Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 543
ऋषिः - कश्यपो मारीचः
देवता - पवमानः सोमः
छन्दः - त्रिष्टुप्
स्वरः - धैवतः
काण्ड नाम - पावमानं काण्डम्
0
अ꣡स꣢र्जि꣣ व꣢क्वा꣣ र꣢थ्ये꣣ य꣢था꣣जौ꣢ धि꣣या꣢ म꣣नो꣡ता꣢ प्रथ꣣मा꣡ म꣢नी꣣षा꣣ । द꣢श꣣ स्व꣡सा꣢रो꣣ अ꣢धि꣣ सा꣢नो꣣ अ꣡व्ये꣢ मृ꣣ज꣢न्ति꣣ व꣢ह्नि꣣ꣳ स꣡द꣢ने꣣ष्व꣡च्छ꣢ ॥५४३॥
स्वर सहित पद पाठअ꣡स꣢꣯र्जि । व꣡क्वा꣢꣯ । र꣡थ्ये꣢꣯ । य꣡था꣢꣯ । आ꣣जौ꣢ । धि꣣या꣢ । म꣣नो꣡ता꣢ । प्र꣣थमा꣢ । म꣣नीषा꣢ । द꣡श꣢꣯ । स्व꣡सा꣢꣯रः । अ꣡धि꣢꣯ । सा꣡नौ꣢꣯ । अ꣡व्ये꣢꣯ । मृ꣣ज꣡न्ति꣢ । व꣡ह्नि꣢꣯म् । स꣡द꣢꣯नेषु । अ꣡च्छ꣢꣯ ॥५४३॥
स्वर रहित मन्त्र
असर्जि वक्वा रथ्ये यथाजौ धिया मनोता प्रथमा मनीषा । दश स्वसारो अधि सानो अव्ये मृजन्ति वह्निꣳ सदनेष्वच्छ ॥५४३॥
स्वर रहित पद पाठ
असर्जि । वक्वा । रथ्ये । यथा । आजौ । धिया । मनोता । प्रथमा । मनीषा । दश । स्वसारः । अधि । सानौ । अव्ये । मृजन्ति । वह्निम् । सदनेषु । अच्छ ॥५४३॥
सामवेद - मन्त्र संख्या : 543
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 11
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 7;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 11
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 7;
Acknowledgment
विषय - प्राणांना प्रेरणा आणि आत्मशोधन (आत्मा- शुद्धीकरण) विषयी-
शब्दार्थ -
(रथ्ये) ज्यात रथांचाउपयोग केला जात आहे, अशा (आजौ) संग्रामात (वक्वा) शब्द करणारा वा खिंसाळणारा घोडा (यथा) ज्याप्रमाणे (असर्जि) वेगाने प्रेरित केला जातो, त्याप्रमाणे (मनोता) ज्यात ज्ञान आकंठ भरलेलेआहे अशा (प्रथमा) श्रेष्ठ (मनीषा) मनाला गती देणाऱ्या बुद्धीने (वक्वा) शब्दकारी प्राण (असर्जि) प्रेरित केला जातो. जसे (दश) दहा (स्वसारः) अंगुली (सदनेषु अच्छ) यज्ञ- सदनात (अव्ये) मेंढीच्या केसांनी निर्मित (सानौ अधि) वर उचलून धरलेया दशापवित्र पात्रात (वहिृम्) यज्ञ-चाहक सोमरसाला (मृजन्ति) गाळून शुद्ध करतात अथवा (दुसरा अर्थ) जसे (दश) दहा (स्वसारः) बहिणीप्रमाणे संघटित प्राणशक्ती (सदनेषु अच्छ) शरीर रूप सदनामध्ये (अव्ये) नाशरहित (सानौ अधि) सर्वोत्त परमेश्वराच्या सान्निध्यात (वहिृम्) शरीर वाहक जीवात्म्यास (मृजन्ति) शुद्ध करतात.।। ११।।
भावार्थ - परमात्म्याचा आश्रय मिळाल्यानंतर जसे जीवात्मा शुद्ध होतो, तसे दशापवित्र रूप गाळणीमुळे सोमरस शुद्ध होतो. ।। ११।।
विशेष -
या मंत्राच्या पूर्वार्धात वाच्योपमा अलंकार आहे. उत्तरार्थात श्लेषमूलक व्यंग्योपमा अलंकार आहे. ङ्गमनो, मनीफ मध्ये छेकानुप्रास आहे. ङ्गमनोता, प्रथमा, मनीषाफ मध्ये मकाराचा व ङ्गरथ्ये यथाजौ धियाफ मध्ये मकाराचा अनुप्रास आहे. ।। ११।।