Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 610
ऋषिः - ऋजिश्वा भारद्वाजः देवता - विश्वे देवाः छन्दः - जगती स्वरः - धैवतः काण्ड नाम - आरण्यं काण्डम्
0

वि꣡श्वे꣢ दे꣣वा꣡ मम꣢꣯ शृण्वन्तु य꣣ज्ञ꣢मु꣣भे꣢꣯ रोद꣢꣯सी अ꣣पां꣢꣯ नपा꣢꣯च्च꣣ म꣡न्म꣢ । मा꣢ वो꣣ व꣡चा꣢ꣳसि परि꣣च꣡क्ष्या꣢णि वोचꣳ सु꣣म्ने꣢꣫ष्विद्वो꣣ अ꣡न्त꣢मा मदेम ॥६१०॥

स्वर सहित पद पाठ

वि꣡श्वे꣢꣯ । दे꣣वाः꣢ । म꣡म꣢꣯ । शृ꣣ण्वन्तु । यज्ञ꣢म् । उ꣣भे꣡इति꣢ । रो꣡द꣢꣯सी꣣इ꣡ति꣢ । अ꣣पा꣢म् । न꣡पा꣢꣯त् । च । मन्म꣢ । मा । वः꣣ । व꣡चाँ꣢꣯सि । प꣣रिच꣡क्ष्या꣢णि । प꣣रि । च꣡क्ष्या꣢꣯णि । वो꣣चम् । सुम्ने꣡षु꣢ । इत् । वः꣣ । अ꣡न्त꣢꣯माः । म꣣देम ॥६१०॥


स्वर रहित मन्त्र

विश्वे देवा मम शृण्वन्तु यज्ञमुभे रोदसी अपां नपाच्च मन्म । मा वो वचाꣳसि परिचक्ष्याणि वोचꣳ सुम्नेष्विद्वो अन्तमा मदेम ॥६१०॥


स्वर रहित पद पाठ

विश्वे । देवाः । मम । शृण्वन्तु । यज्ञम् । उभेइति । रोदसीइति । अपाम् । नपात् । च । मन्म । मा । वः । वचाँसि । परिचक्ष्याणि । परि । चक्ष्याणि । वोचम् । सुम्नेषु । इत् । वः । अन्तमाः । मदेम ॥६१०॥

सामवेद - मन्त्र संख्या : 610
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 3; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 3;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (अध्यात्मपर) - (विश्वेदेवाः) ज्ञानाचे जे प्रकाशक ते शरीरस्य माझे मन, बुद्धी, ज्ञानेंद्रिये रूप सर्व देवता, (उभे रोदसी) प्राण व अपान दोन्ही (अपां न पात् च) आणि प्राणांना पतनापासून रोकणारा जीवात्मा व परमेश्वर या सर्वांनी (मम) माझ्या (यज्ञम्) विषय आणि इंद्रिये यांच्या संसर्गापासून प्राप्त होणाऱ्या (मन्भ) विज्ञानाला (शृण्वन्तु) पूर्ण करावे. हे शरीरस्य देवगण हो, (वः) तुमच्यासाठी मी (परिचक्ष्याणि) निंदनीय (वचांसि) वचन (मा वाचम्) कधीही उच्चारू नये. म्हणजे हा! ‘माझे मन कुंठित झाले आहे,’ बुद्धी काम देईनाशी झालीफ असे नैराश्यपूर्ण वचन मी कधीही बोलूं नये, याउलट तुमच्या शक्तीचे गुण गात मी तुमच्यापासून अधिकाधिक लाभ प्राप्त करावे. आम्ही सर्वजण (वः) तुमचे (अन्तमाः) निकटवर्ती होऊन (सुम्नेषु) तुम्ही देत असलेल्या सुखांद्वारे (मदेम) तृप्त रहावे.।। द्वितीय अर्थ - (राष्ट्रपर) विश्वे देवाः) सर्व विद्वज्जम, (उभे रोदसी) दोन्ही राज-परिषदा म्हणजे सभाव समिती तसेच अपां न पात्च) प्रजाजनांना पति होण्यापासून वाचविणारा राजा या सर्वांनी (मम) माझ्या (यज्ञम्) राष्ट्रविषयक (मन्म) विचारांना (शृष्वन्तु) ऐकावे (मी एक सूज्ञ नागरिक सुचवीत असलेल्या विचारांवर वा प्रस्तावावर विचार करावा) हे देवगण हो (राजा व राजसभा-सदस्य हो) मी (वः) तुमच्याविषयी (परिचक्ष्याणि) निंदनीय वा अभद्र (वचांसि) वचन कधीही (मा वोचम्) उधारूं नये. आम्ही प्रजाजन (वः) तुमच्या (अन्तमाः) घनिष्ठ सान्निध्यात राहून (सुम्नेषु) तुम्ही आमच्यासाठी केलेल्या सुखसोयीमुळे (मदेम) सदे आनंदित राहू (असे होऊ द्यावा असे व्हावे)।।९।।

भावार्थ - सर्व मनुष्यांचे कर्तव्य आहे की त्यांनी शरीरस्थ देव म्हणजे आत्मा, मन, बुद्धी, प्राण व इंद्रिये यांच्या साह्याने तसेच राष्ट्रस्थ देव म्हणजे विद्वज्जन, राजमंत्री, न्यायाधीश व राजा आदीच्या साह्याने सर्वप्रकारे आपला उत्कर्ष साध्य करावा.।।९।।

इस भाष्य को एडिट करें
Top