Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 626
ऋषिः - वामदेवो गौतमः
देवता - गावः
छन्दः - त्रिष्टुप्
स्वरः - धैवतः
काण्ड नाम - आरण्यं काण्डम्
0
स꣣ह꣡र्ष꣢भाः स꣣ह꣡व꣢त्सा उ꣣दे꣢त꣣ वि꣡श्वा꣢ रू꣣पा꣢णि꣣ बि꣡भ्र꣢तीर्द्व्यूध्नीः । उ꣣रुः꣢ पृ꣣थु꣢र꣣यं꣡ वो꣢ अस्तु लो꣣क꣢ इ꣣मा꣡ आपः꣢꣯ सुप्रपा꣣णा꣢ इ꣣ह꣡ स्त ॥६२६
स्वर सहित पद पाठस꣣ह꣡र्ष꣢भाः । स꣣ह꣢ । ऋ꣣षभाः । सह꣡व꣢त्साः । स꣣ह꣢ । व꣣त्साः । उदे꣡त꣢ । उ꣣त् । ए꣡त꣢꣯ । वि꣡श्वा꣢꣯ । रू꣣पा꣡णि꣢ । बि꣡भ्र꣢꣯तीः । द्व्यू꣣ध्नीः । द्वि । ऊध्नीः । उरुः꣢ । पृ꣣थुः꣢ । अ꣣य꣢म् । वः꣣ । अस्तु । लोकः꣢ । इ꣣माः꣢ । आ꣡पः꣢꣯ । सु꣣प्रपाणाः꣢ । सु꣣ । प्रपाणाः꣢ । इ꣣ह꣢ । स्त꣣ ॥६२६॥
स्वर रहित मन्त्र
सहर्षभाः सहवत्सा उदेत विश्वा रूपाणि बिभ्रतीर्द्व्यूध्नीः । उरुः पृथुरयं वो अस्तु लोक इमा आपः सुप्रपाणा इह स्त ॥६२६
स्वर रहित पद पाठ
सहर्षभाः । सह । ऋषभाः । सहवत्साः । सह । वत्साः । उदेत । उत् । एत । विश्वा । रूपाणि । बिभ्रतीः । द्व्यूध्नीः । द्वि । ऊध्नीः । उरुः । पृथुः । अयम् । वः । अस्तु । लोकः । इमाः । आपः । सुप्रपाणाः । सु । प्रपाणाः । इह । स्त ॥६२६॥
सामवेद - मन्त्र संख्या : 626
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 4; मन्त्र » 12
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 4;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 4; मन्त्र » 12
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 4;
Acknowledgment
विषय - गौ देवता। गायीच्या साभ्याद्वारे इंद्रियविषयी वर्णन
शब्दार्थ -
हे इन्द्रियरूप गायी, तुम्ही (सहर्षभाः) जीवात्मारूप वृषभानेयुक्त असून (सहवत्सा) मनरूप वासरासह विद्यमान आहात. (विश्वा रूपाणि) नेत्र, कर्ण, नासिका आदी विभिन्न नाम धारण (विभ्रतीः) करीत तुमचे (द्वयूनीः) ज्ञान-कर्म रूप दोन स्तन आहेत (उरूः) अतीव लांब, (पृथुः) अति रूंद (अयम्) हा (लोकः) लोक (शरीररूप गोठे) (वः) तुमच्या उपयोगासाठी (अस्तु) असावे. (इमाः) या (सुप्रपाणाः) सुखाने आस्वादन करण्यास योग्य (आपः) पाण्याप्रमाणे प्राप्तव्य असे जे रूप, सर, गंध आदी तुमच विषय आहेत. (हे इंद्रियांनो, तुम्ही त्या विषयात) (स्त) रहा म्हणजे या विषयाचा यथोचित आस्वाद घ्या.।।१२।।
भावार्थ - या मंत्राची गौ पक्षीदेखील अर्थयोजना केली पाहिजे. जशा गायी बैल आणि राक्षसांसोबत विचरण करतात, तशाप्रकारे इंद्रिये आत्मा आणि मनासह संचारण करतात. जशा गायी श्वेत, कृष्ण अशी रूपें धारण करतात, तद्वत इंद्रिये नेत्रल कर्ण आदी रूपे धारण करतात. जशा गायी प्रातःकाळी व सायंकाळी, दोन्ही काळी भरलेल्यं स्तनवती असतात, तद्वत इंद्रिये ज्ञान आणि कर्मरूप ऊधस (स्तन) वान असतात. (द्रयूनी) जशा गायी विस्तीर्ण कुरणात चरायला जातात, तशा इंद्रिये आपापल्या विस्तीर्ण विषयात रमतात. जसे गायी सुपेय जल पितात, तसे इंद्रिये आपापले विषयरस पान करतात. या इंद्रियरूप गायींपासून श्रेष्ठ ज्ञान व श्रेष्ठ कर्मरूप दूध घेत माणसाने नेहमी शारीरिक आणि आत्मिक उन्नती साधली पाहिजे.।।१२।। या दशतीमधे अग्नीच्या ज्वालारूप जिह्वा, सर्व ऋतूंचे रमणीयत्न, परम पुरुष परमेश्वराचा महिमा, आई-वडिलांची कर्तव्ये, ब्रह्म वर्चस आणि बळ-प्राप्ती आदी विषयांचे वर्णन असून या दशतीच्या विषयांशी मागील दशतीच्या विषयांशी संगती आहे, असे जाणावे.।।१२।। षष्ठ प्रपाठकातील तृतीय अर्धाची चतुर्थ दशती समाप्त षष्ठ अध्यायाचा चतुर्थ खण्ड समाप्त
इस भाष्य को एडिट करें