Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 473
ऋषिः - जमदग्निर्भार्गवः
देवता - पवमानः सोमः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - पावमानं काण्डम्
0
अ꣡सा꣢व्य꣣ꣳशु꣡र्मदा꣢꣯या꣣प्सु꣡ दक्षो꣢꣯ गिरि꣣ष्ठाः꣢ । श्ये꣣नो꣢꣫ न योनि꣣मा꣡स꣢दत् ॥४७३॥
स्वर सहित पद पाठअ꣡सा꣢꣯वि । अँ꣣शुः꣢ । म꣡दा꣢꣯य । अ꣣प्सु꣢ । द꣡क्षः꣢꣯ । गि꣣रिष्ठाः꣢ । गि꣣रि । स्थाः꣢ । श्ये꣣नः꣢ । न । यो꣡नि꣢꣯म् । अ । अ꣣सदत् ॥४७३॥
स्वर रहित मन्त्र
असाव्यꣳशुर्मदायाप्सु दक्षो गिरिष्ठाः । श्येनो न योनिमासदत् ॥४७३॥
स्वर रहित पद पाठ
असावि । अँशुः । मदाय । अप्सु । दक्षः । गिरिष्ठाः । गिरि । स्थाः । श्येनः । न । योनिम् । अ । असदत् ॥४७३॥
सामवेद - मन्त्र संख्या : 473
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 1;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 1;
Acknowledgment
विषय - आनंद रसाचे वर्णन
शब्दार्थ -
(गिरिष्ठाः) पर्वतावर स्थित (दक्षः) शक्तिवर्धक (अंशुः) सोम औषधी ज्याप्रकारे (अप्सु) पाण्यामध्ये (असावी) अभिषुत केली जाते (त्या वनस्पतीला पाण्यात भिजवून / रगडून त्याचा रस काढला जातो.) तसेच (मिरिष्ठाः) पर्वताप्रमाणे उच्च असलेल्या परब्रह्मामध्ये सणारा (दक्षः) आत्मशक्ती वाढविणार (अंशुः) आनंद रस (मदाय) हर्षप्राप्तीकरिता (असावि) मी अभिषुत केला आहे (अप्सु) माझ्या प्राणां / कर्मांद्वारे मी तो प्राप्त केला आहे. (श्येनः न) वहिरी ससाणा पक्षी (योनिम्) ज्याप्रमाणे आपल्या (योनिम्) घरट्याकडे येतो, तद्वत हा ब्रह्मानंद रस (योनिम्) माझ्या हृदय गृहात (आ सद्) येऊन स्थित जाला आहे. (मी तो आनंद सतत निरंतर अनुभव आहे.)।। ७।।
भावार्थ - जसे ससाणा आदी पक्षी सायंकाळी आपापल्या वृक्षावरील आवास-गृहात येतात, तसेच परब्रह्मापासून झिरपत येणारा आनंद रस हृदय प्रदेशात येतो. तसेच ज्याप्रमाणे सोमलतेचा रस वसतीवरी नावाच्या पात्रातील पाण्यात अभिषुत केला जातो, तसेच हा आनंद रस स्तोताजनाच्या प्राणांतून व कर्मांतून प्रकट होतो.।। ७।।
विशेष -
या मंत्राच्या पूर्वार्धात श्लिष्ट व्यंग्योपमा व उत्तरार्धात वाच्योपमा अलंकार आहे.।। ७।।