Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 398
ऋषिः - वसिष्ठो मैत्रावरुणिः देवता - इन्द्रः छन्दः - त्रिपदा विराडनुष्टुप् स्वरः - गान्धारः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0

पि꣢बा꣣ सो꣡म꣢मिन्द्र꣣ म꣡न्द꣢तु त्वा꣣ यं꣡ ते꣢ सु꣣षा꣡व꣢ हर्य꣣श्वा꣡द्रिः꣢ । सो꣣तु꣢र्बा꣣हु꣢भ्या꣣ꣳ सु꣡य꣢तो꣣ ना꣡र्वा꣢ ॥३९८॥

स्वर सहित पद पाठ

पि꣡ब꣢꣯ । सो꣡म꣢꣯म् । इ꣣न्द्र । म꣡न्द꣢꣯तु । त्वा꣣ । य꣢म् । ते꣣ । सुषा꣡व꣢ । ह꣣र्यश्व । हरि । अश्व । अ꣡द्रिः꣢꣯ । अ । द्रिः꣣ । सोतुः꣢ । बा꣣हु꣡भ्या꣢म् । सु꣡य꣢꣯तः । सु । य꣣तः । न꣢ । अ꣡र्वा꣢꣯ ॥३९८॥


स्वर रहित मन्त्र

पिबा सोममिन्द्र मन्दतु त्वा यं ते सुषाव हर्यश्वाद्रिः । सोतुर्बाहुभ्याꣳ सुयतो नार्वा ॥३९८॥


स्वर रहित पद पाठ

पिब । सोमम् । इन्द्र । मन्दतु । त्वा । यम् । ते । सुषाव । हर्यश्व । हरि । अश्व । अद्रिः । अ । द्रिः । सोतुः । बाहुभ्याम् । सुयतः । सु । यतः । न । अर्वा ॥३९८॥

सामवेद - मन्त्र संख्या : 398
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 5;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) - (राष्ट्रपर) - हे (हर्यश्व) वेगवान अश्वांचे स्वामी (इंद्र) शत्रुविदारक सेनापती / राजा, तुम्ही सोम आदी औषधींचा वीरत्वदायक हा रस (पिब) प्या. हा रस (त्या) तुम्हास (मन्दतु) उत्साह देवो. (सोतुः) रथ चालकाच्या (बाहुभ्याम्) बाहूंनी जसे (सुयतः) सुनियंत्रित, प्रशिक्षित (अर्वान) घोड्याला चालवतात तसे (सोतुः) रस काढणाऱ्याच्या (बाहुभ्याम्) हातांनी (सुमतः) सुनियंत्रित (अद्रिः) पाटा- वरवंटा रूप साधनांद्वारे (यम्) जो रस (सुषाव) कुटून - गाळून (ते) तुमच्यासाठी तयार केला आहे. (तो तुम्ही प्या). द्वितीय अर्थ - (अध्यात्मपर अर्थ) - हे (हर्यश्व) ज्ञानेद्रिय व कर्मेन्द्रियरूप अश्वांचा स्वामी (इंद्र) माझ्या जीवात्मा, तू (सोयम्) ज्ञान रस व कर्म रस (पिब) पी. ज्ञान व कर्माचा (यत्) तो रस (त्वा) तुला (मदन्तु) आनंदित करो. (सोतुः) रथचालक सारथीच्या (बाहुभ्याम्) बाहूद्वारे (न) जसे (सुयतः) सुप्रशिक्षित (अर्वाः) घोडे नीट मार्गाने चालतात. तद्वत (सुयतः) सुनियंत्रित (अद्रिः) विदीर्ण न होणाऱ्या तुझ्या मनाने (यत्) जो रस (ते) तुझ्यासाठी (सुषाव) तयार केला आहे.।। ८।।

भावार्थ - पुष्टिप्रद सोम आदी औषधींचा रस पिऊन राष्ट्राच्या सैनिकांनी, सेनाध्यक्षाने व राजाने शत्रूंचा पराजय केला पाहिजे, त्याचप्रमाणे राष्ट्राच्या सर्व स्त्री- पुरुष नागरिकांनी आपल्या मनाच्या माध्यमातून ज्ञानेन्द्रियांद्वारे अर्जित ज्ञान- रस व कर्मेन्द्रियांद्वारे अर्जित कर्म- रस प्यावा आणि त्याने ज्ञानी व पुरुषार्थी होऊन ऐहिक- पालकौकिक ुत्कर्ष साधावा. ।। ८।। या दशतीमध्ये इंद्राच्या बल- पराक्रमाचे वर्णन, इंद्रासी संबद्ध आदित्याद्वारे दीर्घायु - प्राप्ती, त्याद्वारे रोग, दुर्भती आदींचे दूरीकणावियी याचना तसेच सोमपानासाठी इंद्राचे आवाहन, हे विषय असून या दशतीतील विषयांची संगती मागील दशतीच्या विषयांशी आहे, असे जाणावे. पंचम प्रपाठकातील प्रतम अर्धाची प्रथम दशती समाप्त. चतुर्थ अध्यायातील पाचवा खंड समाप्त.

इस भाष्य को एडिट करें
Top