Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 404
ऋषिः - सौभरि: काण्व:
देवता - मरुतः
छन्दः - ककुप्
स्वरः - ऋषभः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
गा꣡व꣢श्चिद्घा समन्यवः सजा꣣꣬त्ये꣢꣯न म꣣रु꣢तः꣣ स꣡ब꣢न्धवः । रि꣣ह꣡ते꣢ क꣣कु꣡भो꣢ मि꣣थः꣢ ॥४०४॥
स्वर सहित पद पाठगा꣡वः꣢꣯ । चि꣣त् । घ । समन्यवः । स । मन्यवः । सजात्ये꣢꣯न । स꣣ । जात्ये꣢꣯न । म꣣रु꣡तः꣢ । स꣡ब꣢꣯न्धवः । स । ब꣣न्धवः । रिह꣡ते꣢ । क꣣कु꣡भः꣢ । मि꣣थः꣢ ॥४०४॥
स्वर रहित मन्त्र
गावश्चिद्घा समन्यवः सजात्येन मरुतः सबन्धवः । रिहते ककुभो मिथः ॥४०४॥
स्वर रहित पद पाठ
गावः । चित् । घ । समन्यवः । स । मन्यवः । सजात्येन । स । जात्येन । मरुतः । सबन्धवः । स । बन्धवः । रिहते । ककुभः । मिथः ॥४०४॥
सामवेद - मन्त्र संख्या : 404
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 6;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 6;
Acknowledgment
विषय - मरुतः (अनेक मरुत) देवता। मरुतांशी बंधुत्व सावे.
शब्दार्थ -
हे (समन्यवः) तेजस्वी (गावः) स्तोता ब्राह्मणजनहो, (सजात्येन) समान जातीचे असल्यामुळे (मरुतः) क्षत्रिय योद्धा (चिद् घ) अवश्यमेव (सबन्धनः) तुमचे बंधु आहेत. कारण ते युद्धाच्या प्रसंगी (मिथः) सर्वजण मिळून (ककुभः) दिशा- दिशांमध्ये (रिहते) व्याप्त होतात. (चारही दिशात आक्रमण करतात) व शत्रूचा सामना करतात.) अथवा ते क्षत्रिय (मिथः तुम्हा ब्राह्मणांसह (ककुभः) ककुप् छंदात असलेली या मंत्र दशतीतील ऋचांचा (रिहते) पाठ करतात अथवा त्यांचे अर्थज्ञानपूर्वक त्या मंत्राचा आस्वाद घेतात.
भावार्थ - स्तोता ब्राह्मण आणि रक्षक क्षत्रिय दोघेही राष्ट्राचे अनिवार्य भाव आहेत. जसे ब्राह्मण विद्यानद करून क्षत्रियांवर उपकार करतात. तद्वत युद्धाच्या वेळी क्षत्रिय सर्व दिशांकडे चाल करून जातात व शत्रूंना पराजित करून ब्राह्मणांना उपकृत करतात. यामुळे ब्राह्मणांनी व क्षत्रियांनी राष्ट्रात बंधुत्व भावनेने संघटित असायला पाहिजे.।। ६।।
विशेष -
या दशतीच्या मंत्रांचा छंद ककुप् उष्णिक् आहे. या छंदाच्या प्रथम व तृतीय चरणात आठ अक्षरे आणि मध्यातील द्वितीय पाद बारा अक्षरांचा असतो.।। ६।।