Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 364
ऋषिः - प्रियमेध आङ्गिरसः
देवता - इन्द्रः
छन्दः - अनुष्टुप्
स्वरः - गान्धारः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
वि꣣श्वा꣡न꣢रस्य व꣣स्प꣢ति꣣म꣡ना꣢नतस्य꣣ श꣡व꣢सः । ए꣡वै꣢श्च चर्षणी꣣ना꣢मू꣣ती꣡ हु꣢वे꣣ र꣡था꣢नाम् ॥३६४॥
स्वर सहित पद पाठवि꣣श्वा꣡न꣢रस्य । वि꣣श्व꣢ । नर꣣स्य । वः । प꣡ति꣢꣯म् । अ꣡ना꣢꣯नतस्य । अन् । आ꣣नतस्य । श꣡व꣢꣯सः । ए꣡वैः꣢꣯ । च꣣ । चर्षणीना꣢म् । ऊ꣣ती꣢ । हु꣣वे । र꣡था꣢꣯नाम् ॥३६४॥
स्वर रहित मन्त्र
विश्वानरस्य वस्पतिमनानतस्य शवसः । एवैश्च चर्षणीनामूती हुवे रथानाम् ॥३६४॥
स्वर रहित पद पाठ
विश्वानरस्य । विश्व । नरस्य । वः । पतिम् । अनानतस्य । अन् । आनतस्य । शवसः । एवैः । च । चर्षणीनाम् । ऊती । हुवे । रथानाम् ॥३६४॥
सामवेद - मन्त्र संख्या : 364
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 2;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 2;
Acknowledgment
विषय - बळाधिपती परमेश्वराला व नृपतीला आवाहन
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (परमात्मपर अर्थ)- हे इंद्र जगदीश्वर, (विश्वानरस्य) सर्व जगाचे संचालक, (अनामतस्य) कुठेही कधीही न वाकणारे अर्थात पराजित न होणारे तसेच (शवसः) शक्तीचे (पतिम्) हे अधीश्वर, (चर्षणीनाम्) मनुष्यांच्या (एवैः) सत्कामनांच्या पूर्ततेसाठी आणि (रथानाम्) त्यांच्या शरीररूप रथांना (ऊती) लक्ष्याकडे प्रेरित करण्यासाठी व रक्षणासाठी मी (एक उपासक) (वः) आपणास (हुवे) पुकारत आहे.।।
द्वितीय अर्थ - (राजापर अर्थ) हे राजा, (विश्वानरस्य) सर्वांच्या पुढे जाणारी (अनानतस्य) कोणाहीसमोर न वाकणारी म्हणजे सदा अपराजित अशा (शवसः) सेनेचे जे (पतिम्) स्वामी, असा (वः) आपणास (चर्षणीनाम्) प्रजेच्या (एवैः) महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी व प्रारब्ध कार्यांच्या पूर्तीसाठी आणि (रथानाम्) विमान आदी मान (ऊती) चालविण्यासाठी (वैमानिक व सैन्याधिकाऱ्यांकडून संचालन करून घेण्यासाठी) मी (एक प्रजाजन) आपणास (हुवे) हाक देत आहे.।। ५।।
भावार्थ - जगदीश्वरच जीवनयात्रेसाठी जीवात्म्यांना त्यांच्या त्यांच्या कर्मांप्रमाणए उत्कृष्ट वा अन्यथा शरीररथ प्रदान करतो. त्याचप्रमाणे राजानेही प्रजाजनांना प्रवास शीग्र करता यावा, यासाठी विमान आदी रथांची निर्मिती केली पाहिजे.।। ५।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे.।। ५।।