Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 350
ऋषिः - विश्वामित्रो गाथिनः देवता - इन्द्रः छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0

ए꣢तो꣣ न्वि꣢न्द्र꣣ꣳ स्त꣡वा꣢म शु꣣द्ध꣢ꣳ शु꣣द्धे꣢न꣣ सा꣡म्ना꣢ । शु꣣द्धै꣢रु꣣क्थै꣡र्वा꣢वृ꣣ध्वा꣡ꣳस꣢ꣳ शु꣣द्धै꣢रा꣣शी꣡र्वा꣢न्ममत्तु ॥३५०॥

स्वर सहित पद पाठ

आ꣢ । इ꣣त । उ । नु꣢ । इ꣡न्द्र꣢꣯म् । स्त꣡वा꣢꣯म । शु꣣द्ध꣢म् । शु꣣द्धे꣡न꣢ । सा꣡म्ना꣢꣯ । शु꣣द्धैः꣢ । उ꣣क्थैः꣢ । वा꣣वृध्वाँ꣡स꣢म् । शु꣣द्धैः꣢ । आ꣣शी꣡र्वा꣢न् । आ꣣ । शी꣡र्वा꣢꣯न् । म꣣मत्तु ॥३५०॥


स्वर रहित मन्त्र

एतो न्विन्द्रꣳ स्तवाम शुद्धꣳ शुद्धेन साम्ना । शुद्धैरुक्थैर्वावृध्वाꣳसꣳ शुद्धैराशीर्वान्ममत्तु ॥३५०॥


स्वर रहित पद पाठ

आ । इत । उ । नु । इन्द्रम् । स्तवाम । शुद्धम् । शुद्धेन । साम्ना । शुद्धैः । उक्थैः । वावृध्वाँसम् । शुद्धैः । आशीर्वान् । आ । शीर्वान् । ममत्तु ॥३५०॥

सामवेद - मन्त्र संख्या : 350
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 12;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे सहकाऱ्यांनो, बांधवांनो, (ए त उ) इकडे या (तु) लवकरच तुम्ही व आम्ही मिळून (शुद्धम्) (इन्द्रम्) पवित्र जगदीश्वराची (शुद्धेन) (साम्ना) पवित्र सामगानाद्वारे (स्तवाम) स्तुती करू या. (शुद्धैः) पवित्र (स्तोत्रैः) स्तोत्रांच्या गायनामुळे (वावृध्वोसम्) वृद्धिंगत, उन्नत झालेले आम्हांपैकी प्रत्येक जण (आशीर्वान्) आशीर्वादांचा जो अधिपती, त्या जगदीश्वराचे (शुद्धैः) पवित्र आशीर्वाद (ममत्तु) आम्हा सर्वांना आनंदित करतो.।। ९।।

भावार्थ - स्तोताजनांद्वारे शुद्ध सामगानाच्या माध्यमातून जेव्हा प्रेमाने परमेश्वराची स्तुती केली जाते, तेव्हा परमेश्वर स्तोताजनांना आशीर्वादाद्वारे त्यांची उन्नती घडवितो व त्यांना आनंदित कतो.।। ९।। या मंत्रात सायणाचार्यानी इतिहास दाखविला आहे - तो असा - ‘‘पूर्वी एकेकाळी वृत्रासुरांचा वध केल्यामुळे इंद्राला असे वाटू लागले की ब्रह्महत्या केल्यामुळे तो (इंद्र) अपवित्र झाला आहे. त्या दोषाचा परिहार करण्यासाठी इंद्र ऋषींना म्हणाला, ‘आपण मला सामगानाद्वारे शुद्ध करा.’ तेव्हा ऋषींनी शोधक सामाद्वारे व शस्त्राद्वारे त्यास पवित्र केले. नंतर शुद्ध झालेल्या त्या इंद्रासाठी ऋषींनी याग आदी कर्मात आहुतीदेखील दिल्या.’’ या इतिहासात, जो असुर वध्य आहे, त्याला मारण्याने देवांनाही पाप लागते, ही कल्पना केली असल्यामुळे सर्व वर्णन असंगत व असत्य आहे.

इस भाष्य को एडिट करें
Top