Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 402
ऋषिः - सौभरि: काण्व:
देवता - इन्द्रः
छन्दः - ककुप्
स्वरः - ऋषभः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
आ꣡ या꣢ह्य꣣य꣢꣫मिन्द꣣वे꣡ऽश्व꣢पते꣣ गो꣡प꣢त꣣ उ꣡र्व꣢रापते । सो꣡म꣢ꣳ सोमपते पिब ॥४०२॥
स्वर सहित पद पाठआ꣢ । या꣣हि । अय꣢म् । इ꣡न्द꣢꣯वे । अ꣡श्व꣢꣯पते । अ꣡श्व꣢꣯ । प꣣ते । गो꣡प꣢꣯ते । गो । प꣣ते । उ꣡र्व꣢꣯रापते । उ꣡र्व꣢꣯रा । प꣣ते । सो꣡म꣢꣯म् । सो꣣मपते । सोम । पते । पिब ॥४०२॥
स्वर रहित मन्त्र
आ याह्ययमिन्दवेऽश्वपते गोपत उर्वरापते । सोमꣳ सोमपते पिब ॥४०२॥
स्वर रहित पद पाठ
आ । याहि । अयम् । इन्दवे । अश्वपते । अश्व । पते । गोपते । गो । पते । उर्वरापते । उर्वरा । पते । सोमम् । सोमपते । सोम । पते । पिब ॥४०२॥
सामवेद - मन्त्र संख्या : 402
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 6;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 6;
Acknowledgment
विषय - इंद्र नावाने परमात्मा व जीवात्म्याला आवाहन
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) )परमात्मपर) - हे (अश्वपते) अश्वांचे वा ज्यांचे अश्व नाव आहे, अशा अग्नी, मेघ आदींचे ़अधिपती, हे (गोपते) गौ आदी पशूंचे अथवा सूर्यकिरणांचे अधीश्वर, (उर्वरापते) उर्वरा भूमीचे अधीश्वर हे इन्द्र परमेश्वर, (अयम्) से आपण (इन्दवे) आनंद - रसाच्या प्रवाहासाठी (आ याहि) या म्हणजे माझ्या हृदयात प्रकट व्हा. हे (सोमपते) माझ्या ममरूप चंद्राचे अधीश्वर, आपण (सोमम्) माझ्या श्रद्धारसाचे (पिब) प्राशन करा.।।
द्वितीय अर्थ - (जीवात्मापर) - हे (अश्वपते) इंद्रियरूप अश्वांचे स्वामी. हे (गोपते) वाणी व प्राणांचे स्वामी, हे (उर्वरापते) ः ऋद्धि-सिद्धीच्या उर्वरा बुद्धीचे स्वामी, हे माझ्या अंतरात्मा, (अयम्) हे तू (इन्दवे) परमेश्वर - उपासनेच्या आनंद प्राप्तीसाठी (आ याहि) तत्पर हो. हे (सोमपते) मनाचे स्वामी, तू (सोमम्) ब्रह्मानंद रसाचे (पिब) प्राशन कर.।। ४।।
भावार्थ - जो जीवात्मा शरीरस्य मन, बुद्धी, प्राण, चक्ष, श्रोत्र आदींचा तसेच ज्ञान, कर्म आदींचा अधिष्ठाता आहे. त्याने नित्य जगदीश्वराच्या उपासनेद्वारे ब्रह्मानंद रसाचे अवश्य सेवन केले पाहिजे.।। ४।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. ‘पते’च्या आवृत्तीत लाटानुप्रास व ‘सोय’च्या आवृत्तीत यमक अलंकार आहे. ।। ४।।