Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 399
ऋषिः - सौभरि: काण्व:
देवता - इन्द्रः
छन्दः - ककुप्
स्वरः - ऋषभः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
अ꣣भ्रातृव्यो꣢ अ꣣ना꣡ त्वमना꣢꣯पिरिन्द्र ज꣣नु꣡षा꣢ स꣣ना꣡द꣢सि । यु꣣धे꣡दा꣢पि꣣त्व꣡मि꣢च्छसे ॥३९९॥
स्वर सहित पद पाठअ꣣भ्रातृव्यः꣢ । अ꣣ । भ्रातृव्यः꣢ । अ꣣ना꣢ । त्वम् । अ꣡ना꣢꣯पिः । अन् । आ꣣पिः । इन्द्र । जनु꣡षा꣢ । स꣣ना꣡त् । अ꣣सि । युधा꣢ । इत् । आ꣣पित्व꣢म् । इ꣣च्छसे ॥३९९॥
स्वर रहित मन्त्र
अभ्रातृव्यो अना त्वमनापिरिन्द्र जनुषा सनादसि । युधेदापित्वमिच्छसे ॥३९९॥
स्वर रहित पद पाठ
अभ्रातृव्यः । अ । भ्रातृव्यः । अना । त्वम् । अनापिः । अन् । आपिः । इन्द्र । जनुषा । सनात् । असि । युधा । इत् । आपित्वम् । इच्छसे ॥३९९॥
सामवेद - मन्त्र संख्या : 399
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 6;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 6;
Acknowledgment
विषय - इंद्र नावाने परमेश्वराच्या शत्रुरहितत्वाविषयी कथन
शब्दार्थ -
(इन्द्र) जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय या क्रियांचा कर्ता तू हे परमेश्वरा, (सनात्) सनातन काळापासून (जनुषा) स्वभावतः) (अभ्रातृव्यः) शत्रुरहित आहेस. (तुझा कोणी शत्रू नाही.) (अना तुझा कोणी नेता नाही (तूच सर्वांचा नेता आहेस.) (अनापिः) तुझा कोणी भाऊ (सहायक व समान सा) नाही. तू अबन्धु (असि) आहेस. (युधा इत्) तू युद्धाद्वारेच (आपित्वम्) बंधुत्व (इच्छसे) जोडण्याची इच्छा बाळगत आहेस म्हणजे जो माणूस आंतरिक व बाह्य देवासुर संग्रामामध्ये विजयी होतो, तू त्याचा बंधू वा सहाय्यक होतोस.।। १।।
भावार्थ - कोणीही ज्याचे शत्रुत्व विकत घेण्याचे धाडस करू शकत नाही आणि ज्याला कोणाच्या नेतृत्वाची गरज नाही, असा तो जगदीश्वर पुरुषार्थी, प्रयत्नवादी लोकांचा बंधू वा सहाय्यक होत असतो. अकर्मण्यजनाना तो कधी मदत करीत नाही. ।। १।।
विशेष -
या मंत्रात ‘अना, मना, सना’मध्ये वृत्त्यनुप्रास अलंकार आहे. ‘त्वम्’ त्वमि’मध्ये छेकानुप्रास आहे.।। १।।