳ हव्यान्यध्वरेषु देवा वर्धेथां गीर्भीरिडया मदन्ता ॥३३८॥
स्वर रहित पद पाठ
इन्द्रापर्वता । बृहता । रथेन । वामीः । इषः । आ । वहतम् । सुवीराः । सु । वीराः । वीतम् । हव्यानि । अध्वरेषु । देवा । वर्धेथाम् । गीर्भिः । इडया । मदन्ता ॥३३८॥
सामवेद - मन्त्र संख्या : 338
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 11;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 11;
Acknowledgment
विषय - पुढील मंत्राची देवता ‘इंद्र-पर्वत’ आहे. या दोन नावाने इथे जीवात्मा- प्राण या युगलाची कल्पना केली आहे. -
शब्दार्थ -
हे (इन्द्रापर्वता) जीवात्मा आणि प्राण, तुम्ही दोघे (बृहता) महान (रथेन) शरीररूप रथाने (सुवीराः) उत्तम वीर संतती अथवा वीर भावनांनी ओतप्रोत अशा (वामीः) भजनीय (इषः) इच्छित आध्यात्मिक व भौतिक संपदा (आ वहतम्) (आम्हा मनुष्यांना) मिळेल, असे करा. हे (देवा) दिव्य गुण-कर्म असलेले जीवात्मा व प्राण, तुम्ही दोघे (अध्वरेषु) शरीर धारणरूप यज्ञांमध्ये (हव्यानि) भोज्य पदार्थ, पेय पदार्थ आदी हवींचा (वीतम्) आस्वाद घ्या. (गीर्भिः) वाणीद्वारे आणि (इडया) अन्न व गो दुग्द आदीद्वारे (मदन्ता) तृप्त होत (वर्द्धेथाम्) वृद्धिंगत व्हा. (शरीर हे यज्ञ व भोज्य, पेय पदार्थ हे यज्ञातील आहुती - अशा रूपाने प्राणशक्ती बलवती होते.)।। ७।।
भावार्थ - जीवात्मा संचित कर्मांचे फळ भोगण्यासाठी तसेच नवीन कर्म करण्यासाठी मन, इंद्रिये आदींनी युक्त अशा प्राणशक्तीसह या शरीरस्य रथात राहतो. या दोघांत म्हणजे जीवात्मा व प्राण यात शरीराच्या माध्यमाने उत्कृष्ट संतान उत्पन्न करण्याचे आणि विविध दिव्य, भौतिक संपदा प्राप्त करण्याचे सामर्थ्य असते. यथोचित भोज्य, पेय पदार्थ आणि ज्ञान, कर्म, प्राणायाम आदींची हवी देऊन सर्वांनी त्यांची शक्ती वाढविली पाहिजे.।। ७।।
इस भाष्य को एडिट करें