Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 46
ऋषिः - भर्गः प्रागाथः देवता - अग्निः छन्दः - बृहती स्वरः - मध्यमः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
0

शे꣢षे꣣ वने꣡षु꣢ मा꣣तृ꣢षु꣣ सं꣢ त्वा꣣ म꣡र्ता꣢स इन्धते । अ꣡त꣢न्द्रो ह꣣व्यं꣡ व꣢हसि हवि꣣ष्कृ꣢त꣣ आ꣢꣫दिद्दे꣣वे꣡षु꣢ राजसि ॥४६॥

स्वर सहित पद पाठ

शे꣡षे꣢꣯ । व꣡ने꣢꣯षु । मा꣣तृ꣡षु꣢ । सम् । त्वा꣣ । म꣡र्ता꣢꣯सः । इ꣣न्धते । अ꣡त꣢꣯न्द्रः । अ । त꣣न्द्रः । ह꣣व्यम् । व꣣हसि । हविष्कृ꣡तः꣢ । ह꣣विः । कृ꣡तः꣢꣯ । आत् । इत् । दे꣣वे꣡षु꣢ । रा꣣जसि ॥४६॥


स्वर रहित मन्त्र

शेषे वनेषु मातृषु सं त्वा मर्तास इन्धते । अतन्द्रो हव्यं वहसि हविष्कृत आदिद्देवेषु राजसि ॥४६॥


स्वर रहित पद पाठ

शेषे । वनेषु । मातृषु । सम् । त्वा । मर्तासः । इन्धते । अतन्द्रः । अ । तन्द्रः । हव्यम् । वहसि । हविष्कृतः । हविः । कृतः । आत् । इत् । देवेषु । राजसि ॥४६॥

सामवेद - मन्त्र संख्या : 46
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 5;
Acknowledgment

शब्दार्थ -
प्रथम अर्थ (यज्ञाग्निपरक) - हे यज्ञाग्नी, तू (वनेषु) वनात वा रानातील काष्ठात आणि (मातृषु) आपल्या मातांरूप आलेल्या अरणीच्या गर्भात (शेष) गुप्त रूपाने झोपलेला असतोस. (बा) तुला (मतसि) याज्ञिक मनुष्य (समिन्धते) अरणीचे मंथन करून प्रकट करतात. प्रज्वलित करतात. प्रज्वलित झालेला तू (अतन्द:) तंद्रारहित होऊन सतत जागृत प्रज्वलित राहून (हविष्कृत:) हवी देणाऱ्या यजमानाच्या (हव्यम्) आहुत हवी (वहसि) या स्थानावरून त्या स्थानापर्यंत दूर-दूरपर्यंत नेतोस. (आत् इत्) तुझ्या या गुणांमुळेच तू नंतर (देवेषु) विद्वज्जनांत (वाजसि) एखाद्या राजाप्रमाणे प्रशंसित होतोस. या ठिकाणी अचेतन अशा यज्ञाग्नीसाठी चेतन पदार्थाप्रमाणे व्यवहार जसे झोपणे, वाहून नेणे, जागरूक राहणे दाखविले आहेत. हे शब्दप्रयोग येथे अलंकारीक रूपात वर्णित आहेत. अचेतन पदार्थात राय, तंद्रा आदी कार्य असंभवनीय आहेत. त्यामुळे तंद्रा, शयन शब्दांचा लक्षणशक्तीमुळे लाक्षणिक अर्थ घेतला पाहिजे. वनात शयन करतोस या वाक्यामुळे अग्नी एक वनवासी मुनिप्रमाणे आहे हा व्यंजना शब्द शक्तीने व्यंग्यार्थ व्यक्त होत आहे. द्वितीय अर्थ : (परमात्मपरक) हे परमात्मन् आपण (वनेषु) वनात आणि (मातृषु) वनांची माता ज्या नद्या, त्या नद्यात (शेष) शयन करीत आहात म्हणजे अदृश्यरूपेण विद्यमान आहात. (त्वा) आपणास (मर्त्यास:) मनुष्य, योगाभ्यासी जन (समिन्धते) संदीप्त करतात. जागृत करतात. म्हणजे योगसाधनेद्वारे आपल साक्षात्कार करतात. अन्यत्र म्हटलेलेही आहे की पर्वतांच्या एकांतस्थळी आणि नद्यांच्या संगमावर ध्यानद्वारे परमेश्वर प्रकट होतो. (साम. १४३) (अतन्द्र:) निद्रा, प्रमाद, आलस्य आदींपासून रहित आपण त्या योग्यांच्या (हव्यम्) आत्मसमर्पणरूप हवीच्या (वहसि) स्वीकार करता (आत् इत) त्यानंतरच आपण (देवेषु) त्या विद्वान योगीजनांमध्ये म्हणजे त्यांच्या जीवनात (विराजसि) विशेषत्वाने सुशोभित होता. ।।२।।

भावार्थ - ज्याप्रमाणे भौतिक अग्नी वनाच्या लाकडामध्ये अथवा अरणीच्या काष्ठामध्ये अदृश्य रूपेण जणू झोपलेला असतो आणि दोन अरणींच्या मंथनाने यज्ञकुंडात प्रदीप्त होतो, त्याप्रमाणे परमेश्वरही वनांच्या वृक्ष, लता, पत्र, पुष्प, नदी सरोवर आदींच्या सौंदर्यात प्रच्छन्नरूपेण विद्यमान असतो. आणि योगीजनांद्वारे हृदयात प्रदीप्त केला जातो. जसा यज्ञवेदीत प्रदीप्त भौतिक अग्नी सुवासिक, मधुर, पुषिकारक आणि आरोग्यवर्धक घृत, कस्तुरी, केशर, कन्द, खिसमिस, अक्रोड, खजुर, सोमलता, गिलोय आदी पदार्थांचा आहुती वायुच्या माध्यमाने स्थानांतराला पोहोचवून तेथील आरोग्याची वृद्धी करतो, तद्वत परमेश्वर उपासकांच्या आत्मसमर्पणरूप हवी स्वीकारून उपासकांच्या हृदयात स्वभावात सद्गुणांची वृद्धी करतो. ।।२।।

इस भाष्य को एडिट करें
Top