Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 490
ऋषिः - प्रभूवसुराङ्गिरसः देवता - पवमानः सोमः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - पावमानं काण्डम्
0

अ꣡स꣢र्जि꣣ र꣢थ्यो꣣ य꣡था꣢ प꣣वि꣡त्रे꣢ च꣣꣬म्वोः꣢꣯ सु꣣तः꣢ । का꣡र्ष्म꣢न्वा꣣जी꣡ न्य꣢क्रमीत् ॥४९०॥

स्वर सहित पद पाठ

अ꣡स꣢꣯र्जि । र꣡थ्यः꣢꣯ । य꣡था꣢꣯ । प꣣वि꣡त्रे꣢ । च꣣म्वोः꣢꣯ । सु꣣तः꣢ । का꣡र्ष्म꣢꣯न् । वा꣣जी꣢ । नि । अ꣣क्रमीत् ॥४९०॥


स्वर रहित मन्त्र

असर्जि रथ्यो यथा पवित्रे चम्वोः सुतः । कार्ष्मन्वाजी न्यक्रमीत् ॥४९०॥


स्वर रहित पद पाठ

असर्जि । रथ्यः । यथा । पवित्रे । चम्वोः । सुतः । कार्ष्मन् । वाजी । नि । अक्रमीत् ॥४९०॥

सामवेद - मन्त्र संख्या : 490
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 3;
Acknowledgment

शब्दार्थ -
(चम्बोः) आत्मा आणि बुद्धीरूप अधिषवण फलकांद्वारे (विशिष्ट चाळण्यांद्वारे) (सुतः) अभिषुत केलेला म्हणजे ज्याला ध्यानाद्वारे प्रकट केले आहे, असा रसमिधि परमेश्वर (पवित्रे) दशापवित्र पात्राप्रमाणे असलेल्या शुद्ध हृदय पात्रात (अर्सीज) सोडला जातो. ((म्हणजे परमेश्वराचे ध्यान संपूर्ण हृदयात व्याप्त होते) (रथ्यः यथा) जसे रथाध्ये जुंपलेला घोडा मार्गावर धावण्यासाठी सोडला जातो. (तद्वत आत्म्यात परमेश्वराचे ध्यान प्रवाहित होऊ लागते.) त्यामुळे (वाजी) उपासक अधिक बलवान होऊन (कार्ष्मन्) योग मार्गातील सर्व विघ्नांना (न्यमीत्) पार करून पुढे जातो अथवा जसे (वाजी) बलवान सेनापती (कार्ष्मन्) युद्धात (न्यक्रमीत्) शत्रु-सैन्याला पराभूत करतो.।। ४।।

भावार्थ - जेव्हा सोम परमेश्वर हृदयात अवतीर्ण होतो, तेव्हा माणूस सर्व विग्न बाधा क्षणभरात दूर करू शकतो.।। ४।।

इस भाष्य को एडिट करें
Top